वसई-विरार शहर महानगरपालिकेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘भीक मांगो’ आंदोलन केले. स्मशानभूमी कंत्राटातील कथित गैरव्यवहाराच्या आरोपावरून मनसेने हे आंदोलन करत महापालिका प्रशासनाचा निषेध केला. वसई-विरार महापालिकेच्या मुख्य कार्यालय परिसरात झालेल्या या आंदोलनात आंदोलकांनी फाटलेले कपडे परिधान करून आणि हातात वाटी घेऊन निषेध नोंदवला. स्मशानभूमीत काम करणाऱ्या स्थानिक मराठी आणि आगरी तरुण कर्मचाऱ्यांना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत आणि संबंधित ठेकेदाराच्या कथित संगनमतातून कामावरून हटवण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.