Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन संसद भवनात कर्मचाऱ्यांसाठी नवा ‘ड्रेस कोड’; खाकी पँट, कमळाचे फूल, मणिपुरी टोपी

राजधानी दिल्लीत 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन (Parliament Special Session) बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात नेमके कोणते विधेयक आणले जाणार यावर अनेक राजकीय अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहात नवा ड्रेस कोड (Dress Code) लागू केला जाऊ शकतो, अशीदेखील माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 13, 2023 | 02:26 PM
नवीन संसद भवनात कर्मचाऱ्यांसाठी नवा ‘ड्रेस कोड’; खाकी पँट, कमळाचे फूल, मणिपुरी टोपी
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन (Parliament Special Session) बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात नेमके कोणते विधेयक आणले जाणार यावर अनेक राजकीय अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहात नवा ड्रेस कोड (Dress Code) लागू केला जाऊ शकतो, अशीदेखील माहिती सूत्रांनी दिली आहे.

नव्या ड्रेस कोडशी संबंधित अधिकाऱ्यांनी नाव न देण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या आत आणि बाहेरील कर्मचारी पुढील आठवड्यात संसदेच्या नवीन इमारतीत जाताना नवा गणवेश परिधान करणार आहेत. या नव्या गणवेशाला ‘भारतीयत्व’ची जोड राहणार आहे. नव्या वेषभूषेमध्ये दोन्ही सभागृहात मार्शलच्या डोक्यावर मणिपुरी टोपी दिसणार आहे. तर टेबल ऑफिस, नोटीस कार्यालय आणि संसदीय रिपोर्टिंग विभागातील अधिकाऱ्यांना कुर्ता असणार आहे. या विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी कमळासारखा दिसणारा टी शर्ट तयार करण्यात आला आहे.

एनआयएफटीचे डिझाईन

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसद भवनातील कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेला हा ड्रेस ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’ म्हणजेच एनआयएफटीने डिझाईन केला आहे. महिलांसाठी डिझायनर साड्या सर्व महिला अधिकाऱ्यांना आणि महिला कर्मचाऱ्यांदेखील नवीन डिझाईन केलेल्या साड्या देण्यात येणार आहेत. नवीन संसद भवनातील राज्यसभेचे गालिचेही कमळाच्या आकृतिबंधाने सजवण्यात आले आहेत. कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. यासोबतच भाजपाचे पक्षचिन्हदेखील आहे.

सचिवालयातही बदल

संसद सचिवालयाच्या पाचही प्रमुख शाखांचे अधिकारी- रिपोर्टिंग, टेवल ऑफिस, नोटीस ऑफिस, लेजिस्लेटिव्ह शाखा आणि मार्शलसह सुरक्षा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी संसदेच्या अधिवेशनात नवीन गणवेश परिधान करतील. याशिवाय पाच विभागामधील अधिकारी सफारी सूटऐवजी स्पोर्ट बटन डाऊन शर्ट घालतील. तसेच क्रीम रंगाचे जॅकेट आणि पांढऱ्या रंगाची पँट परिधान करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: New dress code for parliament staff marshals to get kurtas and security officials new uniforms nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2023 | 02:26 PM

Topics:  

  • Indian Parliament
  • Parliament News
  • Parliament session

संबंधित बातम्या

PM Narendra Modi Live: “मी सभागृहात भारताच्या…”; ‘ऑपरेशन सिंदूर’वरून मोदींचा विरोधकांना सणसणीत टोला
1

PM Narendra Modi Live: “मी सभागृहात भारताच्या…”; ‘ऑपरेशन सिंदूर’वरून मोदींचा विरोधकांना सणसणीत टोला

सत्ताधारी अन् विरोधकांनी अधिवेशनाला द्यावे महत्त्व; सदस्यांवर आहे संपूर्ण देशाच्या भविष्याचे दायित्व
2

सत्ताधारी अन् विरोधकांनी अधिवेशनाला द्यावे महत्त्व; सदस्यांवर आहे संपूर्ण देशाच्या भविष्याचे दायित्व

संसदेत आरोग्यावरही दिले जाणार लक्ष! खासदार आणि पाहुण्यांना मिळणार सकस जेवण, Sugar Free खीर, ग्रील्ड चिकन आणि बरंच काही…
3

संसदेत आरोग्यावरही दिले जाणार लक्ष! खासदार आणि पाहुण्यांना मिळणार सकस जेवण, Sugar Free खीर, ग्रील्ड चिकन आणि बरंच काही…

संसदेत राष्ट्रीय क्रीडा विधेयक येणार.., केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती; काय असणार तरतुदी?
4

संसदेत राष्ट्रीय क्रीडा विधेयक येणार.., केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती; काय असणार तरतुदी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.