
Delhi Blast नंतर RSS मुख्यालयाला पोलिसांचा वेढा; अतिरिक्त सुरक्षा दलासह...; महाराष्ट्रात काय स्थिती?
राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा संशय
महाराष्ट्रात महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली
ब्लास्ट झालेली कार, हरियाणाची असल्याची माहिती
राजधानी दिल्लीत झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. कारण आजच दिल्ली पोलिसांनी एक दहशतवादी कट उधळून लावल्याची माहिती समोर येत आहे. तसेच स्फोटके तयार करण्यासाठी लागणारे 2900 किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते. याचा वापर स्फोटके तयार करण्यासाठी केला जातो असे माहिती समोर येत आहे. दरम्यान याचा हा हल्ल्याशी काही संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे.
दरम्यान या हल्ल्यानंतर देशातील सर्व महत्वाच्या स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सीएसएमटी आणि राज्यातील महत्वाच्या ठिकाणांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने महत्वाची बैठक बोलावली आहे.
दिल्लीमध्ये स्फोट झाल्यानंतर मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि अन्य जिल्ह्यात सुरक्षा वाढवली गेली आहे. या स्फोटानंतर महाराष्ट्र पोलिसांनी नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीमबाग परिसरात देखील बंदोबस्त वाढवला आहे. त्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. राज्यातील मेट्रो स्टेशन, एअरपोर्टस, रेल्वेस्थानके, बसस्थानके सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ वर स्फोट झाला. एका वाहनात स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. स्फोटानंतर मोठी आग लागल्याचे वृत्त आहे. लाल किल्ल्याच्या गेट क्रमांक १ जवळ हा स्फोट झाला. दिल्ली पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. लाल किल्ल्यावर अनेकदा गर्दी असते. लाल किल्ल्याजवळील चांदणी चौक ही एक मोठी बाजारपेठ आहे, जिथे दररोज हजारो लोक येतात.
दिल्लीत हाय अलर्ट जारी
अधिकाऱ्यांनुसार, संध्याकाळी ६:५५ च्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती मिळाली आणि अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने आग आटोक्यात आणली. या घटनेत अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अग्निशमन विभागाने काय म्हटले?
दिल्ली अग्निशमन विभागाने या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती विभागाने दिली. त्यानंतर तीन ते चार वाहनांना आग लागली आणि त्यांचे नुकसान झाले.