जयपूर: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी केली. आता भारत पाकिस्तान तणाव निर्माण झाला आहे. यावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे. मोहन भागवत जयपूरमध्ये बोलत होते. भारत कोणाशीही शत्रुता ठेवत नाही, असे भागवत म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, “भारत कोणाशीही शत्रुता ठेवत नाही. मात्र कोणी भारताशी शत्रुता करण्याचा प्रयत्न केला तर त्याला धडा शिकवण्यास भारत मागेपुढे पाहत नाही. भारताने नेहमीच दुसऱ्या देशांना मदत केली आहे. जेव्हा तुमच्याकडे शक्ती असते तेव्हाच संपूर्ण जग तुमचे ऐकते.”
पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले, “भारताची भूमिका जगभरात मोठ्या बंधुप्रमाणे आहे, ज्याचे कार्य शांतता ठेवणे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जयपूरमध्ये रविनाथ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त बोलत होते. ”
‘आरएसएस’ची ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भर्तवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने तो सपशेल हाणून पाडला. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानची बोलती बंद केली आहे. आता ऑपरेशन सिंदूरवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली प्रतिक्रिया दिली आहे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताच्या सुरक्षा दलांना पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. तसेच ऑपरेशन सिंदूरचे कौतुक देखील केले आहे. “आम्ही पहलगाममधील पर्यटकांवर पाकिस्तान नियोजित दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला केंद्र सरकार आणि सुरक्षा दलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल त्यांचे अभिनंदन करतो”, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
RSS News: “देशाच्या संरक्षणासाठी…”; ‘Operation Sindoor’ वर ‘आरएसएस’ची महत्वाची प्रतिक्रिया आली समोर
संकटाच्या काळात आरएसएस सरकारच्या सोबत
भारताने पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले की, “देशाच्या संरक्षणासाठी दहशतवादी आणि त्यांच्या पायाभूत सुविधांवर कारवाई करणे आवश्यक आहे. याच्याशी आम्ही संपूर्ण सहमत आहोत. या संकटाच्या काळात संपूर्ण देशवासी सुरक्षा दले आणि सरकारच्या पाठीशी आहे.”
संघाचे नागरिकांना आवाहन
सरकार आणि प्रशासन डेट असलेल्या सुचनांचे पालन करावे. आपल्या सर्वांना सावध आणि सतर्क राहायचे आहे. तसेच राष्ट्रविरोधी कोणत्याही शक्तीला त्यांचे हेतू साध्य होऊ द्यायचे नाहीयेत. त्यासाठी देशवासीयांनी सतर्क राहावे असे आवाहन संघाने नागरिकांना केले आहे.