
JP Nadda, Ashutosh Ranka, Saurabh Das, CJP Protest
CJP Protest News: कॉकरोच जनता पार्टी आणि सरकार यांच्यातील बैठकांची दुसरी फेरी शुक्रवारी (२४ जुलै) पार पडली. सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी CJPच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. तर, कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी प्रतिनिधीत्व केले. या बैठकीला काही अधिकारीही उपस्थित होते
बैठकीनंतर जंतर मंतरवर परतल्यावर सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी मंचावरून परिस्थितीचा आढावा घेतला. आशुतोष रांका यांनी सांगितले की, सरकारने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शनिवारी (२५ जुलै) दुपारी ३:३० वाजता पुन्हा चर्चा बोलावली आहे. आम्ही सरकारला अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही यावर आता अधिक चर्चा करू शकत नाही. जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा लवकर झाला नाही, जर त्यांना पुढच्या एक-दोन दिवसांत बडतर्फ केले नाही, तर कॉकरोच जनता पार्टीकडून २० जुलैच्या आंदोलनासारखेच दुसरे देशव्यापी आंदोलन केले जाईल.
CJP Meeting Govt Meeting: धर्मेद्र प्रधान राजीनामा देणार? CJPसोबत केंद्राची मिटींगबाबत मोठी अपडेट
आम्ही सरकारला हेही सांगितले आहे की यावेळचे आंदोलन हे २० जुलैच्या आंदोलनापेक्षा मोठे आंदोलन असेल. आम्हाला वाटतं की सरकारला हे नक्कीच समजले असेल. आता त्यांनी मोदीजींना सांगावे की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय दुसरे काहीही मान्य केले जाणार नाही.”
CJP Press Conference: CJPच्या टीमला आज रात्री अटक होऊ शकते..; अभिजीत दिपकेंचा खळबळजनक दावा
जंतर मंतर येथील मंचावरून आशुतोष रांका यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारले की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय ते आंदोलन सोडणार का, यावर विद्यार्थ्यांनी नकारार्थी उत्तर दिले. विद्यार्थ्यांच्या उत्तरानंतर, आम्ही पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटू, तेव्हा धर्मेंद्र यांचा राजीनामा घेऊनच परत येऊ. आशा जिवंत ठेवा, खंबीर राहा आणि लढत राहा. आम्ही तुम्हाला एवढं नक्की सांगू शकतो: विजय अगदी जवळ आहे.” अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांचे ग्वाही दिली.
आजच्या बैठकीदरम्यान, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारसमोर मांडल्या. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा आग्रह सीजेपीच्या सदस्यांकडून करण्यात आला. पण दोन ते तीन मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही बोलले जात आहे. उद्या सरकारसोबत पुन्हा चर्चा होणार आहे. उद्या दुपारपर्यंत धर्मेद्र प्रधान राजीनामा देणार आहेत की नाही. याबाबच चित्र स्पष्ट होईल.