दिल्ली : देशामध्ये लोकसभा निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नसले तरी देखील एनडीए आघाडीच्या बळावर पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी हे येत्या 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी एनडीए आघाडीची संसदेमध्ये बैठक बोलावण्यात आली होती. जुन्या संसदेमध्ये बोलावण्यात आलेल्या या बैठकीला एनडीए आघाडीच्या सर्व घटनपक्षांनी उपस्थिती लावली आहे. तसेच चंद्रबाबू नायडू आणि नीतीश कुमार देखील उपस्थित आहेत. यावेळी नरेंद्र मोदी हे संविधानासमोर नतमस्तक झाले आहेत.
एनडीएच्या या बैठकीला नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व घटकपक्षांचे जेष्ठ नेते उपस्थित आहेत. देशभरातील सर्व विजयी खासदार बैठकीला आले असून यामुळे संसदभवन गजबजले आहे. या बैठकीसाठी मंचावर नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, चंद्रबाबू नायडू आणि नीतीश कुमार उपस्थित आहेत. यावेळी चंद्रबाबू नायडू यांनी मोदींच्या नेतृत्वाला मान्यता दिली असून मोदींच्या नेतृत्वात देश अव्वलस्थानी आहे. तसेच सबका साथ सबका विकास होणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.
एएनआय ट्वीट
#WATCH | Prime Minister Narendra Modi respectfully touches the Constitution of India with his forehead as he arrives for the NDA Parliamentary Party meeting. Visuals from the Central Hall of the Samvidhan Sadan (Old Parliament). pic.twitter.com/JU6D9M0Jca — ANI (@ANI) June 7, 2024
या बैठकीला आल्यानंतर नरेंद्र मोदी हे संविधानासमोर नतमस्तक झाले. संविधानाची प्रत ठेवण्यात आलेली असताना त्यांनी तिथे हात जोडत नमस्कार केला. यावेळी बैठकीमध्ये राजनाथ सिंह यांनी संसदीय गटनेते पदी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाचं अमित शाह यांनी समर्थन केले. तसेच प्रस्तावाला नितीन गडकरी यांनी देखील अनुमोदन केले. यावेळी सभागृहामध्ये टाळ्यांच्या कडकडाटासह मोदी मोदी चा जयघोष करण्यात आला आहे. यावेळी विजयी उमेदवारांमध्ये एकच उत्साह दिसून येत आहे.
एएनआय ट्वीट
#WATCH | Delhi: Newly elected MPs, Chief Ministers and other leaders of the NDA chant ‘Modi-Modi’ during the NDA Parliamentary Party meeting at Samvidhan Sadan (Old Parliament) pic.twitter.com/WuFZz9YAbD — ANI (@ANI) June 7, 2024






