Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP Manifesto For Delhi Election: ‘तरुणांना 15,000 तर ऑटो आणि कॅब चालकांसाठी…’; भाजपकडून जाहीरनामा -2 प्रसिद्ध

केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये भाजपने आपल्या जाहिरनाम्याचा दुसरा भाग प्रसिद्ध केला आहे. यामध्ये दिल्लीच्या नागरिकांना अनेक आश्वासने देण्यात आली आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 21, 2025 | 05:40 PM
BJP Manifesto For Delhi Election: 'तरुणांना 15,000 तर ऑटो आणि कॅब चालकांसाठी...'; भाजपकडून जाहीरनामा -2 प्रसिद्ध

BJP Manifesto For Delhi Election: 'तरुणांना 15,000 तर ऑटो आणि कॅब चालकांसाठी...'; भाजपकडून जाहीरनामा -2 प्रसिद्ध

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप, आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसमध्ये जोरदार लढत सुरु आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी मतदानो होणार आहे. दिल्लीमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. तर येत्या 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे.  दरम्यान भाजपने आपल्या जाहिरनाम्याचा दुसरा भाग प्रसिद्ध केला आहे.

केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये भाजपने आपल्या जाहिरनाम्याचा दुसरा भाग प्रसिद्ध केला आहे. यामध्ये दिल्लीच्या नागरिकांना अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. भाजपने आपल्या जाहिरनाम्यातून केजी ते पिजी पर्यंत मोफत शिक्षण, तसेच ऑटो आणि कॅब चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबद्दल सांगण्यात आले आहे. तसेच भ्रष्टाचार रोखण्याचे आश्वासन देण्यात आले आहे .

विधानसभा चुनाव-2025 के लिए भाजपा का संकल्प पत्र भाग-2#भाजपा_के_संकल्प pic.twitter.com/VZY96Gy6Cs

— BJP Delhi (@BJP4Delhi) January 21, 2025

यंदाच्या निवडणुकीत भाजपच दिल्लीत सरकार स्थापन करेल असा विश्वास मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी दिल्लीतील तरुणांना १५,००० रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. याशिवाय अनेक वचने भाजपने आपल्या जाहीरनामा 2 मध्ये दिल्लीच्या नागरिकांना दिली आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यातील पहिला भाग भाजपने जाहीर केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ने जाहीरनामा प्रसिद्ध केला. आमची सत्ता आल्यास सध्या सुरू असलेल्या योजना बंद केल्या जाणार नाहीत, अंतर त्यातील भ्रष्टाचार संपवला जाईल असे नड्डा म्हणाले. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात कोकोणती आश्वासने दिली आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.

जाहीरनाम्यात काय? 

गरजू विद्यार्थ्याना पीजी ते केजीपर्यंत मोफत शिक्षण
आप सरकारच्या कुशासन आणि भ्रष्टाचाराविरुद्ध झीरो टॉलेरेन्स धोरण तयार करून एसआयटी स्थापन केली जाईल.
ऑटो आणि कॅब चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ

हेही वाचा: BJP Delhi Manifesto: महिलांना दरमहा 2,500 तर, सणासुदीमध्ये…; दिल्ली जिंकण्यासाठी भाजपच्या जाहीरनाम्यात काय?

दिल्लीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 2 ते अडीच हजार पेन्शन दिली जाणार आहे. ७० वर्षांवरील व्यक्ती, विधवा आणि अपंगांना ३,००० रुपये मिळणार आहेत. यामध्ये ५०० रुपयांची वाढ देण्यात येणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत महिलांचे मतदान आपल्या पक्षाच्या बाजूने वाढवण्यासाठी सर्व पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत.  कॉँग्रेस आणि आम आदमी पक्षाप्रमाणे भाजपने देखील दिल्लीतील महिला समृद्धी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2,500 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच घरगुती सिलेंडरवर 500 रुपये सबसीडी देण्याचे वचन दिले आहे. तसेच होळी आणि दिवाळीत एक सिलेंडर मोफत दिला जाणार आहे. दिल्लीत भाजप सरकार सत्तेत आल्यावर गर्भवती महिलांना २१,००० रुपये एकरकमी दिले जातील आणि पोषण आहार देखील दिला जाईल, असे आश्वासन भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे.

Web Title: Minister anurag thakur and bjp announced menifesto part 2 for delhi assembly election 2025 free education and many things

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 05:04 PM

Topics:  

  • BJP

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
2

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
3

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
4

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.