
Mahatma Gandhi name removed from MGNREGA Congress Priyanka Gandhi aggressive
सोमवारी लोकसभा खासदारांमध्ये या विधेयकाची प्रत वाटण्यात आली. या विधेयकाला ‘विकसित भारत – रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण) (VB-G RAM G) विधेयक, २०२५’ असे नाव देण्यात आले आहे. यामुळे या विधेयकावर राजकीय वाद निर्माण झाला आहे. जुन्या नावामध्ये महात्मा गांधी यांच्या नावाचा उल्लेख होता. मात्र महात्मा गांधींचे नाव काढून टाकत योजनेला नवीन नाव देण्यात आले आहे. यावरुन राजकीय वाद निर्माण झाला आहे.
नवीन विधेयकाबद्दल सरकारचे म्हणणे काय?
ग्रामीण विकास मंत्रालयाने सादर केलेल्या नवीन विधेयकात असे म्हटले आहे की त्यांचे उद्दिष्ट “विकसित भारत २०४७” या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत ग्रामीण विकासासाठी एक नवीन चौकट तयार करणे आहे. त्यात असेही म्हटले आहे की कामकाजाच्या दिवसांची संख्या १०० वरून १२५ पर्यंत वाढवली जाईल. मात्र या बदलांबरोबर नाव देखील बदलण्यात आल्याने कॉंग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
हे देखील वाचा : नागपूरची थंडी नेत्यांना होईना सहन! हिवाळी अधिवेशनामध्ये दोन मंत्री,10 आमदार अन् 1355 कर्मचारी पडले आजारी
काँग्रेस पक्षाने सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. वायनाडच्या पक्षाच्या खासदार प्रियंका गांधी यांनी महात्मा गांधींचे नाव का वगळले जात आहे असा प्रश्न उपस्थित केला. इतर विरोधी नेतेही सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेत आहेत. तुम्हाला राम प्रिय तर गांधींचा द्वेष का?असा सवाल प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला. नवीन नावामध्ये रामाच्या नावाचा उल्लेख आहे. भाजप आणि पंतप्रधान मोदींनाही सर्वांप्रमाणेच राम आवडतो. पण महात्मा गांधींबद्दल द्वेष का? त्यांनी शेवटच्या श्वासातही रामाचे नाव घेतले, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.
सुप्रिया श्रीनाते यांचा जोरदार हल्लाबोल
तीन दिवसांपूर्वी, १२ डिसेंबर रोजी, केंद्रीय मंत्रिमंडळ मनरेगाचे नाव पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असे ठेवत असल्याची बातमी आली. तथापि, अद्याप सरकारी अधिसूचना जारी झालेली नव्हती. काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.
हे देखील वाचा: पतीची फेसबुक लाईव्हवर हत्या अन् बदलला राजकीय मार्ग; तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश
सुप्रिया श्रीनाते म्हणाल्या की मोदीजींना काँग्रेसच्या योजनांची नावे बदलून त्यांना स्वतःचे बनवण्याची जुनी सवय आहे. ते ११ वर्षांपासून हे करत आहेत. ते यूपीएच्या योजनांची नावे बदलून प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःचा शिक्का मारत आहेत. सुप्रिया यांनी काँग्रेसच्या काळात सुरू झालेल्या योजनांची नावे इंस्टाग्रामवर शेअर केली. त्यांनी दावा केला की या योजनांची नावे फक्त बदलण्यात आली आहेत.यामध्ये कोणतीही नवीन तरतूद करण्यात आली नाही.
MGNREGA का आणि कधी सुरू झाली?
मनरेगा ही जगातील सर्वात मोठ्या काम हमी कार्यक्रमांपैकी एक आहे, जो २००५ मध्ये ग्रामीण विकास मंत्रालयाने ही योजना सुरू केली होती. सुरुवातीला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५ म्हणून ओळखला जाणारा हा कायदा प्रत्येक कुटुंबाला दर आर्थिक वर्षात किमान १०० दिवसांचा हमी रोजगार प्रदान करतो. १५ दिवसांच्या आत काम न मिळालेल्यांना बेरोजगारी भत्ता देखील प्रदान करतो.