
Manager of Birch by Romeo Lane nightclub arrested Goa fire Marathi News
उत्तर गोव्यात झालेल्या या नाईटक्लब आगीत २३ जणांचा गुदमरून मृत्यू झाला, तर दोन जण भाजल्याने मृत्युमुखी पडले. उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील बर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबमध्ये लागलेल्या आगीत एकूण २५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृतांमध्ये चार पर्यटक आणि १४ नाईटक्लब कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, तर सात जणांची ओळख पटवणे अद्याप बाकी आहे. दरम्यान, बर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबच्या मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : गोव्यातील अग्नितांडवावर PM मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या वारसांना मिळणार 2 लाखांची मदत
गोव्यातील या आगीमध्ये २३ जणांचा मृत्यू गुदमरून झाला, तर २ जण भाजल्याने झाले. तर तिघांचे मृतदेह गंभीर जळालेल्या अवस्थेत आढळले. याचा अर्थ असा की आगीत भाजल्यामुळे फक्त तीन जणांचा मृत्यू झाला, तर उर्वरित लोक विषारी धुरामुळे मरण पावले. गोवा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रात्री १ वाजण्याच्या सुमारास नाईटक्लबच्या स्वयंपाकघराजवळ गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट इतका जबरदस्त होता की काही क्षणातच आग संपूर्ण इमारतीत पसरली. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की स्फोटाच्या वेळी आत नियमित तयारी आणि बंद करण्याचे काम सुरू होते. गॅस गळतीमुळे स्फोट झाला.
हे देखील वाचा : लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच स्मृती मानधनाने केले वक्तव्य! म्हणाली – ‘पुढे जाण्याची वेळ…
या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी लिहिले की, गोव्यातील अर्पोरा येथील आगीची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जी यांच्याशी परिस्थितीबद्दल बोललो. राज्य सरकार बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.