Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mamata Banerjee INDIA Bloc Rally : ‘बंगालचा बदला घेणार..’ ममतादीदींचं भाजपला ओपन चॅलेंज, ज्ञानेश कुमारांना दिला थेट इशारा

Mamata Banerjee INDIA Bloc Rally : दिल्लीतील रामलीला मैदानावर INDIA आघाडीच्या महारॅळीत ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी मतचोरी आणि SIR प्रक्रियेवर निशाणा साधत बंगालच्या राजकारणात लोकशाही मार्गाने बदला घेण्याचा इशारा दिला.

  • By विवेक
Updated On: Nov 01, 2026 | 07:26 PM
Mamata Banerjee INDIA Alliance Rally

Mamata Banerjee INDIA Alliance Rally

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील रॅलीत ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल
  • ‘बंगालचा पराभव मान्य नाही, लोकशाही मार्गाने बदला घेणार’
  • SIR प्रक्रियेवरून भाजपला घेरलं
 

नवी दिल्ली : दिल्लीतील रामलीला मैदानावर INDIA आघाडीच्या रॅलीत पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली. ‘बंगालमध्ये आमचा पराभव झालेला नाही, आम्हाला हरवण्यात आलं आहे. याचा बदला लोकशाही मार्गाने घेऊ,’ असा इशाराही त्यांनी दिला. (Mamata Banerjee INDIA Bloc Rally)

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि SIR प्रक्रियेच्या निषेधार्थ INDIA आघाडीने दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅली आयोजित केली होती. या सभेला देशभरातील विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील SIR प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. या प्रक्रियेमुळे बंगालमधील एक कोटीपेक्षा जास्त मतदारांचा मतदानाचा अधिकार काढून घेतल्याचा दावा त्यांनी केला.

दिल्लीत मोठं शक्तिप्रदर्शन, 20 विरोधी पक्ष एकत्र, राहुल गांधी काय म्हणाले?

‘जॉनी जॉनी येस पापा’ म्हणत ज्ञानेश कुमारांवर निशाणा

ममता बॅनर्जी यांच्या भाषणातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली ती त्यांची बालकवितेच्या चालीवरील टीका. ‘व्हॅनिश व्हॅनिश येस पापा, व्होट चोरी येस पापा, लोकशाही चोरी येस पापा,’ अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. याशिवाय शेतकऱ्यांचा सन्मान आणि मजुरांच्या घरांबाबतही त्यांनी भाजपवर आरोप केले. ‘बीजेपी पाहिजे का? नो पापा, ज्ञानेश कुमार हवेत का? नो पापा,’ असं म्हणत त्यांनी उपस्थितांना भाजपला सत्तेतून हटवण्याचं आवाहन केलं.

SIR प्रक्रियेवर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बंगालमधील जनता या प्रक्रियेची बळी ठरली आहे. आम्ही शरणागती पत्करणार नाही. प्राण गेला तरी चालेल, पण लोकशाहीसाठी लढा सुरूच ठेवू, बंगालमध्ये आमचा पराभव झालेला नाही, आम्हाला हरवण्यात आलं आम्ही याचा बदला घेऊ, आम्ही हा लढा लोकशाही मार्गाने घेऊ, अशी भूमिका त्यांनी मांडली.

अखिलेश यादवांचाही भाजपला इशारा

या सभेत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही भाजपवर टीका केली. २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष पुन्हा सत्तेत येणार नाहीत, असं विधान त्यांनी केलं.

एकीकडे ममता बॅनर्जींची आक्रमक टीका, तर दुसरीकडे अखिलेश यादवांचा २०२७ चा इशारा, यामुळे INDIA आघाडीच्या या रॅलीतील भाषणांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

ज्ञानेश कुमारांवर निर्णय का घेतला नाही? शरद पवारांचा केंद्र सरकारला सवाल; सुप्रिया सुळे दिल्लीत आंदोलनात सहभागी

💡

Frequently Asked Questions

  • Que: ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका करताना कोणत्या कवितेचा उल्लेख केला?

    Ans: ममता बॅनर्जी यांनी 'Johnny Johnny Yes Papa' या प्रसिद्ध बालकवितेचा आधार घेत भाजप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली.

  • Que: ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील SIR प्रक्रियेबाबत काय दावा केला?

    Ans: SIR प्रक्रियेमुळे पश्चिम बंगालमधील एक कोटीपेक्षा जास्त मतदारांचा मतदानाचा अधिकार काढून घेतल्याचा दावा त्यांनी केला.

  • Que: ममता बॅनर्जी यांनी भाजपला काय इशारा दिला?

    Ans: बंगालमध्ये आपला पराभव झाला नसून आपल्याला हरवण्यात आल्याचा दावा करत त्यांनी लोकशाही मार्गाने याचा बदला घेणार असल्याचं म्हटलं.

Web Title: Mamata banerjee india bloc rally slams gyanesh kumar sir vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • Gyanesh Kumar
  • INDIA Alliance
  • Mamata Banerjee

संबंधित बातम्या

Rahul Gandhi INDIA Alliance Rally : दिल्लीत मोठं शक्तिप्रदर्शन, 20 विरोधी पक्ष एकत्र, राहुल गांधी काय म्हणाले?
1

Rahul Gandhi INDIA Alliance Rally : दिल्लीत मोठं शक्तिप्रदर्शन, 20 विरोधी पक्ष एकत्र, राहुल गांधी काय म्हणाले?

Rahul Gandhi : ‘भाजपने दुकाने सक्तीने बंद पाडली,’ राहुल गांधींचा गंभीर आरोप, दिल्लीत नेमकं काय घडलं?
2

Rahul Gandhi : ‘भाजपने दुकाने सक्तीने बंद पाडली,’ राहुल गांधींचा गंभीर आरोप, दिल्लीत नेमकं काय घडलं?

Sharad Pawar : ज्ञानेश कुमारांवर निर्णय का घेतला नाही? शरद पवारांचा केंद्र सरकारला सवाल; सुप्रिया सुळे दिल्लीत आंदोलनात सहभागी
3

Sharad Pawar : ज्ञानेश कुमारांवर निर्णय का घेतला नाही? शरद पवारांचा केंद्र सरकारला सवाल; सुप्रिया सुळे दिल्लीत आंदोलनात सहभागी

दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेससह इंडिया आघाडीकडून आज काढली जाणार रॅली; गर्दी जमणे झाले सुरु
4

दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेससह इंडिया आघाडीकडून आज काढली जाणार रॅली; गर्दी जमणे झाले सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.