Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नक्षलवाद्यांचा खेळ खल्लास! कुख्यात नेता ‘भूपती’सह ६० सहकाऱ्यांनी थेट…; गडचिरोलीत नेमके घडले काय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील एकतर सरेंडर करा नाही तर सुरक्षा दलांच्या गोळीचे शिकार व्हा असा इशारा नक्षलवाद्यांना दिला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 14, 2025 | 03:01 PM
नक्षलवाद्यांचा खेळ खल्लास! कुख्यात नेता 'भूपती'सह ६० सहकाऱ्यांनी थेट...; गडचिरोलीत नेमके घडले काय?

नक्षलवाद्यांचा खेळ खल्लास! कुख्यात नेता 'भूपती'सह ६० सहकाऱ्यांनी थेट...; गडचिरोलीत नेमके घडले काय?

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारने नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील एकतर सरेंडर करा नाही तर सुरक्षा दलांच्या गोळीचे शिकार व्हा असा इशारा नक्षलवाद्यांना दिला आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकार देखील गडचिरोली भागात मोठ्या प्रमाणात विकासकार्य करत आहे. तसेच त्या ठिकाणी त्यांनी नक्षलवाद्यांचा बीमोड केला आहे. दरम्यान आता तब्बल ६१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

नक्षलवादाच्या इतिहासात एकचवेळेस ६१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नक्षलवाद्यांचा कुख्यात नेता सोनू याच्यासह ६० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नक्षलवाद्यांचा नेता असणारा भूपती उर्फ सोनूवर तब्बल १ कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. दरम्यान सोनूने आपल्या सहकाऱ्यांसाह आत्मसमर्पण केल्याने नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे.

तब्बल ६१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षलवादी चळवळ खिळखिळी झाल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही वर्षांत गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोली जिल्हा हा नक्षलवाद्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. आता त्या ठिकाणी केंद्र व राज्य सरकारने एकत्रितपणे मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. सुरक्षा दलांनी अनेक नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले

भारत सरकारने गेल्या काही महिन्यांपासून नक्षलवाद्यांच्या विरुद्ध मोठी मोहीम राबवत आहे. भारतीय सुरक्षा दलांनी आपली कारवाई तीव्र केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त होईल, असे मोठे विधान केले आहे. दरम्यान नक्षलवाद्यांनी केंद्र सरकारकडे युद्धविराम करण्याचा प्रस्ताव धाडला होता. हा प्रस्ताव आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धुडकावून लावला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांना मोठा इशारा दिला आहे. नक्षलवाद्यांनी पाठवलेला शांततेचा प्रस्ताव केंद्र सरकारने धुडकावून लावला आहे. सरकार युद्धविराम करण्याच्या बाजूने नसल्याने अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. एकतर शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करावे किंवा सुरक्षादलांच्या गोळ्यांचे शिकार व्हा, हे दोनच पर्याय नक्षलवाद्यांच्यासमोर असल्याचे अमित शहा म्हणाले आहे.

Amit Shah on Naxalism: ‘३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल’, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे विधान

अमित शहा म्हणाले, “नुकतेच एक पत्र लिहून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. या पत्रात युद्धविराम होयला हवा असे सांगण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा युद्धविराम होणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो. आत्मसमर्पण करायचे असेल तर युद्धविरामाची आवश्यकता नाही. मात्र आता बोलणी नाही तर कठोर कारवाई केली जाणार आहे. ज्याचे लक्ष्य नक्षलवाद्यांना नष्ट करणे हाच आहे.

Web Title: Naxalite leader mallojula venugopal rao surrenders along with 60 associates in gadhchiroli maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • Anti Naxal Campaign
  • Gadchiroli
  • Gadchiroli Naxalites

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “कृषी आणि वन-आधारित उपजीविकेला चालना…”; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
1

Devendra Fadnavis: “कृषी आणि वन-आधारित उपजीविकेला चालना…”; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Gadchiroli: “दुचाकी बाजूला घे” म्हणणं महागात पडलं; दुचाकीस्वराने रस्त्यातच बस अडवली, थेट बसचालकाचे डोकेच फोडले
2

Gadchiroli: “दुचाकी बाजूला घे” म्हणणं महागात पडलं; दुचाकीस्वराने रस्त्यातच बस अडवली, थेट बसचालकाचे डोकेच फोडले

Devendra Fadnavis: “पुढील 8 वर्षांत पोलाद निर्मितीत…”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
3

Devendra Fadnavis: “पुढील 8 वर्षांत पोलाद निर्मितीत…”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Gadchiroli News: गडचिरोलीत मोठी कारवाई! चकमकीत 4 नक्षलवाद्यांचा खात्मा, ३ महिलांचा समावेश
4

Gadchiroli News: गडचिरोलीत मोठी कारवाई! चकमकीत 4 नक्षलवाद्यांचा खात्मा, ३ महिलांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.