mayavati

मध्य प्रदेश आणि तेलंगणामधील विधानसभा निवडणुकांचे निकाल बहुजन समाज पक्षासाठी (BSP) अत्यंत निराशाजनक ठरले आहेत. निवडणुकीत कडवी लढत देण्याचा दावा पक्षाकडून केला जात होता. बसपा सुप्रीमो मायावती (Mayawati) यांच्या रॅलींमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याने पक्षाचे उमेदवार आणि अधिकारी खूप उत्साहित झाले होते.

    लखनौ : मध्य प्रदेश आणि तेलंगणामधील विधानसभा निवडणुकांचे निकाल बहुजन समाज पक्षासाठी (BSP) अत्यंत निराशाजनक ठरले आहेत. निवडणुकीत कडवी लढत देण्याचा दावा पक्षाकडून केला जात होता. बसपा सुप्रीमो मायावती (Mayavati) यांच्या रॅलींमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याने पक्षाचे उमेदवार आणि अधिकारी खूप उत्साहित झाले होते. परंतु, निकालाने मायावतींना जोरदार झटका दिला आहे.

    राजस्थानमध्ये पक्षाला केवळ दोन जागा मिळवता आल्या आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये त्यांचे खाते उघडता आले नाही. अशा परिस्थितीत बसपा सुप्रिमो मायावती यांनी निवडणूक निकालांवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी नवीन रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी राजधानी लखनौमध्ये 10 डिसेंबरला पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणूक निकालांवर विचारमंथन केले जाणार आहे.

    लोकसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची चर्चा होणार आहे. निवडणुकीच्या निकालाने दुखावलेल्या मायावतींनी सोशल साईटवर लिहिले की, ‘निवडणुकीचे संपूर्ण वातावरण लक्षात घेता असा विचित्र निकाल स्वीकारणे लोकांना फार कठीण जाते. मायावती पुढे म्हणाल्या, संपूर्ण निवडणुकीतील वातावरण पूर्णपणे वेगळे आणि चुरशीच्या लढतीसारखे मनोरंजक होते. पण, निवडणुकीचा निकाल त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आणि पूर्णपणे एकतर्फी ठरणे, ही अनाकलनीय बाब आहे’.