Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Milk Selling Rule: दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले! आता विनापरवाना दूध विक्रीवर बंदी; FSSAI चा मोठा निर्णय

FSSAI ने दूध विक्रीसाठी नवीन नियमावली जाहीर केली असून आता विनापरवाना दूध विकणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. शेतकरी आणि सहकारी संस्थांना यातून दिलासा मिळाला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 13, 2026 | 06:22 PM
दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले! आता विनापरवाना दूध विक्रीवर बंदी (photo Credit- AI)

दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले! आता विनापरवाना दूध विक्रीवर बंदी (photo Credit- AI)

Follow Us
Close
Follow Us:
  • दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले!
  • आता विनापरवाना दूध विक्रीवर बंदी
  • FSSAI चा मोठा निर्णय
Milk Selling New Rule: तुमच्या घरात येणारं दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त? हा प्रश्न आता लवकरच सुटणार आहे. देशभरातून दुधात होणाऱ्या भेसळीच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) कडक पावले उचलली आहेत. आता देशात दूध विक्री करणे सोपे राहिलेले नाही; त्यासाठी अधिकृत परवाना (License) किंवा नोंदणी असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

FSSAI चा नवा नियम काय आहे?

FSSAI ने स्पष्ट केले आहे की, आता कोणतीही व्यक्ती किंवा संस्था वैध परवान्याशिवाय दुधाचा व्यवसाय करू शकणार नाही. भेसळखोरांचे कंबरडे मोडण्यासाठी आणि सामान्य ग्राहकांना शुद्ध दूध मिळावे, या उद्देशाने सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. दुधाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर सरकारी ‘शिक्का’ अनिवार्य असेल.

FSSAI has issued an advisory directing all milk producers (other than members of dairy cooperative societies) and milk vendors to obtain mandatory FSSAI registration or license before commencing or continuing their food business operations.#FSSAIAdvisory @MoHFW_INDIA @PIB_India pic.twitter.com/RjZvLwvHTB — FSSAI (@fssaiindia) March 12, 2026

पशुपालक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा

या नवीन नियमामुळे सामान्य शेतकरी किंवा पशुपालकांना घाबरण्याचे कारण नाही. ‘डेअरी को-ऑपरेटिव्ह’ म्हणजेच दुग्ध सहकारी संस्थांशी संबंधित असलेल्या सदस्यांना वैयक्तिकरित्या स्वतंत्र परवाना घेण्याची गरज नाही. जर तुम्ही एखाद्या नोंदणीकृत सहकारी संस्थेशी जोडलेले असाल आणि त्यांना दूध पुरवत असाल, तर तुम्हाला परवान्याच्या कटकटीतून सवलत देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायावर कोणताही विपरित परिणाम होणार नाही.

LPG Gas Shortage: हातगाड्यापासून पंचतारांकितला ‘गॅस ‘ची झळ; वडापाव, मिसळसाठी जादा दर, हॉटेलमधील जेवणाला पूर्णविराम

प्रशासनाचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार

FSSAI ने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न आयुक्तांना विशेष निर्देश दिले आहेत:

  • विशेष नोंदणी मोहीम: प्रत्येक क्षेत्रात दूध विक्रेत्यांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिमा राबवल्या जातील.
  • फील्ड तपासणी: अन्न सुरक्षा अधिकारी (FSO) प्रत्यक्ष मैदानावर उतरून विक्रेत्यांकडील परवान्यांची तपासणी करतील.
  • स्टोरेज आणि कूलिंगवर लक्ष: केवळ भेसळच नाही, तर दूध खराब होऊ नये म्हणून वापरल्या जाणाऱ्या ‘कूलिंग इक्विपमेंट’चीही वेळोवेळी तपासणी केली जाईल. दुधाचे साठवणूक योग्य तापमानात होत आहे की नाही, यावर आता सरकारची करडी नजर असेल.

नियम मोडल्यास कठोर कारवाईचा इशारा

परवान्याशिवाय दूध विक्री करताना आढळल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्थेवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सर्व राज्यांनी या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी तंबीही FSSAI ने दिली आहे.

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

हा निर्णय थेट सर्वसामान्यांच्या आरोग्याशी जोडलेला आहे. बाजारात मिळणाऱ्या दुधाच्या शुद्धतेवर आता सरकारी यंत्रणेचे नियंत्रण असेल. ग्राहकांनी दूध खरेदी करताना ते अधिकृत विक्रेत्याकडूनच घेण्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. सरकारच्या या पावलामुळे दूध क्षेत्रातील अनधिकृत आणि धोकादायक व्यापाराला चाप बसणार आहे.

आई शपथ! आता इंधनानंतर मोबाइल डेटा वापरणे महागणार? सरकार 1 GB डेटावर ‘इतका’ टॅक्स लावण्याच्या तयारीत

Web Title: Now a ban on unlicensed milk sales major decision by fssai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • Central Governement
  • FSSAI
  • milk

संबंधित बातम्या

LPG Gas Supply News: देशात गॅस पुरवठा सुरळीत! रशिया-ऑस्ट्रेलियातून आयातीचा वेग वाढला; पेट्रोलियम मंत्रालयाचे नागरिकांना मोठे आवाहन
1

LPG Gas Supply News: देशात गॅस पुरवठा सुरळीत! रशिया-ऑस्ट्रेलियातून आयातीचा वेग वाढला; पेट्रोलियम मंत्रालयाचे नागरिकांना मोठे आवाहन

LPG Update: दोन आठवड्यांत 1.25 लाख नवीन PNG Connection, तीन दिवसांत 5600 लाख ऑनलाइन बुकिंग; सरकारकडून मोठी अपडेट
2

LPG Update: दोन आठवड्यांत 1.25 लाख नवीन PNG Connection, तीन दिवसांत 5600 लाख ऑनलाइन बुकिंग; सरकारकडून मोठी अपडेट

वाहनधारकांनो लक्ष द्या! महामार्गांवर FASTag स्कॅन नाही झाला तर आता बसणार दुप्पट दंड! केंद्र सरकारचा नवा नियम
3

वाहनधारकांनो लक्ष द्या! महामार्गांवर FASTag स्कॅन नाही झाला तर आता बसणार दुप्पट दंड! केंद्र सरकारचा नवा नियम

LPG चा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले! देशभरात 12,000 हून अधिक छापे; 15,000 गॅस सिलेंडर्स जप्त
4

LPG चा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले! देशभरात 12,000 हून अधिक छापे; 15,000 गॅस सिलेंडर्स जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.