Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrashekhar Azad News: खासदार चंद्रशेखर आझादांनी माझा छळ केला…; महिलेने थेट पुरावे दाखवत केले गंभीर आरोप

या संपूर्ण प्रकरणावर खासदार चंद्रशेखर आझाद यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्याच वेळी, भीम आर्मीने हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला असून हा भाजपचा राजकीय कट असल्याचा आरोप केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 10, 2025 | 05:23 PM
Chandrashekhar Azad News: खासदार चंद्रशेखर आझादांनी माझा छळ केला…; महिलेने थेट पुरावे दाखवत केले गंभीर आरोप
Follow Us
Close
Follow Us:

Chandrashekhar Azad News:  भीम आर्मीचे संस्थापक आणि नगीना येथील आझाद समाज पक्षाचे (कांशीराम) खासदार चंद्रशेखर आझाद पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. इंदूर येथील पीएचडी स्कॉलर डॉ. रोहिणी घावरी यांनी चंद्रशेखर यांच्यावर मानसिक आणि भावनिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.

डॉ. रोहिणी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (माजी ट्विटर) वर एक लांब पोस्ट लिहत आपले कथित वैयक्तिक संबंध उघड केले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी आरोप केले आहेत. “चंद्रशेखर यांनी प्रेमाचे नाटक करून माझ्या आयुष्यातील मौल्यवान वेळ वाया घालवला. परंतु लग्नाच्या मुद्द्यावर मात्र त्यांनी मला धोका दिला.”असा आरोप घावरी यांनी केला आहे. या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, चंद्रशेखर आझाद यांची यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“साहेबांना माझ्या काही गोष्टी पटत नाहीत…”; पुण्यातील कार्यक्रमात निलेश लंकेंचे मोठे विधान

रोहिणी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर तिच्या कथित वैयक्तिक संबंधांबद्दल शेअर करत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने चंद्रशेखर यांच्यातील कथित वैयक्तिक संबंध सार्वजनिक केले आहेत. तिने आरोप केला आहे की ‘चंद्रशेखर यांनी तिला प्रेमात बांधून तिच्या तारुण्याचा मौल्यवान वेळ वाया घालवला आणि जेव्हा लग्नाचा प्रश्न आला तेव्हा त्याने तिला सोडले’

चंद्रशेखर आझाद यांच्यावर रोहिणीचे आरोप

रोहिणींच्या मते, ही फक्त तिची कहाणी नाही तर अशा अनुभवांमधून जाणाऱ्या हजारो मुलींची सत्यता आहे. “प्रथम मुलीसाठी सर्व काही करा, तिला तुमच्या प्रेमात पूर्णपणे वेडी करा, तिचा विश्वास संपादन करा, तुम्ही तिचे प्रेम आहात, यावर तिचा विश्वास बसू द्या. नंतर २५ ते ३० वर्षांच्या वयात जेव्हा तिला जोडीदाराची गरज असते तेव्हा तिच्या तारुण्याचा तो मौल्यवान वेळ हिरावून घ्या.”

घावरी पुढे लिहितात, “ती मुलगी तुम्हाला लग्न करायला सांगते तेव्हा तिला या वयातील सर्वात मोठा आघात, नैराश्य दिल्यानंतर तिला सोडून द्या. त्या मुलीला हे सर्व का घडले हे समजू नये, त्या मुलीने लग्न आणि नात्यांवरचा विश्वास गमावावा आणि नंतर आयुष्यभर विधवेसारखे रंगहीन जीवन जगावे. इतक्या प्रामाणिकपणे नातेसंबंध टिकवूनही असे का घडले हे तिने स्वतःला विचारत राहावे.”

सुगंधी गजरा केसांच्या सौंदर्यातच नाही घालत भर, तर आरोग्यासाठीही आहे फायदेशीर

“हा समाज मुलीच्या चारित्र्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आणि कुटुंबही तिला दोष देते. त्या मुलीचे दुःख वाढतच राहते, ती एकटीच दुःख सहन करत राहते. पण, जेव्हा ती मुलगी तिच्यासोबत झालेल्या फसवणुकीबद्दल बोलू लागते, तेव्हा त्याला ब्लॅकमेलिंगचे षड्यंत्र आणि गैरसमज म्हटले जाते. ही फक्त माझी कहाणी नाही, तर जगातील सर्व मुलींची वेदना आहे, ज्यांच्यासोबत हे घडते आणि त्या त्रास सहन करत राहतात.”

रोहिणी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आत्महत्येच्या विचारांचाही उल्लेख करत लिहिले आहे की, ‘अशा फसवणुकीमुळे आणि सामाजिक दबावामुळे अनेक मुली आत्महत्या करतात. जर मी आज स्वतःसाठी लढलो नाही, तर देशातील उर्वरित मुलींसाठी मी कसे लढेन? माझी प्रामाणिकता हाच माझा पुरावा आहे.” असं रोहिणी घावरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच, ही पोस्ट व्हायरल होत असून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर खासदार चंद्रशेखर आझाद यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्याच वेळी, भीम आर्मीने हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला असून हा भाजपचा राजकीय कट असल्याचा आरोप केला आहे. तसेच, चंद्रशेखर आझाद यांची प्रतिमा खराब करण्यासाठी ही एक सुनियोजित योजना आहे, जी निवडणुकीनंतर सक्रिय होत असल्याचेही संघटनेने स्पष्टीकरण दिले आहे.

Web Title: Mp chandrashekhar azad harassed me woman makes serious allegations showing direct evidence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 05:23 PM

Topics:  

  • Chandrashekhar Azad
  • crime news

संबंधित बातम्या

पैशाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी सिगारेटचे चटके दिले अन् नंतर गळाच चिरला
1

पैशाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी सिगारेटचे चटके दिले अन् नंतर गळाच चिरला

Bhayander Crime : ऑनलाईन फसवणूक टोळीचा पर्दाफाश; गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई
2

Bhayander Crime : ऑनलाईन फसवणूक टोळीचा पर्दाफाश; गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई

Crime News: सौरपंपाची केबल चोरणारी टोळी सक्रिय; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
3

Crime News: सौरपंपाची केबल चोरणारी टोळी सक्रिय; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Crime News: नोकरीचे अमिष दाखवले अन् तब्बल 11 लाखांची फसवणूक; कुठे घडला हा प्रकार?
4

Crime News: नोकरीचे अमिष दाखवले अन् तब्बल 11 लाखांची फसवणूक; कुठे घडला हा प्रकार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.