Mock drills again in Rajasthan Jammu Kashmir Gujarat and Punjab, on India-Pakistan border
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर केले. या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारताने केलेल्या या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तान सहानभूती घेऊन अनेक देशांमध्ये फिरत आहे. भारताने संसदीय खासदारांचे शिष्टमंडळ पाठवून भारताची दहशतवाद विरोधी भूमिका अधोरेखित केली आहे. यानंतर आता देशामध्ये पुन्हा एकदा मॉक ड्रिल केले जाणार आहे.
यापूर्वी देखील देशातील नागरिकांना युद्धपरिस्थितीमध्ये वागण्याचा सराव दिला गेला. यानंतर आता पुन्हा एकदा देशातील काही राज्यांमध्य मॉक ड्रील दिले जाणार आहे. पाकिस्तान बॉर्डर जवळ असणाऱ्या चार राज्यांमध्ये मॉक ड्रील दिले जाणार आहे. संरक्षण दलाने या राज्यातील लोकांना सर्तकतेचे इशारा दिला आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी लागू असली तरी पाकिस्तानच्या नापाक हरकती काही थांबत नाहीत. यामुळे भारताकडून खबरदारीची पाऊले उचलली जात आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमा भागांमध्ये चार राज्ये प्रामुख्याने येतात. यामध्ये जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 3 हजार 300 किलोमीटर सीमा एकत्र आहे. या सर्व भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर नागरिकांना देखील सर्तकतेचा इशारा देण्यात आलेला आहे. या चार राज्यातील नागरिकांना युद्धपरिस्थितीचा सराव दिला जाणार आहे.
4 states, that border Pakistan, Gujarat, Rajasthan, Punjab & J&K will see mock drill tomorrow evening — Sidhant Sibal (@sidhant) May 28, 2025
यापूर्वी देखील देशामध्ये नागरिकांना मॉक ड्रील देण्यात आले होते. मात्र त्या रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर करुन पाकिस्तानची झोप उडवली होती. यानंतर पाकिस्तानने भारतावर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानचे प्रत्येक हल्ले हाणून पाडले. यावेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन दिवस युद्धपरिस्थिती निर्माण झाली होती. याचा सर्वात मोठा परिणाम सीमा भागातील राज्यावर झाला होता. सध्या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी लागू असली तरी देखील पाकिस्तानवर विश्वास दाखवता येत नाही. त्यामुळे सीमा भागातील राज्यांमध्ये मॉक ड्रील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यापूर्वी मॉक ड्रीलच्या रात्री पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर केले होते. यामध्ये दहशतवादी आणि दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले होते. यावेळी पुन्हा एकदा मॉक ड्रीलची घोषणा करण्यात आल्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. यावेळी देखील भारत लष्करी कारवाई करणार का याची भीती पाकिस्तानच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर पुन्हा एकदा भारताच्या या मॉक ड्रीलची चर्चा रंगली आहे.