लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल 4 जूनला जाहीर होणार असून संपूर्ण देशाच या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागून राहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने देशात 400 जागांवर दावा केला आहे. म्हणूनच एनडीएलएला 400 जग मिळतात की नाहीय याकडे सर्वांचे लक्ष राहिल आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालसह इतर आठ राज्यांमधील एकूण 57 मतदारसंघांमध्ये मतदान होणार. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे वक्त्यव केले आहे.
नरेंद्र मोदींनी बुधवारी (28 मे) पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगना या मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी मोदी म्हणाले, “बंगालमध्ये भाजपला मोठा विजय मिळेल. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजप बंगालमध्ये खूप सक्रिय झाला आहे. तसेच निवडणुकीनंतर सहा महिन्यांत देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. विरोधकांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानामुळे विरोधकांनी देखील धसका घेतला आहे, असं म्हणायलं वावग ठरणार नाही. नेमका मोदींचा इशारा कोणासाठी होता???
प्रचारसभेत नरेंद्र मोदी या मतदारसंघात म्हणाले की, “तुमचं एक मत देशाची दिशा बदलू शकता. 4 जूनला लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर सहा महिन्यांत देशात मोठा भूकंप होणार आहे. घराणेशाहीचे राजकारण करून अनेक पक्ष नष्ट होतील. यावेळी मोदींनी पुढील महिनाभरात काय होणार याबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत. पण,परंतु, त्यांनी बंगालमध्ये हे भाषण केल्यामुळे त्यांचा रोख ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाकडे असावा, असं बोललं जात आहे. तर काही राजकीय विश्लेषक याचे वेगळे अर्थ लावत आहेत.
बंगालमध्ये लोकसभेसाठी ९ जागांवर १ जून रोजी मतदान होणार आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये 18 जागा जिंकल्या. त्यामुळे त्यामुळे भाजपला येथून 18 हून अधिक जागांची आशा असेल. लोकसभा निवडणुकीदरम्यान बंगालमधील त्यांची ही शेवटची सभा असेल, असे पंतप्रधान मोदींनी प्रचारादरम्यान सांगितले. यानंतर मी ओडिशाला जाईन. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पीएम मोदी पंजाबमध्ये प्रचार करणार आहेत. मंगळवारी कोलकाता येथे पंतप्रधान मोदींचा रोड शो देखील असणार आहे. (फोटो सौजन्य- नरेंद्र मोदी X (Twitter))






