Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुणी मेलं आहे का? मजूरांना उडवल्यानंतर आलिशान लॅम्बोर्गिनी चालकाचा माज, Video आला समोर

Lamborghini Car Accident in Noida : नोएडा सेक्टर 94 मध्ये भरधाव लॅम्बोर्गिनी आलिशान गाडीने बांधकाम मजुरांना धडक दिली. यामध्ये दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 31, 2025 | 11:35 AM
Lamborghini Car Accident in Noida hits construction workers video viral news

Lamborghini Car Accident in Noida hits construction workers video viral news

Follow Us
Close
Follow Us:

नोएडा : पादचारी जाणाऱ्या लोकांच्या जीवाला काही मोल आहे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. आलिशान गाड्यांमधून फिरणाऱ्या लोकांनी याबाबत विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या सोशल मीडिया नोएडामधील एका मुजोर चालकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये नोएडा सेक्टर 94 मध्ये भरधाव लॅम्बोर्गिनी आलिशान गाडीने मजुरांना धडक दिली. यामध्ये दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. मात्र कोणी मेलंय का असे म्हणत चालकाने त्याची गुर्मी दाखवून दिली आहे.

लॅम्बोर्गिनी कारने बांधकाम कामगारांना उडवलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा सेक्टर 94 मध्ये हा अपघात झाला. रविवारी संध्याकाळी भरधाव जाणाऱ्या एका लाल रंगाच्या लॅम्बोर्गिनी कारने बांधकाम कामगारांना उडवले. अपघात झालेल्या रस्त्याला लागूनच असणाऱ्या एका इमारतीसाठी हे मजूर काम करत होते. यामध्ये दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या एका कामगाराने सांगितले की, लक्झरी गाडी जास्त वेगाने जात होती.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

छत्तीसगडमधील दोन कामगार या अपघातात जखमी झाले आहेत आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या पायांना फ्रॅक्चर झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले. मात्र सध्या सोशल मीडियावर त्या गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये चालक कोणी मेलं तर नाही ना, असे गुर्मीमध्ये म्हणत आहे. यामुळे आलिशान गाडीचालकाची असंवेदनशीलता दिसून येत आहे. नेटकऱ्यांनी देखील यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

नोएडामधील अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

अपघातानंतर तिथे जमलेल्या लोकांच्या गर्दीने या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ शूट केले आहेत. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मजूर कारचा दरवाजा उघडून आत बसलेल्या चालकाला जाब विचारत आहेत. “क्या भाई, स्टंट ज्यादा सीख लिये हो? “तुमको पता हे यहाँ कितने लोग मर गए?” असाही प्रश्न एका मजुरानं विचारला. कारचा चालक “इथे कुणी मेलंय का?” असा उलट प्रश्न करताना दिसत आहे. तसेच मी तर हळूच एक्सलरेटर दाबला होता, असे देखील चालक म्हणाला, या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Accident today evening in Noida’s Sector 94: Lamborghini crashes & runs over 3 people at 140 kmph speed. Driver asks “Koi Mar Gaya Kya?”
These rich people know that they wil come out easily with Money Power & by writing an Essay.
Shameless People.#Accident #NoidaAccident #Noida pic.twitter.com/zcvkyDVTUi

— Prof Shrinath Rao K 🇮🇳 (@ProfSRK) March 30, 2025

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पोलिसांनी या चालकाला ताब्यात घेतलं आहे.  दीपक असे या चालकाचे नाव आहे. तो अजमेरचा रहिवासी आहे. अपघातात जखमी झालेल्या एका मजुराचा मुलगा गंगाराम याच्या तक्रारीवरून दीपकविरोधात न्यायसंहितेच्या कलम २८१ (बेदरकारपणे वाहन चालवणे) व कलमन १२५ब (मानवी जीविताला धोका) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Lamborghini car accident in noida hits construction workers video viral news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • Accident News
  • Noida

संबंधित बातम्या

Accident News: मध्यरात्री दोन भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी
1

Accident News: मध्यरात्री दोन भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी

पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीवरील दोघे खोल खड्ड्यात पडले अन्…
2

पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीवरील दोघे खोल खड्ड्यात पडले अन्…

पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात विचीत्र अपघात; भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तरुण अडकला अन्…
3

पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात विचीत्र अपघात; भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तरुण अडकला अन्…

ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पो पलटला; एका महिलेचा मृत्यू तर सातजण जखमी
4

ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पो पलटला; एका महिलेचा मृत्यू तर सातजण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.