
Mathura Boat Accident: यमुना नदीत बोट उलटली; 9 भाविकांचा मृत्यू तर 22 जणांना...
मथुरेत यमुना नदीत बोट उलटली
9 जणांचा मृत्यू तर 22 जणांना वाचवण्यात यश
मथुरा पोलिसांनी माहिती दिल्याचे आले समोर
Boat Drown In Yamuna River: उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मथुरा जिल्ह्यात भाविकांनी भरलेली बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. पाटून ब्रिजला बोट धडकल्याने बोल उलटली आहे. या दुर्घटनेत 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 22 जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बोटीतून प्रवास करणारे प्रवास पंजाब राज्यातून आले होते. तसेच ते वृंदावन येथील एका धार्मिक स्थळी जाण्यासाठी बोटीतून प्रवास करत होते. दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एसडीआरएफ आणि प्रशासनाने बचावकार्य सुरू केले. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, बोटीतून अनेक भाविक प्रवास करत होते. अचानक बोटीचे नियंत्रण सुटले आणि ती बोट पाटून ब्रिजला धडकली. त्यानंतर अचानक सगळे भाविक नदीत कोसळले. यमुना नदीच्या पाण्याचा स्तर जास्त आणि खोली अधिक असल्याने 9 जणांना आपले प्राण गमवावे लागले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन एसडीआरएफ दाखल झाले आणि वेगाने बचावकार्य सुरू करण्यात आला आहे. बचावकार्य करून 22 जणांना सुखरूप वाचवण्यात आले. तर या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले आहे. “जनपद मथुरामध्ये नाव उलटून झालेली दुर्घटना आणि त्यातील जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. माझ्या संवेदना शोकग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव व मदत कार्य राबवण्याचे आणि जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रभू श्रीरामांकडे प्रार्थना आहे की, दिवंगत आत्म्यांना सद्गती आणि शोकाकुल कुटुंबियांना हे अथांग दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी.”
Boat Accident : काँगोत भीषण दुर्घटना! किनाऱ्याजवळ बोट उलटल्याने २० जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
Gautam Singhania यांची स्पीडबोट उलटली
साहस आणि वेगाची आवड कधी जीवावर बेतेल हे सांगता येत नाही. भारताचे दिग्गज उद्योगपती आणि रेमंड समूहाचे सर्वेसर्वा गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांच्यासोबत मालदीवच्या सहलीदरम्यान एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली होती. मालदीवमधील फेलिधू बेटाजवळ सिंघानिया यांची स्पीडबोट समुद्रात अनियंत्रित होऊन उलटली होती. या अपघातात सिंघानिया थोडक्यात बचावले असले, तरी त्यांचे जवळचे मित्र आणि भारताचे महान रॅली ड्रायव्हर अद्याप बेपत्ता असल्याने खळबळ उडाली होती.