Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sikkim Army Camp Landslide: सिक्कीमध्ये लष्करी छावणीत भुस्खलन; ३ जणांचा मृत्यू ९ जवान बेपत्ता

उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे परिस्थिती फार बिकट झाली आहे. लोचन आणि लाचुंग भागात सुमारे १५०० पर्यटक अडकले आहेत

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 02, 2025 | 12:29 PM
Sikkim Army Camp Landslide: सिक्कीमध्ये लष्करी छावणीत भुस्खलन; ३ जणांचा मृत्यू ९ जवान बेपत्ता
Follow Us
Close
Follow Us:

Sikkim Army Camp Landslide: ईशान्य भारतातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ईशान्य भारतात सुरू असलेल्या पावसामुळे रविवारी (०१ जून) संध्याकाळी सिक्कीममधील एका लष्करी छावणीत भूस्खलन झाले. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून ९ जवान बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही, याशिवाय ९ जवानांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (०१ जून) संध्याकाळी ७ वाजता उत्तर सिक्कीममधील चट्टन येथील लष्करी छावणीत भूस्खलन झाले, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील घरांचे मोठे नुकसान झाले. या भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहेत. मृतांची ओळख पटविण्यासाठी आणि बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे.

सिक्कीममध्ये अडकले १५०० पर्यटक

उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे परिस्थिती फार बिकट झाली आहे. लोचन आणि लाचुंग भागात सुमारे १५०० पर्यटक अडकले आहेत. लाचेनमध्ये 115 आणि लाचुंगमध्ये 1,350 पर्यटक मुक्कामी आहेत. भूस्खलनामुळे दोन्ही बाजूंनी रस्ते बंद झाल्याची माहिती मंगन जिल्ह्याचे एसपी सोनम देचू भुतिया यांनी दिली आहे.

दरम्यान, लाचुंगला जाणारा रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून आजपासून पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू होईल. बीआरओ टीमने भूस्खलनामुळे साचलेला ढिगारा साफ केला आहे, खराब झालेले भागांचे बांधकाम करून पुर्ववत करण्यात आले आहेत. फिदांग येथील ‘सस्पेंशन ब्रिज’जवळील भेगा भरण्यात आल्या असून लाचुंग-चुंगथांग-शिप्स्यारे-शांकलांग-डिक्चू रस्त्यावर अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.

३० मे रोजी उत्तर सिक्कीममध्ये ढगफुटी सदृश पाऊस

बीआरओने दिलेल्या माहितीनुसार, सततच्या मुसळधार पावसानंतर, ३० मे रोजी अचानक ढगफुटी झाल्याने उत्तर सिक्कीममध्ये मोठे नुकसान झाले. या काळात, १३० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आणि लाचेन, लाचुंग, गुरुडोंगमार, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि झिरो पॉइंट यासारख्या प्रमुख पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आपत्तीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना भेगा पडल्या, पुलांचे नुकसान झाले आणि डिकू-सिंकलांग-शिपगियार रोड, चुंगथांग-लेशेन-झेमा रोड आणि चुंगथांग-लाचुंग रोड यासारख्या प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले.

#BROSikkimDisasterRelief#SikkimCloudBurst

Incessant rains & a cloudburst in N Sikkim on night of
30-31 May caused widespread damage to vital roads & bridges.

River Teesta swelled 35-40 ft, severing connectivity. Project Swastik @BROindia has launched immediate rescue &… pic.twitter.com/UCHwcLDIPT

— 𝐁𝐨𝐫𝐝𝐞𝐫 𝐑𝐨𝐚𝐝𝐬 𝐎𝐫𝐠𝐚𝐧𝐢𝐬𝐚𝐭𝐢𝐨𝐧 (@BROindia) June 2, 2025

Web Title: Landslide at military camp in sikkim 3 dead 9 soldiers missing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 12:29 PM

Topics:  

  • indian army
  • national news

संबंधित बातम्या

७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लष्कराने घेतली विशेष खबरदारी! नियंत्रण रेषेवर ‘३-स्तरीय सुरक्षा कवच’ तयार; शत्रूंसाठी ठरणार ‘काळ’
1

७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लष्कराने घेतली विशेष खबरदारी! नियंत्रण रेषेवर ‘३-स्तरीय सुरक्षा कवच’ तयार; शत्रूंसाठी ठरणार ‘काळ’

Jammu-Kashmir: कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न; चकमकीत एक जवान शहीद
2

Jammu-Kashmir: कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न; चकमकीत एक जवान शहीद

Supreme Court : पुरुषांसाठी ६ जागा, महिलांसाठी ३ जागा… सैन्य भरतीवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3

Supreme Court : पुरुषांसाठी ६ जागा, महिलांसाठी ३ जागा… सैन्य भरतीवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Income Tax Bill 2025: निर्मला सीतारमण आज लोकसभेत सादर करणार इन्कमटॅक्स बिल, काय असणार खास?
4

Income Tax Bill 2025: निर्मला सीतारमण आज लोकसभेत सादर करणार इन्कमटॅक्स बिल, काय असणार खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.