Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“बांग्लादेशातील हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करणे ही …”; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्वाचे विधान

जगात अशी अनेक लोक असतात त्यांना इतर देशांवर सत्ता मिळवायची असते, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 15, 2024 | 07:59 PM
"बांग्लादेशातील हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करणे ही ...''; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्वाचे विधान

"बांग्लादेशातील हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करणे ही ...''; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्वाचे विधान

Follow Us
Close
Follow Us:

बांग्लादेशमध्ये सत्तापालट झाल्यानंतर देखील काही भागात हिंसाचार सुरूच आहे. आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाने तीव्र स्वरूप धारण केले आणि चक्क त्याकाळातील पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जावे लागले आणि पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर तिथे सुरू झालेल्या हिंसाचारात हिंदू समाजातील लोकांवर देखील हल्ले होऊ लागले आहेत. यावर अनेक दिवसांपासून चिंता व्यक्त केली जात आहे. तिथे होणाऱ्या हिंदूंवरील हल्ल्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे. तेथील हिंदूंना अत्याचाराचा सामना करावा लागू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे ते म्हणाले आहेत.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आज महल येथील संघ कार्यालयात झेंडावंदन पार पडले. यावेळी मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, ”बांग्लादेशात राहणाऱ्या हिंदूंना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही आपली जवाबदारी आहे.”

पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले, ”स्वातंत्र्याच्या ‘स्व’ चे रक्षण करणे हे येणाऱ्या पिढीचे कर्तव्य आहे. जगात अशी अनेक लोक असतात त्यांना इतर देशांवर सत्ता मिळवायची असते. आपण त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे तसेच त्यांच्यापासून स्वतःचे रक्षण केले पाहिजे. परिस्थिती नेहमी सारखी राहत नाही. कधी स्थिती चांगली असते तर कधी चांगली नसते. हे चढ-उतार तर सुरूच राहतात.दुसऱ्यांची मदत करणे ही भारताची परंपंरा आहे. आपण गेले काही वर्षे पाहिले असेल की, भारताने कोणावर आक्रमण केले नाही. तर अडचणीत अडकलेल्यांची मदतच केली आहे.

Web Title: Nagpur reshimbaug rss chief mohan bhagwat said bangladeshi hindus safety is indias duty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 07:59 PM

Topics:  

  • Rss Chief Mohan Bhagwat

संबंधित बातम्या

‘भारत हे फक्त एक नाव नाही तर..; देशाच्या नावावरून सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान
1

‘भारत हे फक्त एक नाव नाही तर..; देशाच्या नावावरून सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान

RSS च्या ‘त्या’ मागणीवरुन काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांनी केली जोरदार टीका
2

RSS च्या ‘त्या’ मागणीवरुन काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांनी केली जोरदार टीका

“… तर त्याला धडा शिकवण्यास मागेपुढे पाहत नाही”; RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3

“… तर त्याला धडा शिकवण्यास मागेपुढे पाहत नाही”; RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान

Narendra Modi | RSS Headquater मोदी रेशीमबागेत, विरोधकांना पोटशूळ ! Mohan Bhagwat |Nagpur | Politics
4

Narendra Modi | RSS Headquater मोदी रेशीमबागेत, विरोधकांना पोटशूळ ! Mohan Bhagwat |Nagpur | Politics

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.