Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा! खेळण्यातील बंदुकीच्या बटाने डोक्यावर वार; अन् विद्यार्थी…

NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अचानक वाद पेटला अन् प्रकरण थेट हाणामारीपर्यंत पोहोचले! कोट्यातील खासगी कोचिंग परिसरात उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्याने बिहारच्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर खेळण्यातील बंदुकीच्या बटाने वार केला. जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, वादाचे नेमके कारण काय, याचा पोलीस त

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 19, 2026 | 02:58 PM
कोटामध्ये NEET विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा! खेळण्यातील बंदुकीच्या बटाने डोक्यावर वार; अन् विद्यार्थी...

कोटामध्ये NEET विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा! खेळण्यातील बंदुकीच्या बटाने डोक्यावर वार; अन् विद्यार्थी...

Follow Us
Follow Us:
  • कोट्यात NEET विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी
  • खेळण्यातील बंदुकीच्या बटाने डोक्यावर वार
  • आईच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून तपास सुरू
कोटा, राजस्थान : देशातील प्रसिद्ध शैक्षणिक केंद्र असलेल्या कोटा येथे NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी कोचिंग परिसरात झालेल्या वादादरम्यान उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्याने बिहारच्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर खेळण्यातील बंदुकीच्या बटाने वार केला. या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा:लोणावळ्यात थरार! आईने चिमुकल्या लेकीसह दरीत घेतली उडी; झाडाच्या फांद्यांत अडकले अन्…

किरकोळ वादाचे हाणामारीत रूपांतर

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद सुरू झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. यावेळी उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्याने बिहारच्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर खेळण्यातील बंदुकीच्या बटाने वार केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे कोचिंग परिसरात एकच खळबळ उडाली.

हाणामारीचा व्हिडिओ समोर

या घटनेचा व्हिडिओही समोर आल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांमधील हाणामारीमुळे परिसरातील इतर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा: जळगावच्या बांभोरी पुलावर भीषण अपघात; कार-कंटेनरच्या धडकेत तीन चुलतभावांचा मृत्यू

आईच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद

जखमी विद्यार्थ्याच्या आईने जवाहर नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे कोट्यातील कोचिंग परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी कुठे झाली?

    Ans: राजस्थानमधील कोटा शहरातील जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी कोचिंग परिसरात ही घटना घडली.

  • Que: . हाणामारीत काय वापरण्यात आले?

    Ans: एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर खेळण्यातील बंदुकीच्या बटाने वार केल्याची माहिती आहे.

  • Que: विद्यार्थ्यांमध्ये वाद कशामुळे झाला?

    Ans: वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Kota neet students fight toy gun attack injured student sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Attack
  • Marathi News
  • NEET Exam

संबंधित बातम्या

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये चारा टंचाईचे संकट? पशुपालकांनी आतापासूनच करा हे नियोजन, कृषी तज्ज्ञांनी दिला सल्ला
1

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये चारा टंचाईचे संकट? पशुपालकांनी आतापासूनच करा हे नियोजन, कृषी तज्ज्ञांनी दिला सल्ला

Jalgaon News: महिलांच्या हाताला बळ, स्वप्नांना नवी भरारी; ‘उमेद’कडून १.८ कोटींचे कर्ज
2

Jalgaon News: महिलांच्या हाताला बळ, स्वप्नांना नवी भरारी; ‘उमेद’कडून १.८ कोटींचे कर्ज

Raigad News: आधी अतिवृष्टी, नंतर पावसाची दडी! माणगावमध्ये भातशेतीला दुहेरी फटका, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
3

Raigad News: आधी अतिवृष्टी, नंतर पावसाची दडी! माणगावमध्ये भातशेतीला दुहेरी फटका, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Gopichand Padalkar: धनगर आरक्षणाच्या पुढील भूमिकेसाठी १५ नोव्हेंबरला पुण्यात महत्त्वाची बैठक
4

Gopichand Padalkar: धनगर आरक्षणाच्या पुढील भूमिकेसाठी १५ नोव्हेंबरला पुण्यात महत्त्वाची बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.