Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! NEET परीक्षेबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण घोषणा; आता NEET परीक्षा…

संगणकावर आधारित परीक्षा लागू झाल्याने परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होईल, असा सरकारचा विश्वास आहे. उल्लेखनीय आहे की, नीट-यूजी २०२६ ची परीक्षा ३ मे रोजी घेण्यात आली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 23, 2026 | 08:24 AM
मोठी बातमी ! NEET परीक्षेबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण घोषणा; आता NEET परीक्षा...

मोठी बातमी ! NEET परीक्षेबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण घोषणा; आता NEET परीक्षा...

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट-यूजी’ ही पुढील वर्षी म्हणजेच २०२७ पासून पूर्णपणे ऑनलाईन असेल. अर्थात जेईई मेनप्रमाणे ती देखील संगणकावर घेतली जाईल. ‘नीट‘मध्ये ‘ओएमआर’ शीट्सचा वापर पूर्णपणे बंद केला जाईल. पेपरफुटीच्या निषेधार्थ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही घोषणा केली. परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी सुरूच राहणार असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संगणकावर आधारित परीक्षा लागू झाल्याने परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होईल, असा सरकारचा विश्वास आहे. उल्लेखनीय आहे की, नीट-यूजी २०२६ ची परीक्षा ३ मे रोजी घेण्यात आली होती. मात्र, पेपरफुटीमुळे तो रद्द करण्यात आला. यानंतर २१ जून रोजी लष्कराच्या मदतीने हे आयोजन करण्यात आले होते. नीट पेपर लीक आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत दिल्लीच्या जंतरमंतरसह देशातील अनेक भागात निदर्शने होत आहेत.

दरम्यान, ‘नीट ‘मध्ये २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. फक्त ‘नीट’द्वारे, एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस यासह देशातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. अनेक राज्यांमध्ये बी. एससी नर्सिंगसाठी नीट-यूजी स्कोअर देखील घेतला जातो.

विद्यार्थ्यांना सीबीटीचा सराव करावा लागेल

सीबीटी (कॉम्प्युटर बेस्ट टेस्ट) मोड लागू केल्यानंतर, नीट-२०२७ उमेदवारांना कॉम्प्युटरवर परीक्षा देण्याची सवय लावावी लागेल. तज्ज्ञांच्या मते, विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन मॉक टेस्टद्वारे स्क्रीनवर प्रश्न सोडवण्याची गती, अचूकता आणि क्षमता विकसित करावी लागणार आहे. या बदलामुळे ओएमआर शीटवर सराव करण्याऐवजी डिजिटल चाचणी सराव अधिक महत्त्वाचा होणार आहे. परीक्षेतील गैरप्रकारांवर बोलताना शिक्षणमंत्री म्हणाले की, सरकार याप्रकरणी पूर्ण कडक भूमिका घेईल.

बारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत(नीट) बारामती येथील श्रावणी कृष्णकांत कुदळे हिने ७२० पैकी ७१० गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला असून संपूर्ण देशात पाचवा रँक तर मुलींमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ओबीसी प्रवर्गामध्ये संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

NEET 2026 Topper : रत्नागिरीच्या भावेशची मोठी झेप! NEET 2026 मध्ये राज्यात अव्वल, देशातही चमकदार कामगिरी

Web Title: Neet will go completely online starting from 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 08:24 AM

Topics:  

  • NEET Exam

संबंधित बातम्या

NEET 2026 Topper: रत्नागिरीच्या भावेशची मोठी झेप! NEET 2026 मध्ये राज्यात अव्वल, देशातही चमकदार कामगिरी
1

NEET 2026 Topper: रत्नागिरीच्या भावेशची मोठी झेप! NEET 2026 मध्ये राज्यात अव्वल, देशातही चमकदार कामगिरी

NEET Result: नीट परीक्षेचा घोळ संपेना! बीडमध्ये सोहम आणि ज्ञानेश्वरीच्या ‘आन्सर की’ आणि गुणपत्रिकेत मोठी तफावत
2

NEET Result: नीट परीक्षेचा घोळ संपेना! बीडमध्ये सोहम आणि ज्ञानेश्वरीच्या ‘आन्सर की’ आणि गुणपत्रिकेत मोठी तफावत

NEET UG 2026: नीट निकालानंतर कोणत्या रँकवर कोणता कोर्स मिळणार? MBBS, BDS आणि BAMS मधील प्रवेशाची जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया..
3

NEET UG 2026: नीट निकालानंतर कोणत्या रँकवर कोणता कोर्स मिळणार? MBBS, BDS आणि BAMS मधील प्रवेशाची जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया..

बारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम, देशात मुलींमध्ये देखील अव्वल
4

बारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम, देशात मुलींमध्ये देखील अव्वल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.