
राजधानी दिल्लीत दहशतवाद्यांनी केला भीषण स्फोट
या घटनेचा एनआयकडून तपास सुरू
धावत्या वाहनातून करण्यात आला होता स्फोट
राजधानी दिल्लीत सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ एक भीषण स्फोटझाला. त्यात १० जणांचा मृत्यू झाला तर ३० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेचा तपास एनआयएकडे देण्यात आला आहे. या घटनेचा तपास जस जसा पुढे जात आहे, यामध्ये नवनवीन खुलासे समोर येत आहेत. तपास यंत्रणांना एक डिजिटल चॅटबॉक्स मिळाला आहे. यातून अनेक खुलासे समोर आले आहेत.
चॅटबॉक्समध्ये आरोपींचे महत्वाचे चॅट समोर आले आहेत. यामध्ये अनेक कोडवर्डसचा वापर करण्यात आला आहे. याचा वापर करून हा स्फोट घडवण्यात आल्याचे समोर आले आहे. स्फोटाच्या घटनेत ‘दावत’ (मेजवानी) या शब्दाचा वापर करण्यात आला. स्फोटक पदार्थांचे वर्णन बिर्याणी म्हणून करण्यात आले.
सुरक्षा यंत्रणांना सापडलेल्या डिजिटल चॅटबॉक्समध्ये मेजवानीसाठी बिर्यानी तयार आहे असा शेवटचा मेसेज होता. डॉ. शाहीन यांनी हा संदेश पाठवला होता. त्यानंतर हा चॅटबॉक्स वापरण्यात आला नाही. जैश-ए-मोहम्मदचा धोकादायक प्लॅन, शोबा-ए-दावतचा उलगडा झाला आहे. शाहीन हा भारतातील जमात-उल-मोमिनतचा कमांडर इन चीफ होता. ही संघटना मसुद अजहरची बहीण चालवते.
शोबा ए दावत हा ब्रेनवॉशिंगचा एक धोकादायक प्रकार आहे. हा विभाग नवीन मुलांचे ब्रेनवॉशिंग करण्याचे काम करते. स्वर्गात जाण्यासाठी भारतात जिहाद करणे महत्वाचे असल्याचे या ठिकाणी शिकवले जाते. बॅग, स्फोटके, हल्ला असे शब्द वापरण्याऐवजी दैनंदिन वापरातील शब्द वापरले जात आहे. या आधीच्या घटनांमध्ये देखील दहशतवाद्यांनी हे शब्द वापरले आहेत. त्यामुळे राजधानी दिल्लीत झालेला स्फोट दहशतवादी हल्ला असल्याची शंका बळावली आहे.
Delhi Blast मध्ये वापरण्यात आलेली कार कोणाची? काही वेळातच सापडला ‘तो’ व्यक्ती; वाचा धक्कादायक माहिती
Delhi Blast नंतर पंतप्रधान मोदी अॅक्शन मोडमध्ये
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट झाला होता. तिथे आढळून आलेले पुरावे किंवा आतापर्यंत अटक करण्यात आलेली आरोपींचे कनेक्शन पाहता हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेतील दोषी लोकांना सोडले जाणार नसल्याचे मोदी यांनी सांगितले आहे.
या घटनेचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. या घटनेचे महाराष्ट्र कनेक्शन देखील समोर आले आहे. या स्फोटानंतर संपूर्ण देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच आरोपीना सोडले जाणार नाही याबाबत विश्वास देखील दिला.