Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Budget 2026 : विरोधकांना अर्थसंकल्पातून नाही कोणती अपेक्षा; प्रियांका गांधींचा नाराजीचा सूर

Union Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. मात्र यामधून काहीही अपेक्षा नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 01, 2026 | 11:47 AM
Priyanka Gandhi expressed disappointment not expectations from India union budget 2026 by Nirmala Sitharaman

Priyanka Gandhi expressed disappointment not expectations from India union budget 2026 by Nirmala Sitharaman

Follow Us
Follow Us:
  • भारताचा अर्थसंकल्प 2026-27 सादर
  • निर्मला सीतारमण यांनी सादर केला 9व्यांदा अर्थसंकल्प
  • विरोधकांनी कोणतीही अपेक्षा नसल्याचे म्हणत व्यक्त केली  नाराजी
Union Budget 2026 : नवी दिल्ली : भारताचा अर्थसंकल्प 2026-27 सादर केला जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 9 व्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांचा हा नवा विक्रम असणार आहे. जेव्हा जेव्हा ‘बजेट’ (Union Budget 2026)सादर होते, तेव्हा सामान्य माणूस नेहमी उत्पन्न वाढवण्याच्या किंवा टॅक्स वाचवण्याच्या संधी शोधत असतो. संपूर्ण देशाचे लक्ष भारताच्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. मात्र विरोधकांमध्ये यादिवशी देखील नाराजीचा सूर उमटला आहे. काँग्रेस नेत्या आणि खासदार प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी अर्थसंकल्पाकडून कोणत्याही अपेक्षा नसल्याचे सांगितले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी संसदेच्या आवारामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडून सामान्याच्या हिताचे निर्णय येतील अशी अपेक्षा नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. संसदेच्या आवारामध्ये माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रियांका गांधी म्हणाल्या की मला जास्त काही अपेक्षा तर नाहीत. पण बघूया, अशी प्रतिक्रिया प्रियांका गांधी यांनी दिली आहे.

हे देखील वाचा : आधी राष्ट्रपतींची भेट अन् नंतर संसदेच्या आवारात फोटोशूट…! अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी काय असतो Protocol

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी देखील केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “हा सुधारणांचा अर्थसंकल्प नाही, तर तो विकृत अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प देशाच्या ५% लोकसंख्येसाठी आहे. भाजप फक्त स्वतःच्या लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.” समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव म्हणाले, “या अर्थसंकल्पाकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही.” अशा शब्दांत विरोधक आपली नाराजी व्यक्त करत आहेत.

काँग्रेस खासदार मनीष तिवारी काय म्हणाले?

भारताच्या अर्थसंकल्पाबाबत काँग्रेस खासदार मनीष तिवारी म्हणाले, “भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक संरचनात्मक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे ज्या एका दशकापासून सोडवल्या गेलेल्या नाहीत. खाजगी भांडवली गुंतवणुकीत कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही. थेट परकीय गुंतवणुकीत घट झाली आहे. मला आशा आहे की अर्थमंत्री भारतीय अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक असमानता ओळखतील आणि त्या दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील.”अशी अपेक्षा मनीष तिवारी यांनी व्यक्त केली.

हे देखील वाचा : Union Budget 2026: आजपासून वाढणार स्मार्टफोन्सच्या किंमती? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या

आप खासदार संजय सिंह यांची प्रतिक्रिया

आप खासदार संजय सिंह म्हणाले, “पंतप्रधानांनी पहिल्यांदा शपथ घेतली तेव्हा त्यांनी देशातील तरुणांना आश्वासन दिले होते की ते दरवर्षी २० दशलक्ष नोकऱ्या निर्माण करतील. म्हणून, आम्हाला २४ कोटी नोकऱ्यांचा हिशोब हवा आहे. नोकऱ्यांच्या आश्वासनाचे काय झाले? शेतकऱ्यांच्या उत्पादनाची किंमत दुप्पट करण्याच्या आश्वासनाचे काय झाले? आम्ही सरकारला विचारू इच्छितो: काळा पैसा परत आणण्याच्या आश्वासनाचे काय झाले? त्यांनी याचे उत्तर द्यावे. त्यांनी महागाईचे स्पष्टीकरण द्यावे. कधी ते कर वाढवतात, कधी ते कमी करतात. सरकारने देशाची आर्थिक व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. आज आपण पाहू की ती पुन्हा रुळावर कशी आणली जाईल.” असा टोला संजय सिंह यांनी लगावला आहे.

Web Title: Priyanka gandhi expressed disappointment not expectations from india union budget 2026 by nirmala sitharaman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • budget 2026
  • Budget 2026-2027
  • Nirmala Sitaraman
  • Priyanka Gandhi

संबंधित बातम्या

Dyanesh Kumar Impeachment: १३ कोटी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप! ज्ञानेश कुमार राजीनाम्याच्या दबावात
1

Dyanesh Kumar Impeachment: १३ कोटी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप! ज्ञानेश कुमार राजीनाम्याच्या दबावात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.