Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahijeet Dipke granted Bail : अभिजित दिपके यांना जामीन मंजूर, ‘या’ मोठ्या अटीवर सही केल्यावरच सुटका? दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

Ahijeet Dipke granted Bail : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्लीत जामीन मंजूर झाला आहे. शांतता बाँडवर स्वाक्षरी केल्यानंतर त्यांची सुटका होणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

  • By विवेक
Updated On: Oct 17, 2026 | 06:01 PM
Abhijeet Deepke

Abhijeet Deepke

Follow Us
Follow Us:
  • अभिजीत दिपके यांना जामीन
  • शांतता बाँडवर सुटका होणार
  • दिल्ली पोलिसांनी रॅलीपूर्वी घेतलं होतं ताब्यात
Ahijeet Dipke granted Bail : मोठी बातमी येत असून कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना जामीन मंजूर झाला आहे. लवकरच त्यांची सुटका होणार आहे. दिल्ली पोलिसांनी हि माहिती दिली असून एका मोठ्या अटीवर सही केल्यावरच दिपकेंची सुटका होणार आहे.

दिल्ली पोलिसांनी माहिती दिल्यानुसार, शांतता बॉन्डवर स्वाक्षरी केल्यावरच दिपके यांची सुटका होणार आहे. त्यानुसार SEM कोर्टाने दिपकेंचा जामीन मंजूर केला आहे.

शांतता बाँडवर स्वाक्षरी केल्यानंतर सुटका

दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘लेहरा दो तिरंगा’ रॅलीचं नेतृत्व करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतलं होतं. ही रॅली नवी दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरातील सेंट्रल पार्कमध्ये आयोजित करण्यात येणार होती. सार्वजनिक सभांवर निर्बंध घालण्यासाठी प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, दिपके यांना जामीन मंजूर करण्यात आला असून शांतता बाँडवर स्वाक्षरी केल्यानंतर त्यांची सुटका होईल.

CJP Ratna Singh on Abhijeet Dipke Arrest: तिरंगा फडकवण्याचे आवाहन करणे हा गुन्हा कसा; CJP नेत्या रत्ना सिंह आक्रमक सवाल

‘तिरंगा फडकवण्याचं आवाहन गुन्हा कसं?’

याबाबत रत्ना सिंह यांनी दिपके यांच्या अटकेला आव्हान दिलं होतं. रत्ना सिंह या CJP च्या कायदेविषयक प्रमुख आहेत. विशेष कार्यकारी दंडाधिकारी (SEM) न्यायालयाने त्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

‘नागरिकांना शांततापूर्ण राष्ट्रीय आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करणं हा गुन्हा कसा ठरू शकतो? त्यांनी केवळ तिरंगा फडकवण्याचं आवाहन केलं,’ असा सवाल सिंह यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून उपस्थित केला.

दिपके यांना त्यांच्या घराबाहेरून ताब्यात घेण्यात आलं, त्यांच्या ठावठिकाण्याची माहिती वेळेवर देण्यात आली नाही आणि वकिलांनाही त्यांची भेट घेता आली नाही, असे आरोप सिंह यांनी केले. या प्रकारामुळे मूलभूत अधिकार आणि कायदेशीर प्रक्रियेच्या पालनाबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचं त्यांनी म्हटलं.

SIR आंदोलनादरम्यान पोलिसांची कारवाई

निवडणूक आयोगाच्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (SIR) आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततांना विरोध करण्यासाठी देशभरात आंदोलनं सुरू आहेत. विरोधी पक्ष, INDIA आघाडीतील पक्ष आणि विद्यार्थी संघटनांकडूनही या मुद्द्यावर आंदोलन करण्यात येत आहे.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन करून जमाव जमल्याप्रकरणी सुमारे १५० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं असून काही FIR दाखल करण्यात आल्या आहेत. दिपके यांच्याविरोधात BNSS च्या कलम १२६ आणि १७० अंतर्गत स्वतंत्र प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली.

या प्रकरणात CJP ने पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेतला असला, तरी अटकेची कायदेशीर वैधता आणि संबंधित आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल.

SIR च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय; आता देशातील 17 राज्यांमध्ये…

💡

Frequently Asked Questions

  • Que: अभिजीत दिपके यांना जामीन का मंजूर झाला?

    Ans: अभिजीत दिपके यांना जामीन मंजूर झाला असून शांतता बाँडवर स्वाक्षरी केल्यानंतर त्यांची सुटका केली जाणार आहे.

  • Que: अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी का ताब्यात घेतलं?

    Ans: कनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्क येथे नियोजित ‘लेहरा दो तिरंगा’ रॅलीचं नेतृत्व करण्यापासून रोखण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आल.

  • Que: अभिजीत दिपके यांच्या अटकेवर CJP ने काय आक्षेप घेतला?

    Ans: CJP च्या कायदेविषयक प्रमुख रत्ना सिंह यांनी अटकेच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केला. शांततापूर्ण आंदोलनाचं आवाहन करणं हा गुन्हा कसा ठरू शकतो, तसेच दिपके यांच्या ठावठिकाण्याची माहिती आणि वकिलांना भेटण्याची संधी न दिल्याचा त्यांनी आरोप केला.

Web Title: Ahijeet dipke granted bail delhi police clarification sem court vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • CJP
  • CJP Protest
  • Delhi Police

संबंधित बातम्या

London Protests: लंडनमध्ये आंदोलने! पार्लमेंट स्क्वेअरबाहेर भारत निवडणूक आयोगाविरोधात निदर्शने, ध्रुव राठीचे समर्थक संघटित
1

London Protests: लंडनमध्ये आंदोलने! पार्लमेंट स्क्वेअरबाहेर भारत निवडणूक आयोगाविरोधात निदर्शने, ध्रुव राठीचे समर्थक संघटित

CJP Ratna Singh on Abhijeet Dipke Arrest: तिरंगा फडकवण्याचे आवाहन करणे हा गुन्हा कसा; CJP नेत्या रत्ना सिंह आक्रमक सवाल
2

CJP Ratna Singh on Abhijeet Dipke Arrest: तिरंगा फडकवण्याचे आवाहन करणे हा गुन्हा कसा; CJP नेत्या रत्ना सिंह आक्रमक सवाल

Sangli News: दिल्लीतील तिरंगा रॅलीतील तरुणांच्या अटकेचा सांगलीत निषेध; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
3

Sangli News: दिल्लीतील तिरंगा रॅलीतील तरुणांच्या अटकेचा सांगलीत निषेध; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.