Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Marathi Breaking Live Marathi Headlines : देश-विदेशासह क्रीडा, सामाजिक, राजकीय, मनोरंजन यांसह इतरही क्षेत्रातील प्रमुख घडामोडींची अपडेट्स फक्त एका क्लिकवर...ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 31, 2025 | 07:18 PM
Top Marathi News Today : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज येण्याची शक्यता

Top Marathi News Today : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज येण्याची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज  (दि.31) आला आहे. तब्बल १७ वर्षांनंतर हा निकाल आला आहे. गुरुवारी न्या. ए.के. लाहोटी विशेष न्यायालयात निकाल देण्यात आला. यामध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

सर्वाधिक चर्चेत असलेल्या दहशतवादी घटनांपैकी एक असलेला हा स्फोट होता. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. असे असताना आता यातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. महाराष्ट्रातील मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल १७ वर्षांनंतर आला आहे. या प्रकरणातील निकाल आज एनआयएच्या विशेष न्यायालयाकडून जाहीर करण्यात आला.

 

The liveblog has ended.
  • 31 Jul 2025 07:18 PM (IST)

    31 Jul 2025 07:18 PM (IST)

    Pranjal Khewalkar: मोठी बातमी! ड्रग्ज प्रकरणात प्रांजल खेवलकरांना कोर्टाचा दिलासा, जामिनाचा मार्ग मोकळा?

    पुणे: रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टीमध्ये रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर राज्यात नेत्यांच्या एकमेकांच्या आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. दरम्यान आज प्रांजल खेवलकरांसह अन्य आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले होते. पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकरांना अटक करण्यात आली होती. कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

  • 31 Jul 2025 06:59 PM (IST)

    31 Jul 2025 06:59 PM (IST)

    Manikrao Kokate: राजीनामा नाहीच? ऑनलाईन रमी खेळल्याने मिळणार ‘क्रीडा’ खातं, काय येणार कोकाटेंच्या नशिबी?

    मुंबई: राज्याचे विद्यमान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विधानभवनात ऑनलाईन रमी खेळतच त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्या व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी नाही तर सरकार भिकारी आहे असे वादग्रस्त विधान केले. त्यावर मुख्यमंत्री आसनी उपमुख्यमंत्र्यानी नाराजी व्यक्त केली. मात्र आता माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे म्हटलें जात आहे. त्यांना कदाचित क्रीडा खाते मिळण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

  • 31 Jul 2025 06:27 PM (IST)

    31 Jul 2025 06:27 PM (IST)

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी मिळणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता

    PM Kisan Yojana Marathi News: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता येत्या 2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित केला जाणार आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत 2 ऑगस्ट रोजी वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीबाबत आणि अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली.

  • 31 Jul 2025 06:07 PM (IST)

    31 Jul 2025 06:07 PM (IST)

    सैन्यातले सहकारी ब्रिगेडियर बनले, कर्नल पुरोहित यांचं काय? सैन्यात बढती मिळणार का?

    २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून न्यायालयाने गुरुवारी माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व सात जणांची निर्दोष मुक्तता केली. आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे नाहीत, केवळ संशयाने निष्कर्ष काढता येत नाही, असं न्यायालयाने निकाल देताना म्हटलं आहे.

  • 31 Jul 2025 05:49 PM (IST)

    31 Jul 2025 05:49 PM (IST)

    मॅट हेन्रीने रचला इतिहास! दोनच किवी गोलंदाजांनी झिम्बाब्वेला पहिल्याच दिवशी गुंडाळलं

    न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांच्यातील कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी किवी संघाने आपला जलवा दाखवून दिला आहे. या सामन्यात न्यूझीलंड यजमान झिम्बाब्वे संघावर वर्चस्व गाजवताना दिसून येत होता. त्यामुळेच त्यांनी सामन्यावर चांगलीच पकड जमवली आहे. किवी संघासाठी मॅट हेन्री आणि नॅथन स्मिथ यांच्या शानदार कामगारीने संपूर्ण झिम्बाब्वेला फक्त १४९ धावांतच गारद केले आहे. यासह, ३३ वर्षीय हेन्रीने झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी डावात सर्वोत्तम कामगिरी करत इतिहास रचला आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 31 Jul 2025 05:30 PM (IST)

    31 Jul 2025 05:30 PM (IST)

    अनुराग कश्यपच्या ‘Nishaanchi’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

    ‘निशांची’ या आगामी क्राईम-ड्रामा चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज गुरुवारी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता असे म्हणता येईल की यात गुन्हेगारी आणि नाट्याची देसी शैली असेल, जी प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन देऊ शकते. पोस्टरमध्ये प्रेम, सूड, संघर्ष, पश्चात्ताप, सर्वकाही एकत्र दिसत आहे आणि रिलीज झालेल्या पोस्टरवर लिहिले आहे की ‘दिल थामिए और जान बचाइए’ असे या पोस्टरवर लिहिलेले दिसत असून, या पोस्टरने लक्ष वेधले आहे. म्हणजेच अनुराग कश्यपचा हा चित्रपट ‘गँग्स ऑफ वासेपूर’ची झलक दाखवत असल्याचे दिसते आहे.

  • 31 Jul 2025 05:28 PM (IST)

    31 Jul 2025 05:28 PM (IST)

    Thane News : सैनिकांसाठी मनोरुग्ण महिलांनी बनवल्या राखी

    मन विचलित झालं तरी हाताची सर्जनशीलता कायम असते, हे सिद्ध केलं आहे ठाणे मनोरुग्णालयातील महिला रुग्णांनी. रक्षाबंधनाच्या निमित्ताने या महिलांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या तब्बल १२०० राख्या सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. या राख्या काही रुग्णालयात होणाऱ्या रक्षाबंधन कार्यक्रमात वापरण्यात येणार असून, काही राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या महिला मनोरुग्णांनी केलेल्या राखी सीमेवर सैनिकांना पाठवण्यात येणार आहेत.

  • 31 Jul 2025 04:55 PM (IST)

    31 Jul 2025 04:55 PM (IST)

    नेरळ कळंब रस्त्यावर दहिवली पुलावरील वाहतूक धोकादायक

    कर्जत तालुक्यातील नेरळ कळंब या राज्यमार्ग रस्त्यावरील दहिवली मालेगाव येथील पुलावरून पावसाळ्यात पाणी गेले आहे.त्या महापुरात पुलाच्या रेलिंग चे पाईप वाहून गेले असून पुलावरील खड्डे आणि पुलाचे रेलिंग यामुळे पूल धोकादायक बनला आहे.दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.

  • 31 Jul 2025 04:50 PM (IST)

    31 Jul 2025 04:50 PM (IST)

    "घोडबंदर किल्ल्याला शूटिंगसाठी नियम घालावेत

    :-मीरा-भाईंदर महानगरपालिकेने अलीकडेच घेतलेल्या धोरण निर्णयानुसार, शहरातील घोडबंदर किल्ल्यासह अन्य तीस ऐतिहासिक व पर्यटनस्थळे चित्रिकरणासाठी (शूटिंगसाठी) भाडेतत्त्वावर देण्यात येणार असल्याची घोषणा झाली होती. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावतीने मनपा आयुक्तांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर करण्यात आले.

  • 31 Jul 2025 04:45 PM (IST)

    31 Jul 2025 04:45 PM (IST)

    ठाण्यात विक्रम होणार ;सराव दहीहंडीत लागणार नऊ थर

    दहीहंडीची पंढरी समजल्या जाणाऱ्या ठाणे नगरीत येत्या रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक राजेश वायाळ (पाटील) यांनी सराव दहीहंडीचे आयोजन कोपरीतील अष्टविनायक चौकात केले आहे. युवासेनेच्या या निष्ठेच्या हंडीमध्ये नावाजलेल्या मंडळांची गोविंदा पथके नऊ थर लावण्याचा प्रयत्न करणार असुन यावेळी दादुस आला रे... या कार्यक्रमाची धूम ठाणेकरांना पहावयास मिळणार आहे. अशी माहिती राजेश वायाळ (पाटील) यांनी बोलताना दिली आहे.

  • 31 Jul 2025 04:40 PM (IST)

    31 Jul 2025 04:40 PM (IST)

    बदलापूर रेल्वे स्थानकात बसवले जुनेच सरकते जिने

    बदलापूर रेल्वे स्थानकात MRVC ने जुनेच सरकते जिने लावून रेल्वे प्रवाशांची घोर फसवणूक केली आहे, त्यामुळे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या दोन ते तीन वर्षापासून विकासकामे सुरू आहेत. याच विकासकामांचा भाग म्हणून सरकते जिने लावण्याचं काम सुरू आहे. मात्र इथं जुने, गंजलेले जिने लावले जात असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच उघडकीस आला होता. त्यानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रेल्वे स्थानकात जाऊन या सरकत्या जिन्याची पाहणी केली. तेव्हा हे जिने कुठेतरी वापरलेले असल्याचं स्पष्ट झालं. याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला असून आज रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्याची पाहणी केली. येत्या ८ ते १० दिवसात जुना जिना काढला नाही तर MRVC कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

  • 31 Jul 2025 04:35 PM (IST)

    31 Jul 2025 04:35 PM (IST)

    कर्जतमध्ये वाहतूक कोंडीवर बॅरिकेड्सचा उतारा

    कर्जत शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर गेली काही महिने सतत वाहतूक कोंडी होत आहे.दररोज होणारी वाहतूक कोंडी शनिवार रविवारी वाहनांसाठी तासनतास पर्यंत वाढत चालली आहे.दरम्यान या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी कर्जत पोलिसांना पूर्ण अधिकार आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता कर्जत नगरपरिषद आणि पोलिस प्रशासन यांच्या माध्यमातून कर्जत चार फाटा तसेच श्रीराम पुल पर्यंत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्याच्या मधोमध बॅरिकेट्स बसविले जात आहेत.

  • 31 Jul 2025 04:30 PM (IST)

    31 Jul 2025 04:30 PM (IST)

    भाईंदरमध्ये धोकादायक बसेसमुळे नागरिकांच्या जीवाशी होतंय खेळ!

    परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील बसेस आता नागरिकांच्या जिवावर उठल्या असल्याचं चित्र आहे. अनेक बसगाड्या अक्षरशः धूर ओकताना रस्त्यावर धावताना दिसत आहेत. काहींचे दरवाजे तुटलेले आहेत, काही गाड्यांचा पत्रा सडलेला आहे, तर काहींमध्ये खिळखिळे भाग वेगाने हलताना दिसतात. या गाड्यांमधून प्रवास करणं म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखं झालं आहे.

  • 31 Jul 2025 04:25 PM (IST)

    31 Jul 2025 04:25 PM (IST)

    मराठी-हिंदी वादात 'कपडे फाडणारे' नेते एकाच मंचावर; मनसेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

    काही दिवसांपूर्वी मीरा-भाईंदर शहरात मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वाद मोठ्या प्रमाणावर चिघळला होता. या वादात मनसेचे नेते अविनाश जाधव आणि शहराध्यक्ष संदीप राणे यांनी थेट भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप केले होते. समाजमाध्यमांवर तसेच जाहीर कार्यक्रमांमध्ये मनसे नेत्यांनी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढा दिल्याचे भासवत, भाजप आमदार मेहतांवर 'मराठी विरुद्ध हिंदी वाद भडकवल्याचा' ठपका ठेवला होता.

  • 31 Jul 2025 04:19 PM (IST)

    31 Jul 2025 04:19 PM (IST)

    मनोरुग्ण महिलांची बनवलेल्या ५०० राखी आता सीमारेषेवर

    मन विचलित झालं तरी हाताची सर्जनशीलता कायम असते, हे सिद्ध केलं आहे ठाणे मनोरुग्णालयातील महिला रुग्णांनी. रक्षाबंधनाच्या निमित्ताने या महिलांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या तब्बल १२०० राख्या सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. या राख्या काही रुग्णालयात होणाऱ्या रक्षाबंधन कार्यक्रमात वापरण्यात येणार असून, काही राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या महिला मनोरुग्णांनी केलेल्या राखी सीमेवर सैनिकांना पाठवण्यात येणार आहेत.

  • 31 Jul 2025 04:17 PM (IST)

    31 Jul 2025 04:17 PM (IST)

    Mahadeo Munde: मोठी बातमी! महादेव मुंडेंच्या हत्येची SIT चौकशी होणार; CM फडणवीसांचे डीजीपींना आदेश

    मुंबई: परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला 18 महिने उलटूनही मारेकऱ्यांना अटक न झाल्याने आज त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे आदेश दिले आहेत. महादेव मुंडे हत्त्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फेडणवीस यांनी डीजीपींना दिले आहेत.

    महादेव मुंडे यांच्या हत्येचे मारेकरी अजूनही सापडले नसल्याने त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस भावुक झाले होते, असे ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या. तसेच या हत्या प्रकरणाची चौकशी आता एसआयटीतर्फे केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीजीपीना महत्वाचे आदेश दिले आहेत.

    २० ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी महादेव मुंडे हे ट्युशनहून मुलांना घरी सोडून पिग्मीचे कलेक्शन करत होते. रात्री ९ वाजता त्यांची मोटारसायकल वनविभाग कार्यालयाजवळ आढळली. त्यावर रक्ताचे डाग, चप्पल आणि महत्त्वाची कागदपत्रे होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच महादेव मुंडे यांचा मृतदेह ५० मीटर अंतरावर आढळला. यामध्ये एक चप्पल महादेव मुंडे यांची होती, तर दुसरी कोणाची होती याबाबत माहिती भेटली नाही. मात्र, हा मृतदेह रात्री पोलिसांना का दिसला नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता.

    Mahadev Munde Case: मुंडे कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांसमोर पेट्रोल बॉटलसह आक्रमक आंदोलन

    गेल्या 21 महिन्यांत, या प्रकरणाची सात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे, तरीही आरोपी अजूनही फरार आहेत. तपासात कोणतीही प्रगती न झाल्याने मुंडे कुटुंब हताश झाले. जानेवारीच्या सुरुवातीलाच ज्ञानेश्वरी यांनी या प्रकरणाची सीआयडी किंवा एसआयटी चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणात राजकीय लागेबांधे असल्याचा आरोपही यापूर्वी झाला आहे. हत्येतील आरोपी हे राजकीय नेते वाल्मिक कराड यांच्या मुलाच्या अवतीभवती फिरत असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता

    विषप्राशन करून आत्मदहनाचा प्रयत्न

    आपल्या पतीच्या हत्येचे मारेकरी अजूनही न सापडल्याने ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी विषप्राशन करून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता.

    Dnyaneshwari Munde : ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलं विषप्राशन, प्रकृती चिंताजनक, पोलिसांकडून मोठा खुलासा!

    सुरेश धस काय म्हणाले?

    बीडमध्ये १३ ते १४ हत्या झाल्या आहेत. बीड पोलिसांकडून अनेकदा हलगर्जीपणा झालेला आहे. महादेव मुंडेंची हत्या होऊन २१ महिने झाले आहेत. अजित पवारांनी त्यांचे ५ ते माणसे परळीत पाठवावे, म्हणजे त्यांना कळेल इथे काय सुरु आहे.

     

  • 31 Jul 2025 04:15 PM (IST)

    31 Jul 2025 04:15 PM (IST)

    ‘महादेवी’साठी महाराष्ट्राचे डोळे पाणावले; हत्तीणीला वनताराला नेलं अन् गावकऱ्यांनी अंबानींचं ‘JIO’ चं बॅन केलं

    नांदणी येथील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थानी असलेल्या महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्रकल्पात हलवण्यात आल्यानंतर, कोल्हापूर जिल्ह्यातील जैन समाजात तीव्र नाराजीचा सूर आहे. या कृतीचा निषेध करण्यासाठी समाजाने एक अनोखा आणि शांततामय मार्ग निवडला आहे , ‘जिओ’ मोबाईल सेवा बहिष्कार आणि नंबर पोर्टिंग मोहीम धडाक्याने सुरू झाली आहे. दरम्यान , काही समाज बांधवानी रोष व्यक्त करताना जिओ इंटरनेटचे कनेक्शन बंद करून किट ची तोडतोड केली. जैन धर्मीयांच्या मते, वनतारा प्रकल्पाचा थेट संबंध रिलायन्स उद्योग समूहाशी आहे, आणि त्यामुळेच ते जिओ ही कंपनी यासाठी अप्रत्यक्ष जबाबदार असल्याचे मानत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो जैन कुटुंबांनी आपले सध्याचे जिओ नंबर अन्य नेटवर्कवर पोर्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

  • 31 Jul 2025 04:00 PM (IST)

    31 Jul 2025 04:00 PM (IST)

    दहशतवाद भगवा कधीच नव्हता…; मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया

    मालेगावमधील भिक्कू चौक येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. नाशिक जिल्ह्यातील हा स्फोट नवरात्री आणि रमजान महिन्याच्या पूर्वसंध्येला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तब्बल 17 वर्षानंतर निकाल हाती आला आहे. यामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यामुळे भाजप नेत्यांनी आता दहशतवादाला धर्मावरुन लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

  • 31 Jul 2025 03:52 PM (IST)

    31 Jul 2025 03:52 PM (IST)

    पाकिस्तानमध्ये नक्की तेलाचे साठे आहेत का? पाकिस्तानसोबतच्या ट्रम्प यांच्या करारावर शशी थरूर यांची प्रतिक्रिया

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोवर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. रशियाकडून भारत तेल खरेदी करतो त्यामुळे खवळलेल्या ट्रम्प यांनी अतिरिक्त शुल्क आकारण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानसोबत तेल करार करून जगाला आश्चर्यचकित केलं आहे. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

  • 31 Jul 2025 03:37 PM (IST)

    31 Jul 2025 03:37 PM (IST)

    भारतातील सोन्याची मागणी ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, दागिन्यांपेक्षा ईटीएफकडे कल

    वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) च्या ताज्या अहवालानुसार, २०२५ मध्ये भारतातील सोन्याची मागणी गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी पातळीवर पोहोचू शकते. वाढत्या सोन्याच्या किमतींमुळे दागिन्यांच्या खरेदीवर ब्रेक लागला आहे, तर गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणाऱ्यांमध्ये थोडीशी वाढ झाली आहे. असा अंदाज आहे की यावर्षी भारतातील सोन्याचा वापर ६०० ते ७०० मेट्रिक टन दरम्यान असेल, जो गेल्या वर्षीच्या ८०२.८ टनांपेक्षा खूपच कमी आहे. जर किंमती स्थिर राहिल्या तर हा आकडा ७०० टनांपर्यंत पोहोचू शकतो, परंतु जर भू-राजकीय कारणांमुळे किंमती १०-१५ टक्के वाढल्या तर मागणी ६०० टनांपर्यंत खाली येऊ शकते.

  • 31 Jul 2025 03:17 PM (IST)

    31 Jul 2025 03:17 PM (IST)

    भारताच्या संघासमोर करो या मरो की स्थिती! ऑली पाॅपने नाणेफेक जिंकून करणार गोलंदाजी

    भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाचव्या सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना भारताच्या संघासाठी फारच महत्वाचा असणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे, तर इंग्लडच्या संघाचे कर्णधारपद हे या सामन्यासाठी ऑली पाॅपकडे असणार आहे. या मालिकेच्या स्थितीवर नजर टाकली तर सध्या इंग्लडच्या संघाकडे 2-1 अशी आघाडी आहे. त्यामुळे भारताच्या संघाला या सामन्यात जिंकणे गरजेचे आहे. या सामन्यामध्ये इंग्लडच्या संघाने नाणेफेक जिंकुन पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 31 Jul 2025 02:49 PM (IST)

    31 Jul 2025 02:49 PM (IST)

    ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला या राशीच्या समस्या संपतील

    ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी चंद्र देव आणि शुक्र देव नक्षत्रात संक्रमण करणार आहे. त्याचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीचे दिवस काही राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. यावेळी प्रभावशाली ग्रह, राशी आणि त्यांच्या नक्षत्रामध्ये ते संक्रमण करतील. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 ऑगस्ट रोजी चंद्र देव आणि शुक्र यांचे संक्रमण होणार आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या हे दोन्ही ग्रह शुभ मानले जातात. पंचांगानुसार, शुक्रवार, 1 ऑगस्ट रोजी पहाटे 12.41 वाजता चंद्र ग्रह स्वाती नक्षत्रात संक्रमण करणार आहे तर 3.51 वाजता शुक्र ग्रह आर्द्रा नक्षत्रात संक्रमण करणार आहे.

  • 31 Jul 2025 02:49 PM (IST)

    31 Jul 2025 02:49 PM (IST)

    मोड आलेल्या ‘या’ भाज्यांचे सेवन केल्यास शरीरात तयार होतील विषारी तत्व

    दीर्घकाळ निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी पोषण आहार घेणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात फळे, भाज्या, सुका मेवा आणि इतर पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील सर्वच अवयव निरोगी राहतात. निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार, भरपूर पाणी आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. पण बऱ्याचदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दूषित पाण्यात उगवलेल्या भाज्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरी आणलेल्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या जातात. भाज्यांमधील कीड, मोठं मोठ्या अळी शरीरात गेल्यानंतर मेंदूमध्ये जातात. त्यामुळे घरी आणलेल्या भाज्या व्यवस्थित स्वच्छ करून घ्या.

  • 31 Jul 2025 02:48 PM (IST)

    31 Jul 2025 02:48 PM (IST)

    करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरच्या निधनानंतर प्रॉपर्टीवरून वाद

    दिल्ली विमानतळावर अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, अशा वेळी जेव्हा सध्या तिचा एक्स पती संजय कपूर यांच्या ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून वाद सुरू आहे. अलीकडेच, संजय कपूर यांच्या पत्नी प्रिया सचदेव यांची त्यांच्या ३०,००० कोटी रुपयांच्या कंपनीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी, संजय कपूर यांची आई राणी कपूर यांनी दावा केला होता की ती या कंपनीची एकमेव वारस आहे. तिने संजय कपूर यांच्या मृत्यूच्या परिस्थितीवरही शंका व्यक्त केली होती.

  • 31 Jul 2025 02:48 PM (IST)

    31 Jul 2025 02:48 PM (IST)

    एकनाथ शिंदे यांची काँग्रेसवर सडकून टीका

    मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्यासह सात हिंदूंना जाणुनबुजून अडकवून तब्बल १७ वर्ष त्रास देण्याचे काम काँग्रेसने केले. भगवा दहशतवादाचा रंग देऊन मतांचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसने हिंदूंची जाहीर माफी मागावी, अशा शब्दांत शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. एनआयए कोर्टाच्या निकालाने आज हिंदू धर्मीयांवरचा कलंक पुसला गेलाय. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा आता शंभरपट मोठ्या आवाजात देशभर दुमदुमेल, यात शंका नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

  • 31 Jul 2025 02:47 PM (IST)

    31 Jul 2025 02:47 PM (IST)

    मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर नितेश राणे आक्रमक

    Nilesh Rane on Malegaon blast : मुंबई : महाराष्ट्रातील मालेगावमध्ये रमजानच्या दिवशी बॉम्बस्फोट झाला होता. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील भिक्कू चौकामध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी हा स्फोट झाला. हा स्फोट नवरात्री आणि रमजान महिन्याच्या पूर्वसंध्येला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तब्बल 17 वर्षानंतर निकाल हाती आला आहे. यामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यावर आता भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • 31 Jul 2025 02:47 PM (IST)

    31 Jul 2025 02:47 PM (IST)

    अंगावर काटा आणणारा आत्महत्येचा थरार

    उल्हासनगर शहरात आत्महत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अंगावर काटा आणणारा असा हा आत्महत्येचा थरार आहे.  बुधवारी रात्री एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. कॅम्प ५ परिसरातील लक्ष्मीनारायण पॅलेस या सोसायटीच्या टेरेसवर एका व्यक्तीने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला पेटवत आत्महत्या केली.

  • 31 Jul 2025 01:55 PM (IST)

    31 Jul 2025 01:55 PM (IST)

    पहिल्याच दिवशी पाऊस खलनायक? ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिनी नाणेफेकही अडचणीत!

    भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल येथे खेळला जाणारा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना आज म्हणजेच ३१ जुलै रोजी सुरू होत आहे. दोन्ही संघ मालिका बरोबरीत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. भारताच्या संघासाठी मालिकेचा शेवटचा सामना फार महत्वाचा असणार आहे. भारताच्या संघाला या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. आता भारताच्या संघाकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. भारताच्या संघामध्ये अनेक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याआधी आता लंडनचे हवामान हे भारतीय संघाची साथ किती देणार आहे यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर या लेखामध्ये सांगणार आहोत.

  • 31 Jul 2025 01:50 PM (IST)

    31 Jul 2025 01:50 PM (IST)

    इंदिरा गांधी व बाळासाहेब ठाकरेंवर कारवाई झाली

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य निवडणूक आयोगाने टाळाटाळ केली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचे आयोगाने मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज दिली पण मोदींवर कारवाई केलेली नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली होती. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही मग नरेंद्र मोदींवर आयोग कारवाई का करत नाही, असा प्रश्न विचारून याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.

  • 31 Jul 2025 01:45 PM (IST)

    31 Jul 2025 01:45 PM (IST)

    डोनाल्ड ट्रम्प यांनी खुपसला पाठीत खंजीर; एकाच वाक्याने दुखावला भारतीयांचा स्वाभिमान

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात आपला फणा काढण्यास सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानकपणे भारतीय वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लादला. यामुळे अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि शेअर बाजारामध्ये मोठा बदल दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी देखील ट्रम्प यांनी भारताला आव्हान दिले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत वादग्रस्त विधान करत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले रंग दाखवून दिले आहेत.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत विधान केले आहे. रशियाकडून तेल खरेदी करत असल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली होती. बुधवारीच त्यांनी ब्रिक्स गटात भारताच्या उपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि शुल्क लादण्यामागे हेच कारण असल्याचेही सांगितले होते.

  • 31 Jul 2025 01:40 PM (IST)

    31 Jul 2025 01:40 PM (IST)

    युजवेंद्र चहलने इंग्लंडमध्ये घातला धुमाकूळ, इंग्लिश फलंदाजही झाले थक्क

    बऱ्याच काळापासून युजवेंद्र चहल टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, तो काउंटी चॅम्पियनशिपमध्येही खेळताना दिसत आहे. चहलने पुन्हा एकदा चेंडूने आपली जादू करायला सुरुवात केली आहे. नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना चहल सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. डर्बीशायरविरुद्धच्या सामन्यात चहलने चेंडूने शानदार कामगिरी केली आहे. हे पाहून सर्व इंग्लिश फलंदाज थक्क झाले आहेत.

  • 31 Jul 2025 01:30 PM (IST)

    31 Jul 2025 01:30 PM (IST)

    विजय देवरकोंडाचा अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट ‘Kingdom’ हिट की फ्लॉप?

    दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचा बहुप्रतिक्षित अ‍ॅक्शन चित्रपट ‘किंगडम’ चित्रपटगृहात दाखल झाला आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची खूप क्रेझ होती. आता अखेर विजयचे चाहते चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाचा आनंद घेत आहेत. सोशल मीडियावरही चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला का नाही हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • 31 Jul 2025 01:22 PM (IST)

    31 Jul 2025 01:22 PM (IST)

    News : परिवहन विभागाचा निष्काळजीपणा ; धोकादायक बसेसमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ

    परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील बसेस आता नागरिकांच्या जिवावर उठल्या असल्याचं चित्र आहे. अनेक बसगाड्या अक्षरशः धूर ओकत रस्त्यावर धावताना दिसत आहेत. काहींचे दरवाजे तुटलेले आहेत, काही गाड्यांचा पत्रा सडलेला आहे, तर काहींमध्ये खिळखिळे भाग वेगाने हलताना दिसतात. या गाड्यांमधून प्रवास करणं म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखं झालं आहे.

  • 31 Jul 2025 01:15 PM (IST)

    31 Jul 2025 01:15 PM (IST)

    पहिले केरळमध्ये लँडिंग, मग कॅलिफोर्नियात क्रॅश

    अमेरिकेचा अभिमान मानला जाणारे F-35 लढाऊ विमान कॅलिफोर्नियामध्ये कोसळले आहे. या अपघातात विमानाचा पायलट सुखरूप बाहेर आला असला तरी, हे विमान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यापूर्वी, तांत्रिक बिघाडामुळे हे विमान आपल्या देशातील केरळ राज्यात उतरले होते, त्यानंतर काही दिवसाने या विमानाने उड्डाण केले. अमेरिकेच्या या पाचव्या पिढीतील लढाऊ विमानाबद्दल जाणून घेऊया.सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अजूनही भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान फ्रेंच विमान राफेल कोसळल्याच्या बाता करत असताना आता त्यांची स्वतःची देशभरात नाचक्की झाली आहे आणि त्यांचे स्वतःचे प्रगत लढाऊ विमान कॅलिफोर्नियामध्ये कोसळल्याची कहाणी जगभर गाजते आहे.

  • 31 Jul 2025 01:10 PM (IST)

    31 Jul 2025 01:10 PM (IST)

    अमेरिकेत भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू महागणार

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील सर्व निर्यातीवर २५% आयात शुल्क जाहीर केले आहे. हे कर १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होईल आणि स्मार्टफोन, औषधे, कोळंबी, ऑटो पार्ट्स आणि दागिने यासारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांवर त्याचा परिणाम होईल. ट्रम्प प्रशासनाचा दावा आहे की भारताच्या गैर-वित्तीय व्यापार अडथळ्यांना आणि रशियासोबतच्या संरक्षण आणि ऊर्जा संबंधांना प्रतिसाद म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

  • 31 Jul 2025 12:59 PM (IST)

    31 Jul 2025 12:59 PM (IST)

    मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका

    २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींना एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर याही या प्रकरणात आरोपी होत्या. निर्दोष मुक्त झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्या म्हणाल्या की मी न्यायाच्या आदरामुळे आलो आहे. मला १३ दिवस छळण्यात आले, माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. १७ वर्षे माझा अपमान करण्यात आला. माझ्याच देशात मला दहशतवादी बनवण्यात आले. साध्वीचे वकील जेपी मिश्रा म्हणाले की, काल देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, हिंदू दहशतवादी असू शकत नाही आणि आज न्यायालयानेही हा निर्णय दिला हा योगायोग आहे.

  • 31 Jul 2025 12:55 PM (IST)

    31 Jul 2025 12:55 PM (IST)

    एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान देखील शिंचे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले होते. आता ते पुन्हा दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मात्र, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला ते गेले असल्याची माहिती आहे. तसेच ते या दौऱ्यात मोठ्या एनडीएतील मोठ्या नेत्यांच्या भेटी देखील घेणार असल्याची माहिती आहे.

  • 31 Jul 2025 12:45 PM (IST)

    31 Jul 2025 12:45 PM (IST)

    ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी श्रीकृष्णनाथ पांचाळ

    ठाणे जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते जिल्हाधिकारी अशोक शिनगारे सेवानिवृत्त झाले आहेत.

  • 31 Jul 2025 12:35 PM (IST)

    31 Jul 2025 12:35 PM (IST)

    'माधुरी'ला गुजरातला नेले, राजू शेट्टींकडून अनोखा निषेध

    नांदणी येथील माधुरी हत्ती अंबानी उद्योग समुहाने वनतारा येथे पेटाला हाताशी धरून घेऊन गेल्याच्या निषेधार्थ रिलायन्सच्या सर्व वस्तूवर बहिष्कार टाकण्याची ही मोहिम गावकऱ्यांनी सुरू केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वत:चा जीओ चा नंबर एअरटेलमध्ये पोर्ट करत या मोहिमेत सहभाग घेतला.

  • 31 Jul 2025 12:25 PM (IST)

    31 Jul 2025 12:25 PM (IST)

    सर्व आरोपी जामीनावर बाहेर

    साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी हे मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणी सर्व आरोपी जामीनावर तुरुंगाबाहेर होते. मात्र, आता त्यांची निर्दोष मुक्कता झाली असल्याचे त्यांचे वकील यांनी सांगितले.

  • 31 Jul 2025 12:12 PM (IST)

    31 Jul 2025 12:12 PM (IST)

    सुप्रीम कोर्टात दाद मागणार

    माझी मुलगी वडापाव आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. नंतर कळालं तिचा देखील ब्लास्ट मध्ये मृत्यू झाला. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. खूप चुकीचा झाला आहे. हेमंत करकरे यांनी अत्यंत सखोल तपास केला. अनेक पुरावे देखील सादर केले. तरी देखील निर्दोष मुक्तता झाली. आम्ही या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे शेख लियाकत मोईउद्दीन म्हणाले.

  • 31 Jul 2025 11:40 AM (IST)

    31 Jul 2025 11:40 AM (IST)

    तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे काय होईल? - अखिलेश यादव

    अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर २५% कर लादण्याच्या घोषणेवर समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि खासदार अखिलेश यादव म्हणतात, "...गेल्या ११ वर्षांपासून हे सरकार मैत्रीचे दावे करत आहे आणि आज आपण हे दिवस पाहत आहोत. ही वाईट दिवसांची सुरुवात आहे. या देशातील तरुणांना नोकऱ्यांची गरज आहे. जर अर्थव्यवस्था सुधारली तर रोजगार उपलब्ध होतील. जर असे अडथळे असतील तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे काय होईल?..." असा सवाल अखिलेश यादव यांनी उपस्थित केला.

  • 31 Jul 2025 11:36 AM (IST)

    31 Jul 2025 11:36 AM (IST)

    उपराष्ट्रपती असताना जगदीप धनखड यांचा नॉन बुलेटप्रुफ गाडीतून प्रवास

    माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 22 जुलै रोजी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. मीडिया रिपोर्टनुसार, त्यापूर्वी केंद्र सरकार आणि जगदीप धनखड यांच्यामध्ये काही घडामोडी झाल्या आहेत. गेल्या वर्षी २८ फेब्रुवारी रोजी उपराष्ट्रपती सचिवालयाकडून गृह मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांना (पोलीस आधुनिकीकरण विभाग) त्यांच्या अधिकृत वाहनांच्या स्थितीबद्दल एक पत्र पाठवण्यात आले. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा 

  • 31 Jul 2025 11:26 AM (IST)

    31 Jul 2025 11:26 AM (IST)

    मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष सुटका

    मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती कोर्टाकडून देण्यात आली.

  • 31 Jul 2025 11:12 AM (IST)

    31 Jul 2025 11:12 AM (IST)

    मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकालाचा दिवस

    महाराष्ट्रातील मालेगाव शहरातील प्राणघातक बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे विशेष न्यायालय १७ वर्षांनंतर आज, ३१ जुलै रोजी निकाल देण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील मुस्लिमबहुल या शहरात २९ सप्टेंबर २००८ रोजी हा स्फोट झाला. हा स्फोट नवरात्री आणि रमजान महिन्याच्या पूर्वसंध्येला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि १०० जण जखमी झाले होते.

  • 31 Jul 2025 10:44 AM (IST)

    31 Jul 2025 10:44 AM (IST)

    कोणत्याही कॉन्ट्रोवर्सी शिवाय बॉलीवूड क्वीन बनली कियार

    बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा आज ३१ जुलै रोजी वाढदिवस आहे. या वर्षी ती ३४ वर्षांची झाली आहे. हा वाढदिवस कियारासाठी खूप खास आहे कारण काही दिवसांपूर्वीच ती आई झाली आहे. कियारा अडवाणीला तिच्या वैयक्तिक आयुष्यात लॉटरी लागलीच आहे पण, तिच्या व्यावसायिक आयुष्यातही ती वेगाने यशाच्या शिडी चढताना दिसते आहे. बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी अनेकदा अभिनेत्रींना वादाचा सामना करावा लागतो. तसेच, कियारा अद्याप कोणत्याही वादाचा भाग बनलेली नाही. तसेच ती नेहमीच तिच्या कामामुळे चर्चेत राहिली अभिनेत्री आहे.

  • 31 Jul 2025 10:40 AM (IST)

    31 Jul 2025 10:40 AM (IST)

    ट्रम्प टॅरीफचा मार्केटवर परिमाण, शेअर मार्केट क्रॅश

    गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केल्यानंतर ही घसरण झाली. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ८०० अंकांनी घसरला, तर निफ्टी ५० निर्देशांक २४,६५० च्या पातळीच्या खाली घसरला. अधिक वाचा 

  • 31 Jul 2025 10:21 AM (IST)

    31 Jul 2025 10:21 AM (IST)

    ऋषभ पंतची जागा घेणार हा विकेटकिपर

    बीसीसीआयने त्याच्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये आता पुढील सामना हा ध्रुव जुरेल पक्के झाल्याचे मानले जात आहे. त्याला या मालिकेमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही पण त्याने पंतच्या जागेवर विकेटकिंपिग केली होती. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ध्रुव जुरेल याने सांगितले की मी फार उत्सुक आहे हा सामना खेळण्यासाठी कारण हा सामना संघासाठी फार महत्वाचा आहे.

  • 31 Jul 2025 10:13 AM (IST)

    31 Jul 2025 10:13 AM (IST)

    मालाडमधील धक्कादायक घटना

    मुंबईच्या मालाड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एक ८ वर्षाच्या मुलाचे हस्ताक्षर चांगले नाही म्हणून ट्युशन शिक्षिकेने मेणबत्तीने चटके दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या तळहातावर दुखापत झाली आहे. ही घटना मालाड पूर्व गोकुळधाम फिल्म सिटी रोडवर एका खासगी ट्युशनमध्ये ही धक्कदायक घटना घडली आहे. चटके देणाऱ्या शिक्षिकेचा नाव राजश्री राठोड आहे. शिक्षिकेविरोधात कुरार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 31 Jul 2025 10:06 AM (IST)

    31 Jul 2025 10:06 AM (IST)

    अर्शदीपला भारतीय संघामध्ये खेळण्याची संधी मिळणार?

    मोहम्मद सिराज याला विश्रांती देण्याचे टीम इंडियाने ठरवले नाही तर मोहम्मद सिराज हा भारतीय संघात असेल. त्याचबरोबर आकाशदीप सुद्धा टीम इंडियामध्ये असू शकतो तिसरा वेगवान गोलंदाज कोण असणार यावर अजूनही कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही पण अर्शदीप याचा कसोटी फॉर्मेटमध्ये पदार्पण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्शदिप याला झालेल्या इंग्लंड दौऱ्यावरील चारही सामन्यांमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती त्यामुळे पाचव्या सामन्या त्याला संधी मिळणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Marathi breaking news today live updates national political international business breaking news sports entertainment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 08:33 AM

Topics:  

  • navarashtra breaking news
  • navarashtra news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण
1

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण

Top Marathi News Today: काम केलं नाही तर मंत्री बदलणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ताकीद
2

Top Marathi News Today: काम केलं नाही तर मंत्री बदलणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ताकीद

World Hypertension Day: मुलांमध्ये वाढत्या उच्च रक्तदाबाचे संकट गंभीर
3

World Hypertension Day: मुलांमध्ये वाढत्या उच्च रक्तदाबाचे संकट गंभीर

Navarashtra Woman Awards : वर्षाराणी शिंदेंना नवभारत नवराष्ट्रचा आदर्श समाजसेविका पुरस्कार प्रदान
4

Navarashtra Woman Awards : वर्षाराणी शिंदेंना नवभारत नवराष्ट्रचा आदर्श समाजसेविका पुरस्कार प्रदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.