Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Waqf Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयक कायद्याच्या कचाट्यात? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

एखादी मालमत्ता ही वक्फअंतर्गत येते की नाही, हे ठरवण्याचा अधिकार वक्फ बोर्डाला नसेल. अस्तित्वात असणाऱ्या त्रिसदस्यीय वक्फ लवादाची सदस्यसंख्या आता दोन असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 08, 2025 | 03:42 PM
Waqf Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयक कायद्याच्या कचाट्यात? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: नुकतेच संदेचे अधिवेशन पार पडले. हे अधिवेशन वादळी ठरले. कारण या अधिवेशनात वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आले. हे विधेयक लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले.देशभरात अनेक ठिकाणी या विधेयकांचे स्वागत करण्यात आले. तर काही ठिकाणी विधेयकाविरुद्ध आंदोलने केली जात आहे. मात्र आता हे वक्फ संशोधन विधेयकाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोचले आहे.

वक्फ संशोधन विधेयकाल राष्ट्रपतींनी देखील मंजूरी दिली आहे. या विधेयकांचे रूपांतर आता कायद्यात झाले आहे. अनेक ठिकाणी या कायद्याचे स्वागत तर काही ठिकाणी विरोध केला जात आहे. या विधेयकाविरुद्ध जवळपास 15 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत. या बिलाविरुद्ध अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत.

दरम्यान पुढील आठवड्यात यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सर्व याचिकानवर एकत्रित सुनावणी होण्याचा अंदाज आहे. हे विधेयक अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचे आरोप या सर्व याचिकेतून करण्यात आले आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले आहे. वक्फ सुधारणा विधेयकाला सत्ताधारी पक्षाने ऐतिहासिक विधेयक म्हटले तर विरोधकांनी विरोध केला आणि हा संविधानावरील हल्ला असल्याचे म्हटले आहे. गुरुवारी (दि.3) राज्यसभेत हे विधेयक चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. हे विधेयक येथूनही मंजूर झाले. दुरुस्ती विधेयकातील व्याख्येनुसार, किमान पाच वर्षे इस्लामचे पालन करणाऱ्या आणि अशा मालमत्तेची मालकी असलेल्या कोणत्याही व्यक्तीने दिलेली देणगी म्हणजे वक्फ होय. वक्फच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांकडून काढून ते जिल्हाधिकारी किंवा उपायुक्तांना असतील. तसेच केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्यस्तरीय वक्फ बोर्डातले दोन प्रतिनिधी बिगरमुस्लिम असावेत. बोहरा मुस्लिम आणि आगाखानी मुस्लिम समुदायाला स्वतंत्र वक्फ बोर्ड स्थापन करण्याची परवानगी असेल. केंद्रीय पोर्टल आणि डेटाबेसमध्ये वक्फची नोंदणी केली जाईल.

Waqf Amendment Bill : संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ विधेयक मंजूर; ‘हे’ होऊ शकतील आता महत्त्वाचे बदल

आणखी काय होतील बदल?

एखादी मालमत्ता ही वक्फअंतर्गत येते की नाही, हे ठरवण्याचा अधिकार वक्फ बोर्डाला नसेल. अस्तित्वात असणाऱ्या त्रिसदस्यीय वक्फ लवादाची सदस्यसंख्या आता दोन असेल. या लवादाचा निर्णय अंतिम असणार नाही. लवादाने दिलेल्या निर्णयाविरोधात 90 दिवसांच्या आत उच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे. 12 वर्षांहून अधिक काळ एखाद्या व्यक्तीकडे वक्फच्या जमिनींचा ताबा असेल किंवा त्याने त्यावर अतिक्रमण केलं असेल तर ती व्यक्ती या नव्या विधेयकाच्या आधारे त्या जमिनींचे मालक होऊ शकते.

 

Web Title: Many petition file in supreme court against waqf amendment bill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 03:42 PM

Topics:  

  • Central government
  • Supreme Court
  • Waqf Amendment Bill

संबंधित बातम्या

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात ३ टक्के, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
1

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात ३ टक्के, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर
2

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर

Supreme Court on Firecrackers: दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘फटाक्यांवर पूर्ण बंदी शक्य नाही’, मात्र ही अट घातली
3

Supreme Court on Firecrackers: दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘फटाक्यांवर पूर्ण बंदी शक्य नाही’, मात्र ही अट घातली

Supreme Court News: दिवाणी न्यायाधीश होण्यासाठी 3 वर्षांच्या वकिली सरावाची अट रद्द: सर्वोच्च न्यायालय
4

Supreme Court News: दिवाणी न्यायाधीश होण्यासाठी 3 वर्षांच्या वकिली सरावाची अट रद्द: सर्वोच्च न्यायालय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.