Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे देवा…! गणपती मंडपात अश्लील डान्स करणाऱ्या तरुणींचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांचा तीव्र संताप

गुजरातमध्ये गणपती पंडालमध्ये भोजपुरी गाण्यांवर अश्लील डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. धार्मिक भावना दुखावल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, आयोजकांनी माफी मागितली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 05, 2025 | 03:24 PM
अरे देवा…! गणपती मंडपात अश्लील डान्स करणाऱ्या तरुणींचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांचा तीव्र संताप
Follow Us
Close
Follow Us:

Gujarat: उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये, विशेषतः धार्मिक आयोजनांमध्ये, ऑर्केस्ट्रा आणि डान्स कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा कार्यक्रमांमुळे अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. आता असाच एक नवीन वाद गुजरातमधून समोर आला आहे, जिथे गणपती मंडापामध्येच भोजपुरी गाण्यांवर अश्लील डान्स करण्यात आला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

भोजपुरी गाण्यांवर अश्लील डान्स

हा प्रकार गुजरातमधील अंकलेश्वर येथील मीरानगरमधील गणेश मंडाळामध्ये घडला. गणपतीची मूर्ती बसवल्यानंतर तिथे ऑर्केस्ट्रा आणि डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिला नृत्यांगनांनी भोजपुरी गाण्यांवर अश्लील डान्स केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत अनेकांनी कारवाईची मागणी केली.

गुजरात के अंकलेश्वर के मीरानगर स्थित गणेश पंडाल में भोजपुरी गाने में ठुमके लगवाए गए. इसके खिलाफ शिकायत दर्ज करवा दी गई. फिर क्या आयोजकों ने माफी मांग ली है ! ऐसा हर जगह होना चाहिए, जहां धार्मिक आयोजन में इस तरह के कांड हों, तुरंत विरोध किया जाना चाहिए, ये कतई ठीक नहीं है pic.twitter.com/Q2CMCvWewY — Avinash Tiwari (@TaviJournalist) September 5, 2025

व्हिडिओमध्ये काय आहे?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मीरानगर येथील गणपती पंडालसमोर महिला नर्तकी भोजपुरी गाण्यांवर अश्लील नृत्य करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेक भक्त नाराज झाले आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आयोजकांनी माफी मागितली असली तरी, या घटनेमुळे धार्मिक सलोख्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर पोलीस काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हे देखील वाचा: पती 8 वर्षांपासून बेपत्ता, इन्स्टाग्राम रीलमुळे झाली भेट, पोलीस घेऊन गेले थेट! कारण वाचून व्हाल थक्क

आयोजकांवर कारवाईची मागणी

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंकलेश्वर गणपती चॅरिटेबल ट्रस्टने या कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध जीआयडीसी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. ट्रस्टने म्हटले आहे की, अशा कार्यक्रमांमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत आणि पोलिसांनी यावर कठोर कारवाई करावी.

आयोजकांनी मागितली माफी

या घटनेनंतर आयोजकांनी माफी मागितली आहे. सत्यम कुमार नावाच्या आयोजकाने सांगितले की, “आमच्या गणेश मंडळामध्ये जे काही घडले, त्याबद्दल आम्ही माफी मागतो. भविष्यात असा कोणताही कार्यक्रम आयोजित करणार नाही, ज्यामुळे कोणाच्याही भावना दुखावतील.” त्यांनी हात जोडून लोकांची माफी मागितली आहे.

Web Title: Obscene dance on bhojpuri songs at ganpati mandap video of young women goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 03:23 PM

Topics:  

  • Dance Video Viral
  • Ganesh Chaturthi 2025
  • Gujarat
  • Nation News

संबंधित बातम्या

नव्या वर्षात मुख्यमंत्र्यांची महिलांना मोठी भेट! मुलं ‘टॉपर’ बनल्यास आईला मिळणार दरमहा ‘इतके’ रुपये
1

नव्या वर्षात मुख्यमंत्र्यांची महिलांना मोठी भेट! मुलं ‘टॉपर’ बनल्यास आईला मिळणार दरमहा ‘इतके’ रुपये

अश्लील आणि अभद्र कंटेंटवर तात्काळ कारवाई करा! केंद्र सरकारचा सोशल मीडिया कंपन्यांना इशारा
2

अश्लील आणि अभद्र कंटेंटवर तात्काळ कारवाई करा! केंद्र सरकारचा सोशल मीडिया कंपन्यांना इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.