Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थी आंदोलनादरम्याच केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; ‘या’ बड्या व्यक्तीला थेट पदावरूनच हटवले

शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सचिवपदी टी. के. अनिल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 24, 2026 | 09:38 AM
विद्यार्थी आंदोलनादरम्याच केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; 'या' बड्या व्यक्तीला थेट पदावरूनच हटवले

विद्यार्थी आंदोलनादरम्याच केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; 'या' बड्या व्यक्तीला थेट पदावरूनच हटवले

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि युवकांच्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयात मोठे प्रशासकीय फेरबदल केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची घोषणा केल्यानंतर गुरुवारी उशिरा शिक्षण मंत्रालयात दोन नव्या सचिवांची नियुक्ती करण्यात आली. उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांची बदली करून त्यांची पंचायतराज मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सचिवपदी टी. के. अनिल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, सरकारने प्रधान यांच्याऐवजी उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी यांची बदली केल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी हा निर्णय विद्यार्थ्यांची दिशाभूल करणारा असल्याचे सांगितले.

पेपरफुटीविरोधात आंदोलन सुरु असतानाच पुन्हा दोन पेपर लीक; परीक्षाच करावी लागली रद्द

विनीत जोशी हे १९९२ च्या मणिपूर-नागालँड कॅडरचे आयएएस अधिकारी असून प्रशासनातील कुशल, प्रामाणिक आणि अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) चे प्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात या दोन्ही संस्थांमध्ये कोणताही मोठा वाद निर्माण झाला नव्हता. त्यामुळे त्यांची अचानक बदली झाल्याने प्रशासकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र

विरोधकांकडून तसेच विद्यार्थी संघटनांकडून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना सरकारने विद्यार्थ्यांचा रोष कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

IAS गंगवार यांची नियुक्ती

उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी राजस्थान कॅडरचे १९९४ बॅचचे आयएएस अधिकारी नरेश पाल गंगवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उत्तराखंडमध्ये दोन पेपर लीक

दिल्लीतील जंतर मंतरवर पेपरफुटीविरोधात सध्या आंदोलन सुरु आहे. या पेपरफुटीच्या निषेधार्थ असंख्य तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. दिल्लीत आंदोलन सुरु असतानाच उत्तराखंडमध्ये आणखी एका पेपरफुटीची बातमी समोर आली आहे. उत्तराखंड टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये अभियांत्रिकीचे दोन पेपर फुटल्याचा आरोप आहे. यानंतर, विद्यापीठाने दोन्ही विषयांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.

Dharmendra Pradhan : पेपरफुटीवरून सध्या टीकेचे धनी असलेले धर्मेंद्र प्रधान; 29 वर्षांपूर्वी याच मुद्द्यावर उतरले होते रस्त्यावर

Web Title: Minister dharmendra pradhan resignations were demanded but vineet joshi was removed from secretary post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • Dharmendra Pradhan
  • NEET Exam

संबंधित बातम्या

Satara Protest: भर पावसात विद्यार्थ्यांचा एल्गार! ‘नीट’ पेपरफुटीविरोधात मोर्चा; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
1

Satara Protest: भर पावसात विद्यार्थ्यांचा एल्गार! ‘नीट’ पेपरफुटीविरोधात मोर्चा; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Dharmendra Pradhan: पेपरफुटीवरून सध्या टीकेचे धनी असलेले धर्मेंद्र प्रधान; 29 वर्षांपूर्वी याच मुद्द्यावर उतरले होते रस्त्यावर
2

Dharmendra Pradhan: पेपरफुटीवरून सध्या टीकेचे धनी असलेले धर्मेंद्र प्रधान; 29 वर्षांपूर्वी याच मुद्द्यावर उतरले होते रस्त्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली फास्ट ट्रॅक कोर्टबाबत मोठी घोषणा! Fast Track Court म्हणजे नेमकं काय?
3

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली फास्ट ट्रॅक कोर्टबाबत मोठी घोषणा! Fast Track Court म्हणजे नेमकं काय?

जंतरमंतरवरील लाठीमाराचा कराडात निषेध; काम बंद आंदोलन करत कोर्टाच्या प्रवेशद्वारावरच वकिलांची घोषणाबाजी
4

जंतरमंतरवरील लाठीमाराचा कराडात निषेध; काम बंद आंदोलन करत कोर्टाच्या प्रवेशद्वारावरच वकिलांची घोषणाबाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.