Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matthew Van Dyke: रक्तरंजित मोहिमांचा सूत्रधार भारताच्या ईशान्येला बनवणार होता ‘युक्रेन’; NIA च्या एका धाडीत चिरडला गेला डाव

NIA Arrest Matthew VanDykk: राष्ट्रीय तपास संस्थेने अमेरिकन नागरिक मॅथ्यू व्हॅनडाइकसह सहा युक्रेनियन नागरिकांना अटक केली आहे. व्हॅनडाइकने यापूर्वी लिबिया, सीरिया, इराक आणि व्हेनेझुएलामध्ये गुन्हे केले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 19, 2026 | 12:07 PM
nia arrests american matthew vandyke ukrainians drone warfare plot northeast india

nia arrests american matthew vandyke ukrainians drone warfare plot northeast india

Follow Us
Follow Us:
  • NIA ची मोठी कारवाई
  • ईशान्य भारतात दहशत माजवण्याचा कट
  • धोकादायक पार्श्वभूमी

NIA Arrests Matthew VanDyke India : भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) एका अत्यंत गोपनीय आणि धाडसी मोहिमेअंतर्गत सात परदेशी नागरिकांना अटक करून देशावरील मोठे संकट टळले आहे. १३ मार्च रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत एका कुख्यात अमेरिकन नागरिकासह सहा युक्रेनियन नागरिकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या अटकेमुळे भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा एक आंतरराष्ट्रीय कट उघड झाला असून, तपास यंत्रणा आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

तीन विमानतळांवर एकाच वेळी छापे आणि अटक

एनआयएने ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केली. मुख्य आरोपी मॅथ्यू एरॉन व्हॅनडाइक याला कोलकाता विमानतळावर पकडण्यात आले, तर त्याच्या इतर युक्रेनियन साथीदारांना दिल्ली आणि लखनौ विमानतळांवरून ताब्यात घेण्यात आले. हे सर्व आरोपी पर्यटक व्हिसावर भारतात आले होते, मात्र त्यांचा खरा उद्देश पर्यटनाऐवजी भारताच्या संवेदनशील सीमावर्ती भागांमध्ये दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणे हा होता. अटक केलेल्या सर्व आरोपींना दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने ११ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : North Korea: हुकूमशहाच्या देशात लोकशाहीची हत्या! 99.93% मतं मिळवून किम जोंग उन पुन्हा विजयी; मात्र 18 हजार मते विरोधात कशी?

कोण आहे हा मॅथ्यू व्हॅनडाइक?

४६ वर्षीय मॅथ्यू व्हॅनडाइक हा केवळ चित्रपट निर्माता किंवा संरक्षण तज्ञ नाही, तर तो एक व्यावसायिक भाडोत्री सैनिक (Mercenary) म्हणून ओळखला जातो. २०११ मध्ये लिबियाचा हुकूमशहा गद्दाफी याच्या विरोधात त्याने शस्त्र उचलले होते, जिथे त्याला ५ महिने तुरुंगवासही झाला होता. त्यानंतर त्याने सीरिया, इराक आणि रशिया-युक्रेन युद्धातही सक्रिय भूमिका बजावली. स्वतःची ‘सन्स ऑफ लिबर्टी इंटरनॅशनल’ नावाची संस्था चालवणारा मॅथ्यू जगभरातील बंडखोर गटांना लष्करी प्रशिक्षण देण्याचे काम करतो.

American mercenary Matthew VanDyke, 6 Ukrainians arrested in India by NIA Six Ukrainians and a US citizen have been arrested by the NIA for entering restricted areas in Mizoram, crossing into Myanmar, and engaging with insurgent-linked groups. The anti-terror agency has alleged… — IndiaToday (@IndiaToday) March 17, 2026

credit – social media and Twitter

मिझोराममार्गे म्यानमार आणि ड्रोन युद्धाचे प्रशिक्षण

तपासात असे उघड झाले आहे की, हे आरोपी मिझोराममध्ये कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय (RAP/ILP) दाखल झाले होते. तिथून त्यांनी म्यानमारमधील वांशिक सशस्त्र गटांशी संपर्क साधला. या गटांचे संबंध भारतातील ईशान्येकडील अतिरेकी संघटनांशी आहेत. मॅथ्यू आणि त्याचे साथीदार या बंडखोरांना ‘ड्रोन वॉरफेअर’ म्हणजेच ड्रोनच्या साहाय्याने हल्ले करणे, जॅमिंग तंत्र आणि आधुनिक शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देत होते. युरोपमधून मोठ्या प्रमाणात ड्रोन भारतात आणून ते बेकायदेशीर मार्गाने म्यानमारला पोहोचवण्याचे कामही हे नेटवर्क करत होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russian Oil: चीनकडे जाणारे रशियन महाकाय तेल टँकर्स अचानक भारताकडे वळले; इराण युद्धाच्या भडक्यात भारतासाठी ‘जॅकपॉट’

भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका

मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी आणि शेजारील बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनीही यापूर्वी अशा परदेशी शक्तींच्या हस्तक्षेपाबाबत इशारा दिला होता. ईशान्य भारतात एक स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा किंवा या भागाला अस्थिर करण्याचा हा एक मोठा भू-राजकीय डाव असल्याचे बोलले जात आहे. एनआयए आता या सात परदेशी नागरिकांच्या स्थानिक मदतनीसांचा शोध घेत असून, त्यांच्या मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची कसून तपासणी केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मॅथ्यू व्हॅनडाइक आणि त्याच्या साथीदारांना एनआयएने का अटक केली?

    Ans: हे आरोपी पर्यटक व्हिसाचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे मिझोराममध्ये शिरले आणि म्यानमारमधील बंडखोरांना तसेच भारतीय अतिरेक्यांना ड्रोन युद्धाचे प्रशिक्षण देत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

  • Que: मॅथ्यू व्हॅनडाइकची पार्श्वभूमी काय आहे?

    Ans: तो एक अमेरिकन भाडोत्री सैनिक असून त्याने लिबिया, सीरिया, इराक आणि युक्रेनमधील भीषण युद्धांमध्ये लढाऊ म्हणून काम केले आहे.

  • Que: या प्रकरणाचा म्यानमारशी काय संबंध आहे?

    Ans: आरोपी म्यानमारमधील बंडखोर गटांना आधुनिक लष्करी तंत्रज्ञान पुरवत होते, ज्यांचा थेट संबंध भारताच्या ईशान्येकडील दहशतवादी संघटनांशी आहे.

Web Title: Nia arrests american matthew vandyke ukrainians drone warfare plot northeast india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • America
  • India news
  • Terrorist Activities

संबंधित बातम्या

आता भारत थांबणार नाही! Asian Games मध्ये खेळाडूंचा जलवा; 3 ‘सुवर्ण’ अन्…, 27 पदकांची कमाई
1

आता भारत थांबणार नाही! Asian Games मध्ये खेळाडूंचा जलवा; 3 ‘सुवर्ण’ अन्…, 27 पदकांची कमाई

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
2

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

अंगणात सहज दिसणारे पक्षी आता नव्या पिढीला दिसेनासे झालेत! भारतातील ६०% पक्ष्यांची घट
3

अंगणात सहज दिसणारे पक्षी आता नव्या पिढीला दिसेनासे झालेत! भारतातील ६०% पक्ष्यांची घट

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?
4

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.