वर्धापन दिनी काय म्हणाले खासदार निलेश लंके (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचा २६ वा वर्धापन दिन पार पडला. 26 व्या वर्धापन दिनी शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. आज पुण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, “मागच्या वर्षभरात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाली. यामध्ये गोष्टी कशा बदलतात हे आपल्याला दिसून आले. जो संकटाच्या काळात काळात पक्षाची साथ देऊ शकतो आणि पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो तोच खरा पवार साहेबांचा मावळा आहे.”
पुढे बोलताना लंके म्हणाले, “आता लोक विचारतात कसे आणि आय होणार? मात्र मी तुम्हाला सांगतो की, रज सकाळी उठल्यावर संघर्ष करण्याची तयारी ठेवयाची. लोकांच्या अडचणीचा लोकांच्या संघर्षाच्या काळात त्यांची मदत करायची, त्यांच्यासोबत उभे राहायचे. राजकारणामध्ये वेळ काळ बदलत असते. ना चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे, असे आपल्या खेड्यांत म्हणतात. मग कोणतेही पात्र आले तरी ते यशस्वी पार पाडायची जबाबदारी आपण ठेवायची.”
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“आज आपण आदरणीय पवार साहेबांचे नेतृत्वाखाली काम करतो. सत्ता येते किंवा सत्ता जाते. पवार साहेबांच्या सहवासात राहण्यासाठी कित्येक लोकांचा जीव तळमळतो. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. आयुष्याच्या 55 वर्षाच्या राजकारणामध्ये 25 वर्षे विरोधी बाकावर बसून, कारकीर्द पार पाडणारा आपला नेता आहे. साहेबांना माझ्या काही गोष्टी पटत नाहीत, न आम्ही आपल्या यांच्या पद्धतीने करत राहतो, असे खासदार निलेश लंके म्हणाले.
जयंत पाटलांची वरिष्ठाच्या समोर मोठी मागणी
राज्यामध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये राष्ट्रवादीचा 26 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. यामुळे राष्ट्रवादी समर्थकांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण आहे. युतीची चर्चा सुरु असताना दोन्ही राष्ट्रवादीचे दोन स्वतंत्र मेळावे घेतले जात आहेत. यामध्ये शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची मागणी केली आहे.
मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा…; वर्धापन दिनी जयंत पाटलांची वरिष्ठाच्या समोर मोठी मागणी
वर्धापन दिनी भाषण करताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदावरुन मुक्त करावे अशी मागणी केली आहे. जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांनी मला सात वर्षे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. आता मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा. प्रदेशाध्यक्ष पदासाठी पक्षाने नवीन चेहऱ्यांना संधी देणे देखील आवश्यक आहे. यानिमित्ताने सर्वांच्या समोर मी शरद पवारांना विनंती करेल की मला प्रदेशाध्यक्षपदावरुन मुक्त करा, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले आहे.