LokSabha Election Pre-Survey: देशात आज लोकसभा निवडणुक झाली तर? भाजपचे स्वबळावर सरकार! 'इंडिया' आघाडीला किती जागा? पहाच...
Rahul Gandhi Vs Narendra Modi: देशात मागच्या वर्षी लोकसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आले आहे. मात्र या निवडणुकीत एनडीएला सत्ता मिळवण्यासाठी झगडावे लागले. इंडिया आघाडीने जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र इंडिया आघाडीने भाजपचा 400 पारचे लक्ष्य पार होऊ दिले नाही. मात्र त्यानंतर झालेल्या हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला प्रचंड मोठे यश प्राप्त झाले. दरम्यान देशात आज लोकसभा निवडणूक झाल्यास कोणाचे सरकार येऊ शकते, याचा एक सर्व्हे करण्यात आला आहे.
हरयाणामध्ये भाजपचे सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाले आहे. महाराष्ट्रात देखील भाजपला 132 जागा मिळाल्या आहेत. दिल्ली देखील भाजपने 48 जागा जिंकत तब्बल 27 वर्षांनी कमबॅक केले आहे. मात्र लागोपाठ झालेल्या परभवामुळे इंडिया आघाडीत काहीशी बिघडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंडिया आघाडीचे भविष्य काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र जनतेच्या मनात नेमके कोण आहे? एनडीए की इंडिया आघाडी? याबाबत ‘इंडिया टुडे’च्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेमध्ये उत्तर मिळतंय दिसून येत आहे. यामध्ये आज देशात लोकसभा निवडणूक झाल्यास कोणाची सत्ता येणार? इंडिया आघाडीने एकत्रित रहावे की वेगवेगळे लढावे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
इंडिया आघाडी कायम राहिली पाहिजे असे जवळपास 65 लोकांनी सांगितले आहे. तर 26 टक्के लोकांनी इंडिया आघाडी तुटली पाहिजे असे मत दिले आहे. या सर्व्हेमध्ये इंडिया आघाडीचे नेतृत्व कोणी केले पाहिजे असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला होता. त्यावळेस 24 टक्के लोकांनी राहुल गांधी यांचे नाव घेतले. 14 टक्के लोकांनी ममता बॅनर्जी यांचे नाव सुचवले. तर 9 टक्के लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्या नावाला पसंती दिली.
आज निवडणूक झाल्यास काय होणार?
इंडिया टुडे’च्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेनुसार देशात आज लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीएला मोठे यश मिळताना पाहायला मिळत आहे. एनडीएला जवळपास 343 जागा मिळण्याचा अंदाज यामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. तर भाजप एकट्याने बहुमत पार करताना दिसून येत आहे. भाजप 281 जागा जिंकू शकतो, असे या इंडिया टुडे’च्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेमध्ये सांगण्यात आले आहे. तर इंडिया आघाडील केवळ 188 जागा मिळण्याची शक्यता आहे.
बिहारच्या सर्व्हेत मोठा खुलासा; ‘NDA’ चा विजय मात्र नितीश कुमारांसोबत ‘खेला होबे’ होणार?
इंडिया टूडे सी-वोटरचा सर्व्हे हा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केला गेला होता. या सर्व्हेमध्ये बिहारवर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. या सर्व्हेनुसार बिहारमध्ये एनडीएची स्थिती अत्यंत मजबूत अशी पाहायला मिळत आहे. मात्र विरोधी पक्षात असलेल्या महागठबंधनला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हा सर्व्हे 2 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत केला गेला आहे. यासाठी देशातील 1, 25,123 लोकसभा मतदारसंघात लोकांची चर्चा केली गेली.