Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रतिष्ठित क्रिकेट क्लबांच्या किचनमधील धक्कादायक वास्तव; झुरळे, बुरशी अन् एफडीएने केले ५ परवाने निलंबित

मुंबईतील नामांकित क्रिकेट आणि स्पोर्ट्स क्लबांच्या किचनमध्ये अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तपासणीनंतर अनेक आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 29, 2026 | 10:34 AM
प्रतिष्ठित क्रिकेट क्लबांच्या किचनमधील धक्कादायक वास्तव; झुरळे, बुरशी अन् एफडीएने केले ५ परवाने निलंबित

प्रतिष्ठित क्रिकेट क्लबांच्या किचनमधील धक्कादायक वास्तव; झुरळे, बुरशी अन् एफडीएने केले ५ परवाने निलंबित

Follow Us
Follow Us:
  • मुंबईतील ७ क्लब, कॅण्टीन आणि रेस्टॉरंटची विशेष तपासणी; ५ एफएसएसएआय परवाने निलंबित.
  • तपासणीत झुरळे, बुरशी लागलेल्या भाज्या, मुदतबाह्य अन्न आणि अस्वच्छतेचे गंभीर प्रकार उघड.
  • परवान्याशिवाय कॅटरिंगसह विविध नियमभंग आढळल्याने संबंधित आस्थापनांवर कठोर कारवाई.
सदस्यत्व, प्रतिष्ठा आणि उच्चभ्रू ग्राहकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील नामांकित क्रिकेट व स्पोर्ट्स क्लबांच्या किचनमध्येच अन्नसुरक्षा नियमांची पायमल्ली होत असल्याचे धक्कादायक वास्तव अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष तपासणीत उघड झाले आहे. राज्यभर सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत मुंबईतील सात क्लब, कॅण्टीन आणि रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पाच आस्थापनांचे एफएसएसएआय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले.

Priyanka Gandhi Loksabha: बलात्काऱ्यांचे समर्थन करणाऱ्याला शिक्षण मंत्री पद…; प्रियांका गांधींची जहरी टिका

कारवाई झालेल्या आस्थापनांमध्ये क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, आर. के. जुहू जिमखाना, द अपर्णा-जुहू जिमखाना, एमआयजी क्रिकेट क्लब (बांद्रा पूर्व) आणि विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब यांचा समावेश आहे. तर गोरेगाव स्पोर्ट्स क्लबला व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली असून एका आस्थापनाला सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे.

किचनमध्ये झुरळे-माश्या अन बुरशी लागलेल्या भाज्या

तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी किचनमध्ये झुरळे, माशांचा प्रादुर्भाव, बुरशी लागलेल्या भाज्या, मुदतबाह्य खाद्यपदार्थ, अन्न साठवणुकीतील गंभीर त्रुटी, स्वच्छतेचा अभाव आणि कर्मचाऱ्यांकडून सुरक्षा नियमाचे उल्लंघन आढळले. काही ठिकाणी शाकाहारी व मांसाहारी पदार्थ एकत्र ठेवले जात असल्याने क्रॉस कंटॅमिनेशनचा धोका निर्माण झाल्याचेही निदर्शनास आले. विशेष म्हणजे, एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये वैध एफएसएसएआय परवान्याशिवाय तृतीय-पक्षीय केटरिंग संस्था कार्यरत असल्याचे तपासणीत उघड झाले, तर क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये खराब भाज्या, मुदतबाह्य अन्नसाठा आणि अस्वच्छ किचन आढळल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून, नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही आस्थापनाला पाठीशी घातले जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

जुन्या ‘पूर्णिमा’ हॉटेलवरही कारवाईचा बडगा

मुंबईच्या फोर्ट परिसरातील जुन्या आणि प्रसिद्ध पूर्णिमा रेस्टॉस्टवरही अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे, तपासणीत कच्च्या भाज्यांवर बुरशी, रेफ्रिजरेशन युनिटमध्ये कच्चे व शिजवलेले अन्न एकत्र साठवणे, माशांचा प्रादुर्भाव, अस्वच्छ नाले, गंजलेल्या भिंती, वैद्यकीय नोंदींचा अभाव आणि अन्न हाताळताना सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळले. या गंभीर त्रुटींमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असा निष्कर्ष काढत एफडीएने पूर्णिमा रेस्टॉरंटचा एफएसएसए‌आय परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. सर्व त्रुटी दूर करून अन्नसुरक्षा नियमांचे पालन केल्यानंतरच परवाना पुनर्संचयित करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस; हिमाचल प्रदेशात भूस्खलन, 290 रस्ते वाहतुकीसाठी बंद

एमआयजी क्लब; विनापरवाना कॅटरिंग व्यवसाय

  • मुंबईतील ७ क्लब, कॅण्टीन आणि रेस्टॉरंटची विशेष तपासणी
  • ५ आस्थापनांचे एफएसएसएआय परवाने तत्काळ निलंबित
  • १ आस्थापनाला व्यवसाय बंद करण्याची नोटीस
  • झुरळे, माश्या, बुरशी लागलेल्या
  • भाज्या आणि मुदतबाह्य अन्नसाठा आढळला
  • एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये परवान्याशिवाय कॅटरिंग व्यवसाय उघड
  • पूर्णिमा रेस्टॉरंटवरही गंभीर अन्नसुरक्षा उल्लंघनांमुळे कारवाई
 

 

Web Title: Mumbai fda suspends fssai licenses of cricket clubs over food safety violations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • FDA
  • FDA Raid
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू
1

KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

Solapur News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; अभिनव स्नॅक्सला तात्काळ व्यवसाय बंदचे आदेश
2

Solapur News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; अभिनव स्नॅक्सला तात्काळ व्यवसाय बंदचे आदेश

FDA News: एफडीएची राज्यभर धडक कारवाई! 3 महिन्यांत 12,083 तपासण्या; तब्बल 67.20 कोटींचा अन्नसाठा जप्त
3

FDA News: एफडीएची राज्यभर धडक कारवाई! 3 महिन्यांत 12,083 तपासण्या; तब्बल 67.20 कोटींचा अन्नसाठा जप्त

ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप
4

ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.