Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kunal Kamra: कुणाल कामरा पुन्हा बरळला! निवडणूक आयोगावर केवळ ‘या’ ४ शब्दांत केली टीका

SIR News: निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी झाली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याविरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 11, 2025 | 06:53 PM
Kunal Kamra: कुणाल कामरा पुन्हा बरळला! निवडणूक आयोगावर केवळ ‘या’ ४ शब्दांत केली टीका
Follow Us
Follow Us:

LiveUnstoppable/Rahul Gandhi:  अनेक दिवसांपासून राहुल गांधी हे महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावरून निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी झाली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याविरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले.दरम्यान आज महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जनआक्रोश आंदोलन केले. याच दरम्यान कुणाल कामराने एक ट्विट करत निवडणूक आयोगालाच लक्ष्य केले आहे. त्याने ट्विट करत निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे कुणाल कामरा हा चांगलाच चर्चेत आला होता. विनोदी कलाकार कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर विंडबनात्मक गाणे गायले होते. त्यावरून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा कुणाल कामरा चर्चेत आला आहे. त्याने ४ शब्दाचे ट्विट करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

विनोदी कलाकार कुणाल कामराने याआधी देखील निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. ७ ऑगस्ट रोजी त्याने निवडणूक आयोगावर ‘द सिलेक्शन कमिशन ऑफ इंडिया’ म्हणत टीका केली होती.

*The Selection Commission Of India* — Kunal Kamra (@kunalkamra88) August 7, 2025

आता पुन्हा एकदा विरोधी पक्ष निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करत आहेत. मतांची चोरी झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा कुणाल कामराने निवडणूक आयोगाला डिवचले आहे. त्याने ‘द कॉम्प्रोमाइज ऑफ इंडिया’ असे ट्विट करत निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

*Election Compromise of India* — Kunal Kamra (@kunalkamra88) August 11, 2025

या ट्विटमुळे कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. त्याच्या पोस्टमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

LiveUnstoppable: निवडणूक आयोगाकडून संदेश..; चर्चेसाठी ३० जणांना आमंत्रण, कोण कोण जाणार?

निवडणूक आयोगाकडून संदेश..; चर्चेसाठी ३० जणांना आमंत्रण

निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाच्या ३० सदस्यांच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावले होते. त्यानंतर आयोगाने निवडणूक आयोगाने दुपारी १२ वाजता ३० लोकांना भेटण्यासाठी बोलावले. भारतीय निवडणूक आयोगाच्या सचिवालयाने काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्र लिहून दुपारी १२:०० वाजता चर्चेसाठी वेळ दिला होता. जागेअभावी, जास्तीत जास्त ३० जणांची नावे कळवावीत अशी विनंती केली होती. पण एकतर सर्वजण निवडणूक आयोगाकडे जातील किंवा कोणीही जाणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती.

मतदार यादीतील अनियमिततेवरून लढाई सुरूच आहे. राहुल गांधींसह सर्व विरोधी नेते निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. राहुल यांनी निवडणूक आयोगावर थेट मत चोरीचा आरोप केला आहे. त्यांनी काल यासंदर्भात एक मोहीम देखील सुरू केली आहे. याअंतर्गत राहुल यांनी एक वेबसाइट देखील सुरू केली आहे. यासोबतच त्यांनी लोकांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहनही केले आहे.

Web Title: Kunal kamra post tweet against election comission of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 06:50 PM

Topics:  

  • election commission of india
  • Kunal Kamra
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Independence Day 2026: स्वातंत्र्य ही केवळ भेट नसून मोठी जबाबदारी; स्वातंत्र्यदिनानिमित्त राहुल गांधींचा खास संदेश
1

Rahul Gandhi Independence Day 2026: स्वातंत्र्य ही केवळ भेट नसून मोठी जबाबदारी; स्वातंत्र्यदिनानिमित्त राहुल गांधींचा खास संदेश

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द
2

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका
3

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

Rahul Gandhi: ‘…RSS ला पाठिंबा देईन, मी त्यांचे रक्षण करेन’, राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण
4

Rahul Gandhi: ‘…RSS ला पाठिंबा देईन, मी त्यांचे रक्षण करेन’, राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.