Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar : ज्ञानेश कुमारांवर निर्णय का घेतला नाही? शरद पवारांचा केंद्र सरकारला सवाल; सुप्रिया सुळे दिल्लीत आंदोलनात सहभागी

Sharad Pawar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत केंद्र सरकारने वेळेत निर्णय घ्यायला हवा होता, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं. दिल्लीतील INDIA आघाडीच्या आंदोलनात सुप्रिया सुळे सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Nov 01, 2026 | 04:14 PM
Sharad Pawar

Sharad Pawar

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीत INDIA आघाडीचे आंदोलन
  • दिल्लीतील आंदोलनात सुप्रिया सुळे सहभागी
  • पत्रकार परिषदेत शरद पवारांनी दिली माहिती
 

बारामती, प्रतिनिधी : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत केंद्र सरकारने वेळेत निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, सरकारकडून यासंदर्भात निर्णय न झाल्याने विरोधी पक्षांना एकत्र येऊन आंदोलन करण्याची वेळ आली आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. दिल्लीतील आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य नेते सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Sharad Pawar)

माळेगाव (ता. बारामती) येथील गोविंद बाग या निवासस्थानी रविवारी (दि. १ नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या वतीने आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवरून विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या वतीने आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर विविध विरोधी पक्षांचे नेते एकत्र येत असल्याचे पवार यांनी सांगितले.

फडणवीसांचा राहुल गांधींवर चीन फंडिंगचा आरोप, ‘चीनकडून मोदींना फंडिंग झालं होतं का?’ सपकाळांचा उलट सवाल

पवारांचे संपूर्ण लक्ष दुष्काळग्रस्त नागरिकांच्या प्रश्नांवर केंद्रित

दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर होत असून, अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या आपले संपूर्ण लक्ष दुष्काळग्रस्त नागरिकांच्या प्रश्नांवर केंद्रित असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

एका बाजूला निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण तापले असताना, दुसरीकडे महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीने ग्रामीण भागासमोर गंभीर आव्हान उभे केले आहे. या दोन्ही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्यातील पाणी, चारा आणि दुष्काळ निवारणाच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे.

ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल

💡

Frequently Asked Questions

  • Que: शरद पवार यांनी ज्ञानेश कुमार यांच्याबाबत काय वक्तव्य केलं?

    Ans: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत केंद्र सरकारने वेळेत निर्णय घेणं अपेक्षित होतं. मात्र, निर्णय न झाल्याने विरोधी पक्षांना एकत्र येऊन आंदोलन करण्याची वेळ आली, असं शरद पवार म्हणाले.

  • Que: दिल्लीतील आंदोलनात सुप्रिया सुळे सहभागी होणार आहेत का?

    Ans: होय. शरद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अन्य नेते दिल्लीतील आंदोलनात सहभागी होणार आहेत.

  • Que: शरद पवार यांनी महाराष्ट्रातील कोणत्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं?

    Ans: राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधलं.

Web Title: Sharad pawar on gyanesh kumar delhi india alliance protest vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • Gyanesh Kumar
  • INDIA Alliance
  • MP Supriya Sule
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेससह इंडिया आघाडीकडून आज काढली जाणार रॅली; गर्दी जमणे झाले सुरु
1

दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेससह इंडिया आघाडीकडून आज काढली जाणार रॅली; गर्दी जमणे झाले सुरु

Mallikarjun Kharge News:  मुख्य निवडणूक आयुक्तांवर ६ गंभीर आरोप! मल्लिकार्जुन खर्गेंनी मांडला महाभियोगाचा प्रस्ताव
2

Mallikarjun Kharge News: मुख्य निवडणूक आयुक्तांवर ६ गंभीर आरोप! मल्लिकार्जुन खर्गेंनी मांडला महाभियोगाचा प्रस्ताव

Rahul Gandhi Ramlila Maidan Rally:’उद्या भेटू’ म्हणत राहुल गांधींनी शेअर केला रामलीला मैदानातील सभेचा नकाशा आणि प्लॅन
3

Rahul Gandhi Ramlila Maidan Rally:’उद्या भेटू’ म्हणत राहुल गांधींनी शेअर केला रामलीला मैदानातील सभेचा नकाशा आणि प्लॅन

दौंडच्या हिंगणीगाडा येथील स्टोन क्रशरचा प्रश्न पुन्हा पेटणार; सुप्रिया सुळेंची थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
4

दौंडच्या हिंगणीगाडा येथील स्टोन क्रशरचा प्रश्न पुन्हा पेटणार; सुप्रिया सुळेंची थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.