Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi INDIA Alliance Rally : दिल्लीत मोठं शक्तिप्रदर्शन, 20 विरोधी पक्ष एकत्र, राहुल गांधी काय म्हणाले?

Rahul Gandhi INDIA Alliance Rally : दिल्लीच्या रामलीला मैदानावर INDIA आघाडीच्या महारॅलीत राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले.

  • By विवेक
Updated On: Nov 01, 2026 | 06:42 PM
Rahul Gandhi INDIA Alliance Rally

Rahul Gandhi INDIA Alliance Rally

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील रामलीला मैदानावर INDIA आघाडीचं शक्तिप्रदर्शन
  • राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांना थेट इशारा
  • मतचोरी आणि SIR वरून निवडणूक आयोगाला घेरलं
 

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर INDIA आघाडीने मोठं आंदोलन केलं. तब्बल चार तास चाललेल्या या रॅलीत 20 विरोधी पक्ष सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. (Rahul Gandhi INDIA Alliance Rally)

या आंदोलनात मल्लिकार्जुन खर्गे, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती आणि एम. ए. बेबी यांच्यासह अनेक प्रमुख विरोधी नेत्यांनी भाषणं केली. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि SIR प्रक्रियेच्या निषेधार्थ ही रॅली आयोजित करण्यात आली होती.

राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांना थेट इशारा

सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. ‘ज्ञानेश कुमार यांना रात्री झोप लागत नाही. ते घाबरलेले आहेत. त्यांनी देशाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे,’ असं वक्तव्य त्यांनी केलं.

भाजपने दुकाने सक्तीने बंद पाडली,’ राहुल गांधींचा गंभीर आरोप, दिल्लीत नेमकं काय घडलं?

पुढे बोलताना त्यांनी, ‘ज्ञानेश कुमार यांच्यानंतर आम्ही तुमच्यासमोर उभे राहणार आहोत. मतचोरीविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल आणि देशाला न्याय मिळेल,’ असं म्हटलं.

मोदी-शाहांवरही राहुल गांधींचा निशाणा

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरही टीका केली. मात्र, आपला लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ‘आम्ही मोदी, शाह किंवा ज्ञानेश कुमार यांचा द्वेष करत नाही. आम्ही मोहब्बत की दुकान चालवणारे लोक आहोत,’ असं म्हणत त्यांनी अहिंसेचा मार्ग कायम ठेवण्याची भूमिका मांडली.

SIR आणि मतदार यादीवरून गंभीर आरोप

2024 च्या निवडणुकीनंतर 13.5 कोटी मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा राहुल गांधी यांनी सभेत केला. प्रत्येक सात मतदारांपैकी एक मतदार वगळल्याचंही ते म्हणाले. हे दावे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवर आधारित असल्याचं त्यांनी सांगितलं.

शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य

देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचं योग्य फळ मिळायला हवं, तर विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर रोजगार मिळायला हवा, असं राहुल गांधी म्हणाले. देश केवळ दोन-तीन लोकांच्या मालकीचा नसावा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

एकंदरीत, दिल्लीतील या रॅलीत INDIA आघाडीने निवडणूक आयोग, SIR आणि मतदार यादीच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं. राहुल गांधी यांच्या भाषणातील आरोप आणि विधानांमुळे राजकीय चर्चेला नवा विषय मिळाला आहे.

ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिल्लीतील INDIA आघाडीच्या रॅलीचा मुख्य उद्देश काय होता?

    Ans: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, SIR प्रक्रियेचा निषेध आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित करणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता.

  • Que: राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्याबाबत काय वक्तव्य केलं?

    Ans: राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर देशाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका मांडली.

  • Que: राहुल गांधी यांनी सभेत कोणते प्रमुख मुद्दे उपस्थित केले?

    Ans: राहुल गांधी यांनी मतचोरी, SIR प्रक्रिया, मतदार यादी, संविधानाचं संरक्षण, शेतकऱ्यांच्या समस्या आणि विद्यार्थ्यांच्या रोजगाराचा मुद्दा उपस्थित केला.

Web Title: Rahul gandhi india alliance rally gyanesh kumar sir vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • Gyanesh Kumar
  • INDIA Alliance
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi : ‘भाजपने दुकाने सक्तीने बंद पाडली,’ राहुल गांधींचा गंभीर आरोप, दिल्लीत नेमकं काय घडलं?
1

Rahul Gandhi : ‘भाजपने दुकाने सक्तीने बंद पाडली,’ राहुल गांधींचा गंभीर आरोप, दिल्लीत नेमकं काय घडलं?

Sharad Pawar : ज्ञानेश कुमारांवर निर्णय का घेतला नाही? शरद पवारांचा केंद्र सरकारला सवाल; सुप्रिया सुळे दिल्लीत आंदोलनात सहभागी
2

Sharad Pawar : ज्ञानेश कुमारांवर निर्णय का घेतला नाही? शरद पवारांचा केंद्र सरकारला सवाल; सुप्रिया सुळे दिल्लीत आंदोलनात सहभागी

Harshvardhan Sapkal : फडणवीसांचा राहुल गांधींवर चीन फंडिंगचा आरोप, ‘चीनकडून मोदींना फंडिंग झालं होतं का?’ सपकाळांचा उलट सवाल
3

Harshvardhan Sapkal : फडणवीसांचा राहुल गांधींवर चीन फंडिंगचा आरोप, ‘चीनकडून मोदींना फंडिंग झालं होतं का?’ सपकाळांचा उलट सवाल

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल
4

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.