Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांना भक्तांची अलोट गर्दी; उज्जैनच्या महाकाल मंदिरात पारंपरिक पूजा संपन्न

महाशिवरात्रीच्या निमित्ताने उज्जैनच्या महाकाल मंदिरात पहाटे विशेष पूजा करण्यात आली. उज्जैनमध्ये बाबा महाकालसाठी विशेष भस्म आरती करण्यात आली. बाबा महाकाल मंदिराचे दरवाजे ४४ तास खुले राहणार आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 15, 2026 | 11:51 AM
Mahashivratri 2026 devotees rush to 12 Jyotirlingas Mahakal Temple in Ujjain Bhsama arati pooja live

Mahashivratri 2026 devotees rush to 12 Jyotirlingas Mahakal Temple in Ujjain Bhsama arati pooja live

Follow Us
Close
Follow Us:
  • संपूर्ण देशात महाशिवरात्रीचा मोठा उत्साह
  • 12 ज्योतिर्लिंगी तीर्थक्षेत्री मोठी गर्दी
  • उज्जैनमध्ये उसळला भक्तांचा समुदाय
Mahashivratri 2026 : उज्जैन : महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. जागोजागी महादेवाच्या जयघोषाचा स्वर कानी येत आहे. (mahashivratri) सर्वत्र भक्तीमय वातावरण असून भगवान शिवाची आराधना केली जात आहे. दरम्यान, देशातील 12 ज्योतिर्लिंगी तीर्थक्षेत्री भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. दर्शनरांगा लागल्या असून भाविक मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेत आहेत. तसेच उज्जैनच्या महाकाल (Mahakal Ujjain) मंदिरामध्ये देखील भक्तांची लाट उसलळी असून पारंपारिक भस्म पूजा आणि आरती पार पडली आहे.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने उज्जैनच्या महाकाल मंदिरात पहाटे विशेष पूजा करण्यात आली. उज्जैनमध्ये बाबा महाकालसाठी विशेष भस्म आरती करण्यात आली. बाबा महाकाल मंदिराचे दरवाजे ४४ तास खुले राहणार आहेत. या काळात १० लाख भाविक मंदिरात येण्याची अपेक्षा आहे. उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात पहाटे ३ वाजता विशेष पंचामृत अभिषेक आणि भस्म आरती पूजा करण्यात आली. भस्म आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून भाविकांनी महाकाल मंदिरात गर्दी केली होती.

#WATCH | Uttar Pradesh | Devotees continue to arrive in Varanasi to offer prayers at the Kashi Vishwanath Temple on the occasion of #Mahashivratri2026 pic.twitter.com/c0h1H2gtwB — ANI (@ANI) February 15, 2026

हे देखील वाचा : लग्नाच्या आनंदात आले, मेट्रोच्या पिलरखाली सापडला मृत्यू; जौनपूरच्या सरपंचांचा मुंबईत दुर्दैवी अंत

उज्जैनमध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्त्व

बाबा महाकालांचे स्थान असलेल्या उज्जैनमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पहाटे ३ वाजता बाबा महाकाल यांची भस्म आरती करण्यात आली. त्याआधी बाबांना पंचामृताने (दूध, दही, तूप, साखर आणि मध) स्नान घालण्यात आले. चंदनाचा लेप लावण्यात आला आणि सुगंधी पदार्थ अर्पण करण्यात आले. बाबांना त्यांच्या आवडत्या विजयाने (भांग) सजवण्यात आले. त्यानंतर बाबांना पांढऱ्या वस्त्रात गुंफण्यात आले आणि त्यांना राख लावण्याची प्रक्रिया सुरू झाली. राखेने स्नान केल्यानंतर, बाबांची भस्म आरती झांजा, ढोलकी आणि शंखांच्या गजरात करण्यात आली.

हे देखील वाचा : ‘तो दावा निव्वळ मूर्खपणा’…; एपस्टीन प्रकरणावरून कपिल सिब्बल यांचा भाजपवर पलटवार

भीमाशंकर मंदिर महाशिवरात्रीला देखील बंद

12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले पुणे जिल्ह्यतील भीमाशंकर मंदिर हे मागील दोन महिन्यांपासून बंद आहे. या मंदिराच्या जिर्णाद्धाराच्या निमित्ताने मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. मात्र महाशिवरात्रीपर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र काम पूर्ण न झाल्याने महाशिवरात्रीदिनी देखील मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मंदिरात बांधकाम सुरु असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय ठेवण्यात आला आहे. याचा परिणाम मंदिराच्या आसपास असणाऱ्या व्यवसायावर देखील झाला आहे. याचा फटका व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.

Web Title: Mahashivratri 2026 devotees rush to 12 jyotirlingas mahakal temple in ujjain bhsama arati pooja live

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • bhimashankar
  • Mahakal Ujjain
  • mahashivaratri

संबंधित बातम्या

उपवासाच्या काळात अशक्तपणा येऊ नये म्हणून करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा
1

उपवासाच्या काळात अशक्तपणा येऊ नये म्हणून करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा

उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी कच्च्या केळींपासून झटपट बनवा केळीचे कुरकुरीत वडे, नोट करून घ्या रेसिपी
2

उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी कच्च्या केळींपासून झटपट बनवा केळीचे कुरकुरीत वडे, नोट करून घ्या रेसिपी

Mahashivratri 2026: ओम नम शिवाय! महाशिवरात्रीनिमित्त कुटुंबियांना आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय मराठमोळ्या शुभेच्छा
3

Mahashivratri 2026: ओम नम शिवाय! महाशिवरात्रीनिमित्त कुटुंबियांना आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय मराठमोळ्या शुभेच्छा

Mahashivratri 2026: पारधी आणि हरणाची महाशिवरात्रीशी जोडलेली कथा तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या
4

Mahashivratri 2026: पारधी आणि हरणाची महाशिवरात्रीशी जोडलेली कथा तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.