बिहार विधानसभा निवडणुकीत कोणाची सत्ता येणार? (फोटो- ट्विटर)
Bihar Assembly Election Pre-Survey: नुकतीच दिल्ली विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे. 70 पैकी 48 जागा जिंकत भाजपने दिललीमध्ये बहुमत प्राप्त केले आहे. तब्बल 27 वर्षांनी दिल्ली भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीत अजून मुख्यमंत्री कोण होणार यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे येत्या कही दिवसांमध्ये दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार यावर निर्णय होईल. दरम्यान या वर्षाखेरीस बिहारमध्ये देखील निवडणूक होणार आहे. हरयाणा, महाराष्ट्र, दिल्ली प्रमाणेच भाजप बिहारमध्ये देखील जादू करणार का, हे पहावे लागणार आहे.
इंडिया टूडे सी-वोटर (mood Of nation) ने बिहारच्या निवडणुकीआधी एक सर्व्हे केला आहे. त्यामध्ये काही वेगवेगळे अंदाज दर्शवण्यात आले आहेत. जर का आत्ता निवडणूक झाली तर बिहारमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए मोठे यश मिळवू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जर का आज निवडणूक झाली तर एनडीए मोठे यश प्राप्त करेल असे या सर्व्हेमध्ये सांगण्यात आले आहे.
इंडिया टूडे सी-वोटरचा सर्व्हे हा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केला गेला होता. या सर्व्हेमध्ये बिहारवर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. या सर्व्हेनुसार बिहारमध्ये एनडीएची स्थिती अत्यंत मजबूत अशी पाहायला मिळत आहे. मात्र विरोधी पक्षात असलेल्या महागठबंधनला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हा सर्व्हे 2 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत केला गेला आहे. यासाठी देशातील 1, 25,123 लोकसभा मतदारसंघात लोकांची चर्चा केली गेली.
महत्वाचे म्हणजे या सर्व्हेमध्ये नवीन आणि जुने आकडे यांचे विश्लेषण देखील करण्यात आले आहे. बिहारच्या शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांची मते देखील जाणून घेण्यात आली आहेत. सर्व्हेनुसार राजद आणि कॉँग्रेसला अंतर्गत मतभेदाचा फटका मोठ्या प्रमाणात बसू शकतो. जागावाटप यावरून तेजस्वी यादव यांच्या रणनीतीवर शंका उपस्थित होत आहे. बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप यांनी महागठबंधनच्या मतांना सुरुंग लावल्याचे आपण पहिले आहे.
राजकीय विश्लेषक यांच्या मतानुसार, बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मोठ्या अडचणीस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षे नितीश कुमार यांनी भाजपला सरकार करण्यापासून रोखले आहे. मात्र यंदा येणाऱ्या निवडणुकीत भाजपची स्थिती मजबू असण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये भाजपचे सरकार येण्याची दाट शक्यता आहे. नितीश कुमार यांची पकड सैल झाली असल्याचे म्हटले जात आहे.
काय सांगतो सर्व्हे?
एनडीएला 33 ते 35 जागा मिळू शकतात
एनडीएच्या मतांमध्ये 5 टक्के वाढ होऊ शकते
महागठबंधनच्या मतांमध्ये घसरण होऊ शकते
बिहारमध्ये एनडीए महागठबंधनचे नुकसान करण्याची शक्यता
येणारया बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपची स्थिती मजबूत असल्याचे पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये भाजप, नितीश कुमार आणि चिराग पासवान हे महागठबंधनला मोठा धक्का देऊ शकतात. जर का राजद आणि कॉँग्रेस योग्य नियोजन आणि रणनीती आखली नाही तर त्यांचा बिहारमध्ये पराभव होण्याची शक्यता आहे.