Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Weather Update: देशातील ‘या’ राज्यांत मान्सून दाखल; कुठे होणार मुसळधार पाऊस? वाचा…

पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील दोन दिवसांमध्ये हा कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 30, 2025 | 03:45 PM
India Weather Update: देशातील 'या' राज्यांत मान्सून दाखल; कुठे होणार मुसळधार पाऊस? वाचा...

India Weather Update: देशातील 'या' राज्यांत मान्सून दाखल; कुठे होणार मुसळधार पाऊस? वाचा...

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशासह, राज्यभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. आतापर्यंत जवळपास १७ राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. हवामान विभागाने अनेक राज्यांसाठी रेड अलर्ट आणि यलो अलर्ट जारी केला आहे. देशातील सेव्हन सिस्टर्स म्हणजेच आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम व त्रिपुरा राज्यात मान्सून दाखल झाला आहे.

केरळमध्ये वेळेआधीच मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रातसुद्धा १० ते १५ दिवस आधीच मान्सून आला आहे. आयएमडीने केरळ, पाँडिचेरी, कर्नाटकमध्ये गडगडाटासह पाऊस आणि ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे.

कोणत्या राज्यात कसे असणार हवामान?

३० ते १ जूनपर्यंत महाराष्ट्रातील विदर्भ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा, बिहार या राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज आणि उद्या गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू राज्यात तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे.

राज्यावर 48 तासांमध्ये येणार नवे संकट

गेले अनेक दिवस राज्यभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. मान्सूनने महाराष्ट्राचा बराच भाग व्यापला असून, मुंबई-ठाण्यासह कोकणात बुधवारी पावसाचा जोर चांगलाच वाढलेला दिसला. पुढील 3-4 दिवसांत राज्याच्या विविध भागांत दमदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यातचता  राज्यासाठी पुढील 48 तास महत्वाचे असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील दोन दिवसांमध्ये हा कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे देशभरासह राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासाह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Monsoon: राज्यावर 48 तासांमध्ये येणार नवे संकट; IMD च्या ‘या’ हाय अलर्टने वाढवली चिंता

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक भागात अति ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. दोन जूनपर्यंत केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात वादळी वाऱ्यासाह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी प्रतितास राहण्याचा अंदाज आहे.

मेळघाट परिसरात वातावरणात होतोय कमालीचा बदल

धारणी व चिखलदरा तालुक्यात मागील आठवड्यापासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे उन्हाळी हंगामातील मूग, भुईमूग, मका, ज्वारी या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Monsoon reached in 17 states heavy rain alertby imd in india next few days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 03:44 PM

Topics:  

  • imd
  • Monsoon Alert
  • Rain News

संबंधित बातम्या

Yavatmal News: रस्त्याअभावी ग्रामीणमधील बसफेऱ्या बंद! विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पूल खचल्याने गावाचा संपर्क तुटला
1

Yavatmal News: रस्त्याअभावी ग्रामीणमधील बसफेऱ्या बंद! विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पूल खचल्याने गावाचा संपर्क तुटला

अतिवृष्टीने कराडच्या खरीपाला ब्रेक; 31 हजार हेक्टरपैकी केवळ 24.60 टक्के पेरणी
2

अतिवृष्टीने कराडच्या खरीपाला ब्रेक; 31 हजार हेक्टरपैकी केवळ 24.60 टक्के पेरणी

पुण्यात पावसाने घेतली विश्रांती; गुरुवारपासून गायब झालेला पाऊस आता कधी येणार?
3

पुण्यात पावसाने घेतली विश्रांती; गुरुवारपासून गायब झालेला पाऊस आता कधी येणार?

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ जारी
4

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.