Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parliament Winter Session : संसदेच्या पायऱ्यांवर सत्ताधारी अन् विरोधी खासदार भिडले! लोकसभा अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय

लोकसभेच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. यामुळे सर्वांनी रोष व्यक्त केला आहे. यामुळे आता लोकसभेच्या अध्यक्षांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 20, 2024 | 12:23 PM
Lok Sabha Speaker Om Birla bans protests on Parliament steps

Lok Sabha Speaker Om Birla bans protests on Parliament steps

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. अनेक मुदद्यांवर यंदाचे अधिवेशन गाजले आहे. आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की केली असल्याचा आरोप केला जात आहे. राहुल गांधी यांनी भाजपच्या खासदारांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप केला जात आहे. यामध्ये भाजप खासदार प्रताप चंद्र सारंगी हे जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. याविरोधात पोलीस तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

संसदेच्या पायऱ्यावर अनेकदा विरोधकांकडून जोरदार निदर्शने केली जातात. तसेच धरणे आंदोलन आणि घोषणाबाजी देखील केली जाते. विरोधातील सर्व खासदार या पायऱ्यांबसून आंदोलने करत असतात. मात्र यामुळे सत्ताधारी खासदारांना प्रवेश करता येत नाही. यामुळे अनेकदा शाब्दिक चकमक देखील होत असते. मात्र राहुल गांधी यांच्यामध्ये आणि सत्ताधारी खासदारांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला. यामध्ये धक्काबुक्की देखील झाली. देशाच्या महत्त्वाच्या संसदीय पायऱ्यावर हा प्रकार झाल्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी यापुढे संसदेच्या पायऱ्यावर आंदोलनं करण्यास बंदी घातली आहे.

राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

धक्काबुक्कीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही पक्षाला संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करता येणार नाही. कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा खासदारांना कोणत्याही प्रकारचे धरणे आंदोलन किंवा निदर्शन करता येणार नाही. संसदेचे कामकाज सुरळीतपणे पार पाडले जावे याकरिता संसदेच्या पायऱ्यांवरील आंदोलनांबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्देशांनंतर संसद भवनाच्या कोणत्याही गेटवर आंदोलन करता येणार नाही. लोकसभा अध्यक्ष कार्यालयाने हे निर्देश जारी करताना संसदेचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच कामकाज सुरळीत चालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात विरोधक आक्रमक झाले होते. कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांसह राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये विरोधकांचे आंदोलन सुरु होते. मात्र धक्काबुक्की झाल्यामुळे लोकसभेच्या अध्यक्षांनी हा निर्णय घेतला आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राहुल गांधी यांच्याविरोधात पोलीस तक्रार देखील करण्यात आली आहे. या आरोपांवर प्रत्युत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, “आम्ही मकर द्वाराने संसदेच्या आत चाललो होतो. त्यावेळी भाजपाचे काही खासदार उभे होते. त्यांनी आम्हाला आत जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. त्यात धक्काबुक्की झाली. हे लोक संविधानावर आक्रमण करत आहेत, तसंच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानही भाजपाने केला आहे. मी धक्काबुक्की केलेली नाही. मला धक्काबुक्की करण्यात आली. आम्हाला भाजपाच्या खासदारांनी संसदेत जाण्यापासून अडवलं. जे काही घडलं आहे ते कॅमेरात कैद झालं आहे. मल्लिकार्जुन खरगेंना धक्काबुक्की करण्यात आली. धक्काबुक्की करुन काहीही साध्य होणार नाही. भाजपाचे खासदार हे आम्हाला संसदेत जाण्यापासून रोखू शकत नाहीत,” असा आक्रमक पवित्रा राहुल गांधींनी घेतला आहे.

 

Web Title: Lok sabha speaker om birla bans protests on parliament steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 12:23 PM

Topics:  

  • Rahul Gandhi
  • Winter Session

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Independence Day 2026: स्वातंत्र्य ही केवळ भेट नसून मोठी जबाबदारी; स्वातंत्र्यदिनानिमित्त राहुल गांधींचा खास संदेश
1

Rahul Gandhi Independence Day 2026: स्वातंत्र्य ही केवळ भेट नसून मोठी जबाबदारी; स्वातंत्र्यदिनानिमित्त राहुल गांधींचा खास संदेश

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द
2

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द

Rahul Gandhi: ‘…RSS ला पाठिंबा देईन, मी त्यांचे रक्षण करेन’, राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण
3

Rahul Gandhi: ‘…RSS ला पाठिंबा देईन, मी त्यांचे रक्षण करेन’, राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
4

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.