Maratha Leader Manoj Jarange patil delhi Maratha convention political news
Manoj Jarange Patil in Delhi : नवी दिल्ली : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली. यानंतर जरांगे पाटील यांचे मुंबईमध्ये यशस्वी आंदोलन पार पडले. जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर पाच दिवस उपोषण केल्यामुळे राज्य सरकारला मागण्या मान्य कराव्या लागल्या. हैदराबाद गॅझिट लागू करण्यासह जरांगे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. यानंतर आरक्षणाचे वादळ शांत झाले असल्याच्या चर्चा होत्या. आता मात्र मनोज जरांगे पाटील यांनी चलो दिल्लीचा नारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलन यशस्वी झाल्याचे म्हणत आरक्षण मिळाले असल्याचे आझाद मैदानावरुन जाहीर केले. त्यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य देखील झाल्या. याबाबत शासन आदेश देखील काढण्यात आला. जरांगे पाटील आणि त्यांच्या टीमने हा शासन आदेश वाचल्यानंतर उपोषण सोडले. मात्र यानंतर पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनोज जरांगे पाटील हे आता दिल्लीमध्ये जाऊन मराठा समाजाचे अधिवेशन घेणार आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका असताना आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मराठ्यांचं वादळ आता दिल्लीमध्ये धडकणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी चलो दिल्लीचा नारा दिला आहे. देशभरातील मराठा समाजाचे ते दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार आहेत. लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर होणार आहे. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटच्या अंमलबजावणी नंतर दिल्लीमध्ये मराठा समाजाचं अधिवेशन होणार आहे. धाराशिवमध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बातमी अपडेट होत आहे.