३२ लाख मुस्लिमांना 'सौगात-ए-मोदी'
PM Narendra Modi Address: दिल्ली विधानसभेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये भाजपने 27 वर्षांनी कमबॅक केले आहे. 2020 मध्ये 8 जागा जिंकणाऱ्या भाजपने या निवडणुकीत थेट 48 जागा जिंकल्या आहेत. 10 वर्षांच्या केजरीवालांच्या सत्तेचा गड भाजपने भेदला आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. दिल्लीत आता भाजपचे सरकार येणार हे स्पष्ट होताच कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. पंतप्रधान मोदी यांनी देखील जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात जाऊन विजय साजरा केला आणि कार्यकर्त्यांना संबोधित देखील केले.
भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” दिल्लीकरांमध्ये आज उत्साह आणि आनंद पाहायला मिळत आहे. दिल्लीला ‘आपदा’ पासून मुक्त झाल्याचा दिलासा देखील दिसत आहे. भाजपला दिल्लीची सेवा करण्याची संधी द्यावी असे पत्र मी प्रत्येक दिल्लीवासीयाला लिहिले होते. मोदींच्या गॅरंटीवर विश्वास ठेवल्याबद्दल मी दिल्लीतील प्रत्येक कुटुंबाचे विनम्र अभिवादन करतो. ”
Watch LIVE: Celebrations of landslide victory of BJP in Delhi Assembly Elections at BJP headquarters.#दिल्ली_के_दिल_में_मोदी
https://t.co/aydFWRDblp— BJP (@BJP4India) February 8, 2025
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, “आज विश्वास, व्हिजन आणि विकासाचा विजय झाला आहे. 10 वर्षांच्या ‘आपदा’पासून दिल्ली मुक्त झाली आहे. दिल्लीचा जनादेश स्पष्ट आहे. आज अराजकता, अहंकार आणि दिल्लीवर आलेले ‘आपदा’ चे संकट दूर झाले आहे. या विजयाने भाजपच्या कार्यकर्त्यांची अहोरात्र मेहनत यशस्वी झाली आहे. दिल्लीचे खरे मालक केवळ आणि केवळ जनता आहे, हे दिल्लीकरांनी आज स्पष्ट केले आहे. दिल्लीच्या जनतेने शॉर्टकटच्या राजकारणाचे शॉर्टसर्किट करून टाकले.”
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, “दिल्लीच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत कधीही मला निराश केले नाही . 2014, 2019 आणि 2024 मध्ये दिल्लीच्या जनतेने भाजपला 7 पैकी 7 जागांवर विजयी केले. भाजपच्या डबल इंजिन सरकारवर देशातील जनतेचा किती विश्वास आहे हे आजचा विजय दर्शवत आहे. याआधी आम्ही हरयाणा आणि महाराष्ट्रात अभूतपूर्व विक्रम केला. दिल्लीत नवीन इतिहास रचला गेला आहे. दिल्ली केवळ एक शहर नाहीये तर दिल्ली हा लघु भारत आहे. आज दिल्लिणे भाजपला मोठा जनादेश दिला आहे. दिल्लीतील आज कोणता असा भाग नाही ज्या ठिकाणी कमल फुलले नाही. ”
“दिल्लीच्या या मोठ्या यशाबरोबरच अयोध्या येथील मिल्कीपूर पोटनिवडणुकीत देखील भाजपचा शानदार विजय झाला आहे. प्रत्येक वर्गाने मोठ्या संख्येने भाजपला मतदान केले. अभूतपूर्व विजय दिला आहे. भाजप दिल्लीला आधुनिक शहर बनवणार. आज देश तुष्टीकरण नाही तर भाजपच्या संतूष्टीकरण धोरणाची निवड करत आहे. गेल्य 10 वर्षांत दिल्लीचे खूप नुकसान झाले. जनतेने विकासाच्या मधील ही अडचण आता दूर केली आहे. यांनी मेट्रोचे काम थांबवले. नागरिकांना घरे मिळू दिली नाहीत. योजनांचा लाभ मिळू दिला नाही, अशी टीका देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.