संग्रहित फोटो
तिरुअनंतपुरम : केरळमधील एका फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये स्फोट झाल्याची घटना घडलीय. यात १६ जण जखमी झाले असून यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. तर एकाच मृत्यू झाल्याची माहिती हाती आली. फटाका फॅक्टरीमध्ये स्फोट होण्याची घटना केरळमधील त्रिपुनिथुरा येथील रहिवाशी भागात झालीय. यात एकाचा मृत्यू झाला असून, ४ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना जवळील कलामासेरी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख पटली असून, त्याचे नाव विष्णू असून तो तिरुवनंतपुरम येथील राहणारा असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान फटाका फॅक्टरीत झालेला स्फोट इतका भीषण होता की, या फॅक्टरीच्या आसपासची २५ घरे जमिनदोस्त झालीत. त जोन दोन वाहने जळून खाक झाली आहेत. दरम्यान फॅक्टरीमध्ये स्फोट कशामुळे झाला याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.
अनेक किलोमीटरपर्यंत बसले धक्के
फटाका फॅक्टरीमध्ये झालेला स्फोट भीषण होता. स्फोटाचे धक्के अनेक किलोमीटरपर्यंत जाणवल्याची माहिती अग्मिमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली. स्फोट झाल्यानंतर आगीने भडका घेतला होता. परंतु, अग्निशमन दलाच्या जवानांनी आग शमवली आहे. फटाका फॅक्टरी अवैध पद्धतीने चालवण्यात येत होते, याची माहिती पोलिसांनी देखील नव्हती. एका वाहनातून फटाके गोदामात उतरवले जात होते. त्याचवेळी स्फोट झाला. कोणीतरी बिडी किंवा सिगारेट पीत असावं आणि त्याने जळती सिगारेट किंवा बिडी तशीच फेकून दिली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.






