Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pankaja Munde Bhagwangad Dasara Melava : भगवान गडावर पंकजा मुंडेंचं Gen Z वर भाष्य, नेमकं काय म्हणाल्या?

Pankaja Munde Bhagwangad Dasara Melava : भगवान गडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी तरुण पिढी, देशभक्ती आणि महाराष्ट्रातील सामाजिक सलोख्यावर भाष्य केले. ‘देश जाळणारे तरुण नकोत, Gen Z चे नेतृत्व मुद्द्यावर होईल, गुद्द्यावर नाही,’ असे म्हणत त्यांनी तरुणांना स्पष्ट संदेश दिला.

  • By विवेक
Updated On: Oct 20, 2026 | 05:35 PM
Pankaja Munde dasara melava

Pankaja Munde dasara melava

Follow Us
Follow Us:
  • पंकजा मुंडेंचा नारायणगडावरून तरुणांना सल्ला
  • देशभक्तीपासून नेतृत्वापर्यंत अनेक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका
  • दुष्काळात चारा अनुदानासाठी प्रयत्न करणार
 

Pankaja Munde Bhagwangad Dasara Melava : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यातर्फे बीडमधील भगवानगड येथे सालाबादप्रमाणे यंदाही दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना वेगवेगळ्या विषयांना हात घातला. भारतासह काही देशांमध्ये चाललेल्या Gen Z आंदोलांनचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. तरुण पिढीला देशभक्ती, देशाबद्दल आदर आणि जबाबदार नेतृत्वाचा संदेश त्यांनी यावेळी दिला. ‘देश जाळणारे तरुण नकोत,’ असेदेखील त्या यावेळी म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्यात तरुण पिढीला महत्त्वाचा संदेश दिला. देशाबद्दल आदर, देशभक्ती आणि सामाजिक सलोखा यांचा उल्लेख करत त्यांनी ‘आपल्याला स्वतःचा देश जाळणारे तरुण नकोत,’ असे ठामपणे सांगितले. त्याचवेळी Gen Z अर्थात नव्या पिढीने नेतृत्व करताना मुद्द्यांवर भर द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

जगभरातील संघर्ष आणि अस्थिरतेचा संदर्भ देताना पंकजा मुंडे यांनी फ्रान्समधील परिस्थितीचा उल्लेख केला. रशिया-युक्रेन आणि इराणमधील युद्धाचाही दाखला देत देशाचा आदर न करणारी तरुण पिढी आपल्याला नको, असं त्या म्हणाल्या.

Manoj Jarange Patil News: ‘मला ५०० कोटी दिल्याचे भाजपला का सांगितले? मनोज जरांगे पाटलांचे एकनाथ शिंदेंना असं का म्हणाले

गोपीनाथ मुंडे यांचे विचार आणि जयप्रकाश नारायण यांच्यासोबत काम केलेल्या नेतृत्वाचा संदर्भ देत त्यांनी तरुणांसमोर आदर्श ठेवला. आजची तरुण पिढी सक्षम आहे; मात्र नेतृत्व करायचं असेल तर ते विचारांच्या आणि मुद्द्यांच्या जोरावर व्हायला हवं. केवळ आक्रमकता किंवा संघर्षातून नेतृत्व उभं राहत नाही, असा संदेश त्यांच्या भाषणातून देण्यात आला.

जातीच्या भिंती नकोत; अंतरवालीच्या विकासाचा निर्धार

महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट असताना समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न होऊ शकतात, अशी चिंता पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. जातीपातींच्या भिंती उभ्या करण्याऐवजी त्या मोडून काढण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘मी अंतरवाली दत्तक घेतली आहे. या गावाचा विकास करणार असून बीडइतकंच प्रेम करणार आहे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. गावागावात प्रेमाचा प्रसार व्हायला हवा. जातीच्या आधारावर मोठं होण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना भविष्यात यश मिळणार नाही, असंही त्या म्हणाल्या. सुशिक्षित आणि प्रशिक्षित नेतृत्व देशाला योग्य दिशा देऊ शकतं, तर स्पष्ट अजेंडा नसलेले लोक समाजात तेढ निर्माण करतात, अशी टीकाही त्यांनी केली.

दुष्काळात चारा अनुदानासाठी प्रयत्न करणार

दुष्काळाच्या मुद्द्यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी यापूर्वीही दुष्काळी परिस्थिती हाताळल्याचं सांगितलं. यंदाही संकटाचा सामना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

CSR फंडाच्या माध्यमातून चारा अनुदानासाठी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करून दुष्काळग्रस्तांना मदतीचा आधार देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच नदी संवर्धनासाठी प्रत्यक्ष काम करण्याचा निर्धारही व्यक्त केला.

एकीकडे तरुणांना देशभक्ती आणि जबाबदार नेतृत्वाचा संदेश, तर दुसरीकडे जातीभेद दूर करण्यासह दुष्काळावर उपाययोजनांचा निर्धार, अशा विविध मुद्द्यांवर पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्यात आपली भूमिका मांडली.

Mohan Bhagwat Dussehra Speech : स्वातंत्र्य चळवळीपेक्षा मोठं बलिदान आता पुन्हा द्यावं लागेल – मोहन भागवत

💡

Frequently Asked Questions

  • Que: पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्यात काय सांगितले?

    Ans: पंकजा मुंडे यांनी तरुण पिढीला देशभक्ती, देशाबद्दल आदर आणि जबाबदार नेतृत्वाचा संदेश दिला. ‘देश जाळणारे तरुण नकोत,’ असे त्या म्हणाल्या.

  • Que: Gen Z च्या नेतृत्वाबाबत पंकजा मुंडे यांची भूमिका काय आहे?

    Ans: Gen Z ने नेतृत्व करताना मुद्दे आणि विचार यांना महत्त्व द्यावं. ‘नेतृत्व मुद्द्यावर होईल, गुद्द्यावर नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.

  • Que: दुष्काळ निवारणासाठी पंकजा मुंडे यांनी काय सांगितले?

    Ans: CSR फंडाच्या माध्यमातून चारा अनुदानासाठी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Web Title: Pankaja munde bhagwangad dasara melava gen z patorotism speech vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • Beed News
  • BJP
  • Dasara Melava
  • Pankaja Munde

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil Dasara Melava : नारायणगडावरून जरांगे पाटलांचा एल्गार! शेतकऱ्यांसाठी सरकारकडे 5 मोठ्या मागण्या
1

Manoj Jarange Patil Dasara Melava : नारायणगडावरून जरांगे पाटलांचा एल्गार! शेतकऱ्यांसाठी सरकारकडे 5 मोठ्या मागण्या

‘मी रावण आहे, रस्त्यावरचा चोर नाही!’ चप्पल पडताच संतापला लंकेश; पाहा Viral Video
2

‘मी रावण आहे, रस्त्यावरचा चोर नाही!’ चप्पल पडताच संतापला लंकेश; पाहा Viral Video

Shivsena Dasara Melava : शिंदेंचा दसरा मेळावा यंदा शेतकऱ्यांसाठी; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक निघणार
3

Shivsena Dasara Melava : शिंदेंचा दसरा मेळावा यंदा शेतकऱ्यांसाठी; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक निघणार

Shivsena Dasara Melava : एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दसरा मेळाव्यातील ‘ते’ कार्यक्रम रद्द
4

Shivsena Dasara Melava : एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दसरा मेळाव्यातील ‘ते’ कार्यक्रम रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.