Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Neha Bora Delhi HC : नेहा बोरा यांना दिल्ली हायकोर्टाचा दणका! ‘त्या’ नोटीसविरोधातील याचिका फेटाळली, नेमकं प्रकरण काय?

Neha Bora Delhi HC : दिल्ली उच्च न्यायालयाने आयसा अध्यक्षा नेहा बोरा यांना दिलासा देण्यास नकार देत १० हजार रुपयांच्या वैयक्तिक जामीन नोटीसला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 23, 2026 | 10:25 PM
Neha Bora delhi HC

Neha Bora delhi HC

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली उच्च न्यायालयाचा नेहा बोरा यांना झटका
  • शांतता राखण्याच्या निर्देशांवरून न्यायालयात सुनावणी
  • BNSS कलम १२६ आणि १३० वरून युक्तिवाद
 

दिल्ली उच्च न्यायालयाने आयसा (AISA) अध्यक्षा नेहा बोरा यांची याचिका फेटाळल्याने त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी १० हजार रुपयांचा वैयक्तिक जामीन आणि एक हमीदार सादर करण्यासंदर्भात दिलेल्या नोटीसला बोरा यांनी आव्हान दिलं होतं. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी त्यांच्या याचिकेला विरोध केला होता. (Neha Bora Delhi HC)

नेहा बोरा यांना १७ ऑक्टोबर रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १२६ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार, त्यांना १९ ऑक्टोबर रोजी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. तपास सुरू असताना शांतता राखण्यासाठी १० हजार रुपयांचा वैयक्तिक जामीन आणि एक हमीदार का सादर करू नये, याचं कारण स्पष्ट करण्याचे निर्देश या नोटिशीत होते.

या नोटिशीला आव्हान देताना बोरा यांनी ती रद्द करण्याची आणि आपल्याविरुद्ध कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, असे निर्देश पोलिसांना देण्याची मागणी केली होती.

India China Tension: अरुणाचल प्रदेश सीमेवर भारत-चीन सैन्यात संघर्ष; ITBP प्रमुखांचा मोठा खुलासा, काँग्रेस आक्रमक

दिल्ली पोलिसांनी काय भूमिका मांडली?

सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी याचिकेला विरोध केला. बोरा यांचे युक्तिवाद वस्तुस्थितीशी जुळत नसल्याचं पोलिसांच्या बाजूने सांगण्यात आलं.

बोरा यांनी BNSS कलम १६३ च्या लागू क्षेत्राबाबत आणि घटनेच्या वेळी त्याच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, हे कलम लागू होतं आणि पोलिसांची संख्या मर्यादित होती, असा युक्तिवाद पोलिसांनी केला.

न्यायालयात जामीन प्रक्रियेवर चर्चा

सुनावणीदरम्यान न्यायालयाने चांगल्या वर्तणुकीची हमी मागण्याच्या प्रक्रियेबाबत निरीक्षण नोंदवलं. तपास पूर्ण होईपर्यंत एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारची हमी देण्यास सांगणं म्हणजे तिच्यावर निर्बंध आणण्यासारखं ठरू शकतं, अशी टिप्पणी करण्यात आली.

तसेच, BNSS कलम १२६ आणि १३० यांच्या संदर्भात नोटीस किंवा आदेश जारी करण्याच्या प्रक्रियेवरही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले.

याचिकेवर न्यायालयाचा निर्णय

२२ ऑक्टोबर रोजी सुनावणीनंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. सर्व पक्षांचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याची मिळत आहे. या निर्णयामुळे नेहा बोरा यांना नोटीसविरोधात मागितलेला दिलासा मिळालेला नाही. मात्र, नोटिशीच्या पुढील अंमलबजावणीबाबत आणि संबंधित कायदेशीर प्रक्रियेबाबत अधिकृत आदेशातील तपशील महत्त्वाचे ठरतील.

Most Wanted Maoist Surrender : मोस्ट वाँटेड माओवादी दाम्पत्याचे आत्मसमर्पण, कोलकाता पोलिसांना मोठे यश

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिल्ली उच्च न्यायालयाने नेहा बोरा यांच्या याचिकेबाबत काय निर्णय दिला?

    Ans: दिल्ली उच्च न्यायालयाने नेहा बोरा यांची १० हजार रुपयांच्या वैयक्तिक जामीन नोटीसविरोधातील याचिका फेटाळली.

  • Que: नेहा बोरा यांना कोणत्या कारणासाठी नोटीस बजावण्यात आली होती?

    Ans: BNSS कलम १२६ अंतर्गत त्यांना तपास सुरू असताना शांतता राखण्याच्या संदर्भात १० हजार रुपयांचा वैयक्तिक जामीन आणि एक हमीदार सादर करण्याबाबत कारण स्पष्ट करण्यास सांगण्यात आलं होतं.

  • Que: या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी काय भूमिका घेतली?

    Ans: दिल्ली पोलिसांनी नेहा बोरा यांची याचिका टिकण्याजोगी नसल्याचा युक्तिवाद करत तिच्या विरोधात भूमिका मांडली. BNSS कलम १६३ लागू होतं आणि पोलिसांची संख्या मर्यादित होती, असंही पोलिसांच्या बाजूने सांगण्यात आलं.

Web Title: Neha bora delhi hc delhi high court neha bora aisa plea dismissed vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 10:22 PM

Topics:  

  • delhi high court
  • Delhi Police

संबंधित बातम्या

Neha Bora Delhi High Court: कॅनॉट प्लेसचे आंदोलन नेहा बोराने बोलवले नाही..; दिल्ली उच्च न्यायालायत सुनावणी
1

Neha Bora Delhi High Court: कॅनॉट प्लेसचे आंदोलन नेहा बोराने बोलवले नाही..; दिल्ली उच्च न्यायालायत सुनावणी

CJP Delhi High Court: त्यांनी एक मिनिटही तुरुंगात राहू नये; CJPकडून सौरव आणि आशुतोष यांच्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल
2

CJP Delhi High Court: त्यांनी एक मिनिटही तुरुंगात राहू नये; CJPकडून सौरव आणि आशुतोष यांच्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल

Abhijeet Dipke : शाहरुख खानचा फोटो, दोन सहकाऱ्यांची आठवण; अभिजीत दिपके तुरुंगातून बाहेर येताच अ‍ॅक्शन मोडमध्ये?
3

Abhijeet Dipke : शाहरुख खानचा फोटो, दोन सहकाऱ्यांची आठवण; अभिजीत दिपके तुरुंगातून बाहेर येताच अ‍ॅक्शन मोडमध्ये?

Ahijeet Dipke granted Bail : अभिजित दिपके यांना जामीन मंजूर, ‘या’ मोठ्या अटीवर सही केल्यावरच सुटका? दिल्ली पोलिसांनी दिली माहिती
4

Ahijeet Dipke granted Bail : अभिजित दिपके यांना जामीन मंजूर, ‘या’ मोठ्या अटीवर सही केल्यावरच सुटका? दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.