रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू की सनरायझर्स हैदराबाद, IPL मध्ये कोणाचे पारडे जड? (Photo Credit- X)
परीक्षण करता, हैदराबादचे पारडे जड असल्याचे दिसून येते. आतापर्यंत या दोन संघांमध्ये एकूण 25 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. यापैकी बंगळुरूने 11 सामने जिंकले आहेत, तर हैदराबादने त्यापेक्षा दोन सामने अधिक जिंकत एकूण 13 विजयांची नोंद केली आहे. एक सामना अनिर्णित राहिला. हैदराबादविरुद्ध बेंगळुरूची सर्वोच्च धावसंख्या 262 धावा इतकी आहे, तर गतविजेत्या संघाविरुद्ध हैदराबादची सर्वोच्च धावसंख्या 287 धावा आहे. किमान धावसंख्येचा विचार करता, बंगळुरूची सर्वात कमी धावसंख्या 68 धावा आहे, तर हैदराबादची सर्वात कमी धावसंख्या 125 धावा आहे.
डिफेंडिंग चॅम्पियन आरसीबीसाठी हंगामाची सुरुवात आव्हानात्मक ठरणार आहे. गेल्या हंगामात विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे दोन प्रमुख गोलंदाज या सामन्यात उपलब्ध नसतील. दुखापतीमुळे हेझलवूड सध्या ऑस्ट्रेलियात पुनर्वसन करत असून, तो सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. गंभीर कायदेशीर आरोपांमुळे यश दयाल या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. आरसीबीची भिस्त आता अनुभवी भुवनेश्वर कुमार, कृणाल पांड्या, सुयश शर्मा आणि युवा वेगवान गोलंदाज मंगेश यादव यांच्यावर असेल.
IPL 2026: विराटचा 973 धावांचा विक्रम कोण मोडणार? RCB च्या ‘या’ स्टार खेळाडूने केले मोठे भाकित
दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादच्या संघातही मोठे बदल पाहायला मिळत आहेत. कर्णधार पॅट कमिन्स सुरुवातीच्या टप्प्यात उपलब्ध नसल्याने यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याच्याकडे प्रभारी कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. हैदराबादची गोलंदाजी फळी कागदावर थोडी कमकुवत वाटत असून, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट आणि हर्ष दुबे यांना चिन्नास्वामीच्या सपाट खेळपट्टीवर फलंदाजांना रोखण्याचे मोठे आव्हान असेल.
गोलंदाजीतील उणीवा भरून काढण्यासाठी दोन्ही संघ आपल्या आक्रमक फलंदाजीवर अवलंबून असतील.






