Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terrorist Attack : पहलगाम हल्ल्याचा तपास करणार एनआयए; केंद्रीय गृहमंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा एनएआयकडून केला जाणार आहे. याबाबत गृह विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 27, 2025 | 01:22 PM
NIA to investigate Pahalgam terror attack in Jammu and Kashmir

NIA to investigate Pahalgam terror attack in Jammu and Kashmir

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली :  जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करुन अशांतता निर्माण करण्यात आली. पहलगाम येथे पर्यटकांना लक्ष्य करुन त्यांच्यावर बेछुट गोळीबार करण्यात आला. यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या हल्ल्यासाठी पाकिस्तानप्रेरित दहशतवादी गटांना जबाबदार धरले जात आहे, जरी पाकिस्तानने नेहमीप्रमाणे कोणताही सहभाग नाकारला असून स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने पहलगाम हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपावला आहे.

पहलगाम हल्ल्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेल्यामुळे देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. भारताने कठोर भूमिका घ्यावी अशी देखील मागणी केली जात आहे. पहलगाम हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनएआय करणार आहे. हल्लाचा औपराचिक तपास करण्यासाठी एनआयएकडे तपास वर्ग करण्यात आला आहे. याबाबत गृह विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हल्ला झाल्यापासून राष्ट्रीय तपास यंत्रणा पहलगाम येथे तपास करत आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

राष्ट्रीय तपास यंत्रणा स्थानिक पोलिसांकडून या हल्ल्याशी संबंधित आतापर्यंत मिळालेली माहिती, केस डायरी, एफआयआर आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेईल आणि पुढील तपास सुरू करेल. पहलगमामधील हल्ल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील नागरिकांच्या, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. परिणामी येथील सुरक्षेची जबाबदारी प्रमुख दहशतवादविरोधी संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. एनआयए लवकरच या हल्ल्याच्या सर्व संबंधांचा सखोल तपास करेल. हल्ल्याचा कट कोणी व कुठे रचला? यामध्ये सहभागी दहशतवादी संघटना, त्यांची भूमिका, स्लीपर सेलचा संभाव्य धोका याविषयीचा तपास करून लवकरच गृह मंत्रालयाला अहवाल सादर करेल.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराची आक्रमक कारवाई

पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली आहे. काश्मीरमध्ये अतिरेकी आणि त्यांच्या समर्थकांवर विशेष मोहिम राबवली जात आहे. अतिरेक्यांना आश्रय देणाऱ्यांवर कठोर कारवाई करत त्यांच्या घरे जमीनदोस्त करण्यात येत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचे किंवा त्यांच्या समर्थकांचे घर उद्ध्वस्त करण्यात आले आहे. तसेच, लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर सतत छापे टाकले जात आहेत आणि शेकडो संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणा खोऱ्यातील प्रत्येक अतिरेक्याचा शोध घेत असून, अशा प्रकारचा आणखी एक हल्ला घडू नये यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

पहलगाम हल्ल्याबाबत बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भारताचा निर्धार भक्कम

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेचा स्तर अधिक मजबूत करण्यात आला आहे आणि दहशतवाद्यांविरुद्ध निर्णायक मोहिम राबवली जात आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनांना भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देत आहे आणि कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही, याचे ठोस संकेत दिले आहेत. काश्मीर खोऱ्यातील शांती व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज आहेत. पाकिस्तानकडून होणाऱ्या अशा कुरापतींना आता कडवे उत्तर देण्याचा भारताचा निर्धार स्पष्टपणे दिसून येतो आहे.

Web Title: Nia to investigate pahalgam terror attack in jammu and kashmir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 01:21 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Jammu Kashmir News
  • Pahalgam Terrorist Attack

संबंधित बातम्या

Vice President Election: देशाचे पुढचे उपराष्ट्रपती राज्यपालांपैकी कोण? अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांनी घेतली मोदी-शाह यांची भेट
1

Vice President Election: देशाचे पुढचे उपराष्ट्रपती राज्यपालांपैकी कोण? अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांनी घेतली मोदी-शाह यांची भेट

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात  गुडघे टेकायला लावल्याचा दावा
2

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात गुडघे टेकायला लावल्याचा दावा

कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! ४८ तासांत पाकिस्तानी नेत्यांची तिसऱ्यांदा भारताला पोकळ धमकी
3

कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! ४८ तासांत पाकिस्तानी नेत्यांची तिसऱ्यांदा भारताला पोकळ धमकी

एकीकडे अणुहल्ल्याची धमकी तर दुसरीकडे पाण्याची भीक; पाकिस्तानने पसरले भारतापुढे हात
4

एकीकडे अणुहल्ल्याची धमकी तर दुसरीकडे पाण्याची भीक; पाकिस्तानने पसरले भारतापुढे हात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.