Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

London Protests: लंडनमध्ये आंदोलने! पार्लमेंट स्क्वेअरबाहेर भारत निवडणूक आयोगाविरोधात निदर्शने, ध्रुव राठीचे समर्थक संघटित

London Protests : मतचोरीच्या आरोपावरून निवडणूक आयोगाविरोधात लंडनमध्ये आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. ध्रुव राठी यांनी आपल्या समर्थकांना पार्लमेंट स्क्वेअर येथे येण्याचे आवाहन केले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 17, 2026 | 01:16 PM
Parliament Square London protest Election Commission

Parliament Square London protest Election Commission

Follow Us
Follow Us:
  • लंडनच्या पार्लमेंट स्क्वेअरवर निदर्शने
  • ध्रुव राठीचे समर्थकांना आवाहन
  • दिल्लीतील अटकेनंतर आंतरराष्ट्रीय वळण

नवी दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू झालेल्या राजकीय आंदोलनाची ठिणगी आता थेट ब्रिटनची राजधानी लंडनपर्यंत (London Protests) पोहोचली आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) कामकाजावर आणि कथित ‘मतचोरी’च्या आरोपांवरून सुरू असलेला वाद आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचला असून, प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी याने लंडनमधील समर्थकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनाद्वारे ध्रुव राठी याने स्वतः लंडनमध्ये उपस्थित असल्याचे जाहीर केले आणि शनिवारी दुपारी १२ वाजता लंडनच्या प्रसिद्ध पार्लमेंट स्क्वेअरमधील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर जमण्याचे आवाहन केले.

ध्रुव राठीने आपल्या संदेशात म्हटले की, “आता या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवण्याची वेळ आली आहे. जर तुम्ही लंडन किंवा परिसरात असाल, तर लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी या शांततापूर्ण आंदोलनात सहभागी व्हा.” या आवाहनानंतर लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दिल्लीतील पोलीस कारवाई आणि ध्रुव राठीची सुटका

या आंतरराष्ट्रीय आंदोलनाची पार्श्वभूमी नवी दिल्लीत घडलेल्या घडामोडींशी जोडलेली आहे. गेल्या आठवड्यात, नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि विविध संघटनांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निदर्शनांची घोषणा केली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी सुरक्षेची आणि कायदा-सुव्यवस्थेची कारणे देत या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. आंदोलकांना जंतर मंतरवर पोहोचण्यापासून रोखण्यासाठी दिल्लीतील मोक्याच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

याच आंदोलनाच्या आधी, गुरुग्रामच्या सेक्टर ५६ मधील आपल्या निवासस्थानातून ध्रुव राठीला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तब्बल २४ तासांहून अधिक काळ चौकशी आणि अटकेच्या कारवाईनंतर शनिवारी रात्री उशिरा त्याची सुटका करण्यात आली होती. सुटका झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच ध्रुव राठी थेट लंडनमध्ये दाखल झाला आणि त्याने या संपूर्ण प्रकरणाला आंतरराष्ट्रीय वळण दिले.

I’ve just reached London It’s time the world sees the reality of vote chor and murderer of democracy. International danka bajane ka time aa gaya hai Join the protest tomorrow in front of Mahatma Gandhi’s statue in parliament square at 12pm if you’re here Jai Hind 🇮🇳 — Dhruv Rathee (@dhruv_rathee) October 16, 2026

credit – social media and Twitter

माध्यमांच्या वृत्तामुळे राजकीय वादळ अन् ‘फॉर्म ६’ मधील अनियमिततेचे आरोप

निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत आणि मतदार याद्यांच्या व्यवस्थापनाबाबत माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधपत्रकारिता वृत्तातून या राजकीय वादाची सुरुवात झाली. या अहवालात दावा करण्यात आला होता की, मतदार याद्यांच्या “विशेष सखोल पुनरावलोकन” (Special Summary Revision) प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली आहे. तसेच नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘फॉर्म ६’ मध्ये बनावट किंवा अयोग्य फेरफार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

या वृत्तानंतर विरोधी पक्षांच्या ‘अखिल भारतीय आघाडी’च्या (INDIA Alliance) नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार हल्ला चढवला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष नसल्याचा आरोप करत सीजेपी आणि इतर संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालावाबाहेर समोरासमोर निदर्शने

पार्लमेंट स्क्वेअरवरील आंदोलनाच्या हाकेपूर्वीच, शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी लंडनमध्ये राजकीय तणाव पाहायला मिळाला. ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यूके’ (SFI UK) द्वारे आयोजित करण्यात आलेल्या एसआयआर (SIR) मुद्द्याच्या निषेधार्थ लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालावाबाहेर (High Commission of India) शेकडो आंदोलक जमा झाले होते.

विशेष म्हणजे, या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकारच्या समर्थकांचा एक गटदेखील उच्चायुक्तालयाबाहेर गोळा झाला होता. दोन्ही बाजूंकडून लाऊडस्पीकरवर घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी ‘जय भीम’ आणि सरकारच्या धोरणांचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या, तर सरकार समर्थक गटाने देशाच्या बाजूने घोषणाबाजी करत आंदोलकांचा विरोध केला. या घडामोडींमुळे लंडनमधील भारतीय समुदायामध्ये या मुद्द्यावरून स्पष्ट पडसाद उमटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Web Title: Dhruv rathee london parliament protest election commission hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Dhruv Rathee
  • London

संबंधित बातम्या

Sangli News: दिल्लीतील तिरंगा रॅलीतील तरुणांच्या अटकेचा सांगलीत निषेध; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
1

Sangli News: दिल्लीतील तिरंगा रॅलीतील तरुणांच्या अटकेचा सांगलीत निषेध; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

Dharmendra Pradhan : ‘सत्तापालटासाठी आंदोलन?’ धर्मेंद्र प्रधानांचे गंभीर आरोप; राहुल गांधी, CJP वर साधला जोरदार निशाणा
3

Dharmendra Pradhan : ‘सत्तापालटासाठी आंदोलन?’ धर्मेंद्र प्रधानांचे गंभीर आरोप; राहुल गांधी, CJP वर साधला जोरदार निशाणा

Tiranga March : दिल्लीमध्ये तिरंगा आंदोलनाआधी मोठी घडामोड! अभिजीत दीपके यांच्या घरी पोलीस दाखल, कॅनॉट प्लेसमध्ये हाय अलर्ट
4

Tiranga March : दिल्लीमध्ये तिरंगा आंदोलनाआधी मोठी घडामोड! अभिजीत दीपके यांच्या घरी पोलीस दाखल, कॅनॉट प्लेसमध्ये हाय अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.