राहुल गांधींना काळे फासण्याची ठाकरे गटाच्या नेत्याची थेट धमकीच
नवी दिल्ली : लोकसभेच्या सभागृहामध्ये आपल्याला भाषण करू दिले जात नाही किंवा कोणत्याही विषयावर मत व्यक्त करू दिले जात नाही’, अशा प्रकारचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्यामुळे एका नव्या चर्चेला विषय मिळाला आहे. अर्थात, राहुल गांधी यांनी केलेल्या या आरोपानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहातील सर्व सदस्यांनी नियमांचे पालन करून सभागृहाचे पावित्र्य जपायला हवे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली आहे. एक प्रकारे राहुल गांधी यांच्याकडून काही नियमांचा भंग झाल्यामुळे त्यांना अशा प्रकारे बोलू दिले जात नाही असा युक्तिवाद अप्रत्यक्षपणे ओम बिर्ला यांनी केला आहे. अर्थात, कोणत्या नियमांचा भंग केला आणि त्यामुळे लोकसभागृहाच्या पावित्र्याला धक्का पोहोचला याची माहितीच नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
हे देखील वाचा : भारताच्या सुरक्षेसाठी कठोर इमिग्रेशन कायदा; ममता सरकारवर घुसखोरीला प्रोत्साहन दिल्याचा ठपका
लोकसभेचे कामकाज कशाप्रकारे चालावे याबाबत जो ३४९ क्रमांकाचा नियम आहे त्यामध्ये लोकसभेतील सदस्यांनी सभागृहात कशाप्रकारे वर्तन ठेवावे याची मोठी यादी सांगण्यात आली आहे. त्या यादीतील कोणत्या नियमाचे पालन करण्यात राहुल गांधी अपयशी ठरले याचा कोणताही खुलासा ओम बिर्ला यांनी केला नाही. पण राहुल गांधी यांनी जेव्हा लोकसभेच्या सभागृहामध्ये आपल्याला बोलायला मिळावे अशी मागणी केली तेव्हा त्यांनी लोकसभेचे कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला. विरोधी पक्षनेते असो किंवा इतर सदस्य असो त्यांनी काही किमान नियमांचे पालन करावे अशा प्रकारची अपेक्षा ओम बिर्ला यांनी व्यक्त केली असली तरी त्यामुळे कोणताही स्पष्ट खुलासा झालेला नाही, उलट संभ्रम वाढला आहे. सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये राहुल गांधी यांना महाकुंभमेळावर बोलायचे होते, तसेच देशातील बेरोजगारीच्या विषयावर त्यांना भाषण करायचे होते. पण या दोन्ही विषयांवर आपल्याला बोलण्याची परवानगी मिळाली नाही असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
सभागृह लोकशाही मार्गाने चालवले जात नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांवर केला आहे. गृहात एखाद्या विषयावर जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्यांच्या सदस्य संख्येच्या प्रमाणात काही मिनिटे चर्चेमध्ये बोलण्यासाठी दिली जातात. राहुल गांधी यांच्या पक्षाची सदस्य संख्या किंवा त्यांना मिळालेले विरोधी पक्ष नेतेपद पाहता नेहमीच त्यांना भाषणासाठी जास्त कालावधी दिला जातो किंवा विरोधी पक्ष नेत्याला जास्त कालावधी देण्याची प्रथाही आहे.
हे देखील वाचा : West Bengal Violence: पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात हिंसाचार; ३४ जणांना अटक, इंटरनेटही बंद
पण गेल्या काही कालावधीपासून राहुल गांधी यांनी सभागृहात कोणते मुद्दे मांडू नयेत याच दिशेने कामकाज सुरू असल्याचे दिसते. किमान तसा आरोप तरी काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे. विरोधी पक्षाचा सभागृहामध्ये योग्य सन्मान राखला जात नाही अशी तक्रारही काँग्रेसच्या सत्तर खासदारांनी लोकसभेच्या अध्यक्षांकडे केली आहे. काही वर्षांच्या कालावधीपासून लोकसभेचे व्यासपीठ असो किंवा इतर प्रतिनिधीगृहांची व्यासपीठ असोत तेथे गोंधळ करणे हाच एक कलमी कार्यक्रम राबवला जातो आणि सर्वसाधारणपणे हा गोंधळ विरोधी पक्षांकडून अपेक्षित असला तरी अनेक वेळा सत्ताधारी पक्षांच्या सदस्याकडूनही गोंधळाचे नियोजन केले जाते.