Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parliament Live : महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेवरुन रणकंदन; लोकसभेत राहुल गांधी घेणार खरपूस समाचार

महिला आरक्षण कायदा २०२३ मध्ये सुधारणा करणाऱ्या विधेयकावर आज शुक्रवारी दुपारी ४ वाजता मतदान होणार आहे.त्यापूर्वी राहुल गांधी संसदेमध्ये भूमिका मांडण्याची शक्यता आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 17, 2026 | 11:36 AM
MP Rahul Gandhi discussesWomen Reservation and Delimitation Bill in Lok Sabha live news

MP Rahul Gandhi discussesWomen Reservation and Delimitation Bill in Lok Sabha live news

Follow Us
Follow Us:
  • महिला आरक्षणावरुन संसदेचे वातावरण तापले
  • राहुल गांधी आज घेणार सत्ताधाऱ्यांचा समाचार
  • चार वाजता संसदेमध्ये पार पडणार मतदान
 

Parliament Live : नवी दिल्ली : महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. काल (दि.16) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या भाषणामध्ये ही विधेयक मंजूर करण्याचे सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांने आवाहन केले. मात्र यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादंग झाला. हे विधेयक एक भाजपचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे. आज देखील संसदेमध्ये या विधेयकावर चर्चा होणार असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) भाजपवर निशाणा साधला.

महिला आरक्षण कायदा २०२३ मध्ये सुधारणा करणाऱ्या विधेयकावर आज शुक्रवारी दुपारी ४ वाजता मतदान होणार आहे. वृत्तानुसार, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज या विषयावर आपले मत मांडण्याची शक्यता आहे. संसद आणि राज्य विधानमंडळांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारा महिला आरक्षण कायदा, २०२३ लागू झाला आहे. केंद्रीय कायदा मंत्रालयाने गुरुवारी रात्री जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हा कायदा आता प्रभावी झाला आहे. २०२९ पासून प्रभावी करण्याच्या उद्देशाने त्याच कायद्यात सुधारणा करण्यासाठी संसदेत एक नवीन विधेयक सादर केले गेले असतानाही, सरकारने २०२३ मध्ये मंजूर झालेला कायदा १६ एप्रिलपासून का लागू केला आहे, हे अस्पष्ट आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने यामागे “तांत्रिक कारणे” असल्याचे म्हटले आहे.

हे देखील वाचा : EDच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपची चाल? AAP मंत्री संजीव अरोरा यांच्या घरावर छापा

महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार?
अधिसूचनेत म्हटले आहे की, संविधान (एकशे सोळावी दुरुस्ती) अधिनियम, २०२३ च्या कलम १(२) अंतर्गत, केंद्र सरकारने १६ एप्रिल, २०२६ ही तारीख निश्चित केली आहे, ज्या तारखेपासून या तरतुदी अंमलात येतील. सप्टेंबर २०२३ मध्ये, संसदेने ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’, जो ‘महिला आरक्षण अधिनियम’ म्हणूनही ओळखला जातो, मंजूर केला. या कायद्यानुसार लोकसभा आणि राज्य विधानसभेत महिलांसाठी एक-तृतीयांश जागांचे आरक्षण प्रदान करण्यात आले आहे. २०२३ च्या मूळ तरतुदींनुसार, २०२७ च्या जनगणनेनंतर परिसीमन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय हे आरक्षण लागू होऊ शकत नाही, त्यामुळे ते लागू होण्याची अंतिम मुदत वाढवली जात असल्याचे दिसते.

महिला आरक्षणावर पंतप्रधान मोदींचे वक्तव्य
संसदेतील चर्चेदरम्यान, पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले, “निवडणुकांमध्ये ज्या कोणी महिलांच्या या हक्काला विरोध केला आहे, त्यांना चांगला परिणाम मिळालेला नाही. मी तुम्हाला आवाहन करतो की, याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका. विकसित भारताच्या दिशेने एकत्र पुढे जाण्याची ही आपल्या सर्वांसाठी एक संधी आहे. देशातील महिला शक्ती आपल्या निर्णयांचे तसेच आपल्या हेतूंचेही मूल्यमापन करेल.”

हे देखील वाचा : “विधेयकाला विरोध म्हणजे निवडणुकीत….”; संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना थेट इशारा

प्रियांका गांधींचा सरकारवर हल्ला
काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सांगितले की, त्यांनी प्रस्तावाचा मसुदा वाचला आहे. त्या म्हणाल्या, “त्यात म्हटले आहे की महिला आरक्षण २०२९ पर्यंत लागू केले जाईल, ज्याला आम्ही सहमत आहोत. त्यात जागांची संख्या ८५० पर्यंत वाढवण्याची आणि २०११ च्या जनगणनेवर आधारित परिसीमन आयोग स्थापन करण्याची मागणीही आहे. पण यात राजकारणाचा अंश आहे.”

Web Title: Mp rahul gandhi discusseswomen reservation and delimitation bill in lok sabha live news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • Women Reservation Bill

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.